Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

MSRTC Reservation App : एसटी महामंडळाकडून तिकीटांच्या आरक्षणासाठी येणार नवीन अ‍ॅप

Pravasi Suvidha App

एसटीच्या प्रवाशांची दिवसेंदिवस वाढणारी संख्या आणि गर्दी लक्षात घेता एसटी महामंडळाकडून ऑनलाईन तिकीट आरक्षणाची सेवा (Ticket Reservation service) उपलब्ध करून दिली आहे. यासाठी महामंडळाकडून प्रवासी सुविधा हे मोबाईल अ‍ॅप तयार केले जात आहे.

खेड्या-पाड्यात दळणवळणाची सुविधा देण्यात महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या (MSRTC) एसटीचा मोठा हातभार आहे. एसटी म्हणजे ग्रामीण आणि शहरी भागाला जोडणारी लोकप्रिय अशी प्रवासी वाहतूक सुविधा आहे. महाराष्ट्र राज्य सेवा परिवहन मंडळाकडून (MSRTC) एसटीच्या प्रवासी सेवेमध्ये कालानुसरुप बदल करण्यात आले. लाल-डबा ते शिवशाही आणि त्यानंतर शिवाई सारख्या ई व्हेईकल(E-vehical) पर्यंत एसटीने कात टाकल्याचे पाहायला मिळाले. बसच्या बदलत्या स्वरुपानुसार एसटी (state Transport) महामंडळाने प्रवाशांना देण्यात येणाऱ्या सुविधांकडेही तितक्याच तत्परतेने लक्ष दिले आहे. एसटीच्या प्रवाशांची दिवसेंदिवस वाढणारी संख्या आणि गर्दी लक्षात घेता एसटी महामंडळाकडून ऑनलाईन तिकीट आरक्षणाची सेवा (Ticket Reservation service) उपलब्ध करून दिली आहे. यासाठी महामंडळाकडून प्रवासी सुविधा अ‍ॅप तयार केले जात आहे . त्यामुळे तांत्रिक अडथळ्यामुळे प्रवाशांना होणारी असुविधा आणि अपवादात्मक होणारे आर्थिक नुकसान टाळता येणार आहे. याबाबतची माहिती एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दिली आहे.

सध्याची आरक्षण प्रणाली

एसटी महामंडळाकडून प्रवाशांना तंत्रज्ञान पुरक सुविधा देण्यास प्राधान्य दिले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून एसटी महामंडळाकडून प्रवाशांना आगावू तिकीटाची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. सुरुवातीला ही सेवा एजंटमार्फत देण्यात येत होती. त्यानंतर महामंडळाने स्वतःच्या संकेतस्थळावरून आगाऊ तिकीट विक्रीची सुविधा देण्यास सुरुवात करत एसटीने आणखी एक पाऊल पुढे टाकले. त्यानंतर एसटी महामंडळाकडून मोबाईल ॲपही (MSRTC Mobile Reservation App)  उपलब्ध करून देऊन त्याद्वारे आगाऊ आरक्षणाची सुविधा दिली आहे. प्रवाशांना सध्या ऑनलाईन, मोबाईल अ‍ॅ प आणि रोख रक्कम देऊन आरक्षित तिकीट काढण्याची सोय उपलब्ध आहे.

आरक्षित तिकीट बुकिंग आणि समस्या- Ticket reservation & Problems

एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. विशेषत: लांब पल्ल्याच्या आणि शिवनेरी, शिवशाही, शिवाई, हिरकणी या सारख्या लांब पल्ल्याच्या बससाठी प्रवाशांकडून प्राधान्य दिले जात आहे. मात्र वाढलेल्या गर्दीमुळे प्रवासी तिकीटाचे आगावू बुकिंग करण्यासाठी प्राध्यान देतात. मात्र, यासाठी प्रवाशांना एक तर एजंट, बसस्थानक किंवा एसटीचे अधिकृत संकेतस्थळ अथवा मोबाईल अ‍ॅ पवरून तिकीट बूक करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र, ऑनलाईन तिकीट बुकिंग करताना काही तांत्रिक समस्यांबाबत प्रवाशांकडून तक्रारी केल्या जात आहेत. त्यामध्ये तिकीट बुक केल्यानंतर प्रत्यक्षात चुकीचा आसन क्रमांक येणे, निर्धारित प्रवास मार्गावर आरक्षणासाठी गाडीच उपलब्ध नसणे, तिकिटाचे आरक्षण होण्यापूर्वीच खात्यातून क्रमांकतून पैसे वजा होणे, तसेच संकेतस्थळावर तांत्रिक अडथळा निर्माण होणे, तिकीटाचा एसएमएस न येणे. त्यामुळे प्रवासांना कधी कधी आर्थिक फटका बसतो. दुसरीकडे रोखीने तिकीटाचे आरक्षण करण्यासाठी प्रवाशांना एजंट अथवा बस स्थानकामध्ये जावे लागते. मात्र यासाठी ग्राहकांना अधिकचा वेळ वाया घालवावा लागत आहे.

कसे असेल प्रवासी सुविधा अ‍ॅ प? Pravasi Suvidha App

एसटीचे ऑनलाईन अथवा एजंटकडून आरक्षित तिकीट बूक करत असताना प्रवाशांना उपरोक्त समस्यांचा सामना करावा लागू नये यासाठी एसटीने आरक्षणाच्या सुविधेत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता एसटी महामंडळाकडून नव्याने ऑनलाईन तिकीट बुकींगसाठी एक संकेतस्थळ आणि प्रवासी सुविधा अ‍ॅ प विकसित(MSRTC Mobile Reservation App) करण्यात येणार आहे. यासाठी एसटी महामंडळाने एबिक्स कॅश या कंपनीसोबत 5 वर्षाचा करार केला आहे. त्या कंपनीकडून ऑगस्ट महिनाअखेरपर्यंत संकेतस्थळ आणि मोबाईल अ‍ॅ पच्या माध्यमातून ऑनलाईन तिकीट रिझर्व्हेशनची (Online reservation) सेवा उपलब्ध करून देण्यात येईल. या अ‍ॅ पमुळे प्रवाशांना विनाअडथळा तिकीट बूक करता  येणार आहे.

मोबाईल अ‍ॅ पच्या सुविधा-

  • कधीही,कुठेही अ‍ॅ पवरून तिकीट बुकींग करता येईल 
  • तिकीट बुकिंगसाठी डेबिट/क्रेडिट कार्ड, नेट-बँकिंग, UPI, वॉलेट, QR कोड आधारित पेमेंट करता येणार
  • प्रवाशांना लॉगिन अलर्टसह, प्रवासाची माहिती ई-तिकीट ईमेल आणि एसएमएसद्वारे प्राप्त होणार 
  • AI वर आधारित अ‍ॅ पमध्ये सर्च फिचर
  • मल्टीसिटी बुकिंग आणि राउंड ट्रिप बुकिंग करता येणार
  • एसटी महामंडळाच्या पॉलिसीनुसार ऑटो रिफंडसह पूर्ण किंवा आंशिक तिकीट रद्द करण्याची सुविधा 

एसटी बसवर एक दृष्टीक्षेप

एसटी महामंडळाकडून सध्या परिवर्तन, विठाई, हिरकणी, शिवशाही,शिवनेरी, अश्वमेध, शिवाई या बसेस चालवल्या जात आहे. यामध्ये शिवशाही, शिवाई,अश्वमेध या वातानुकूलित बसेस रस्त्यावर धावत आहेत. 2017 पासून महामंडळाने 'शिवशाही'ही बस आसन आणि शयनयान श्रेणीतील बस ताफ्यात दाखल केली आहे. तसेच नुकतेच महामंडळाच्या ताफ्यात शिवाई ही ईलेक्ट्रॉनिक बस देखील प्रवाशांच्या सेवेत दाखल झाली आहे. याच बरोबर हिरकणी बसचा पांढरा हिरवा रंग बदलून ती आता गुलाबी-पांढऱ्या या नव्या रंगरुपात प्रवाशांच्या सेवेत दाखल करण्यात आली आहे.