Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Festive Offers: ई-कॉमर्स कंपन्यांना बाप्पा पावणार! सणासुदीत 90 हजार कोटींची उलाढाल होणार

Festive Offers: कोरोनो टाळेबंदीनंतर मागील दोन वर्ष बाजारपेठेसाठी मंदीची गेली होती. त्यामुळे यंदा उत्सवी खरेदी वाढण्याची शक्यता आहे. मागील काही तिमाहींमध्ये खरेदीचा ट्रेंड वाढत असल्याचे दिसून आले आहे.

Read More

Gauri Pujan 2023: सोन पावलांनी येणारी "गौरी" देते अनेकांना रोजगार, बाजारपेठेत लाखोंची उलाढाल

Gauri Ganpati 2023: यावर्षी 21 सप्टेंबर रोजी महालक्ष्मीचे आवाहन आहे. गौरीपूजन हा महाराष्ट्रातील विशेष सण आहे. हा सण साधारपणे तीन दिवसांचा असतो. नागपूर शहरातील चितार ओळी येथे गौरीपूजना करिता बाजारपेठ सजली आहे. गौरी आणि त्यांचे कपडे, दागिने आणि विविध सजावटीच्या वस्तूंसह गौरींचे आवाहन करण्यास नागपूरकर सज्ज झाले आहेत.

Read More

Ganeshotsav 2023: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेश मूर्तीसह विविध साहित्यांच्या मागणीत वाढ, कोटींची उलाढाल

Ganeshotsav 2023: यंदा 19 सप्टेंबर रोजी गणरायाचे आगमन होत आहे. गणरायाच्या आगमना करिता संपूर्ण बाजारपेठ सज्ज झाली आहे. माती, शाडू माती, पीओपी असे विविध प्रकारचे गणपती बाजारपेठेत विक्रीस उपलब्ध आहेत. यासोबतच मखर, विविध सजावटीचे साहित्य तसेच धूप, अगरबत्ती यासारख्या पूजेच्या सामानाने संपूर्ण बाजारपेठ सजली आहे.

Read More

Pola Festival : नागपुरात 'तान्हा पोळा' निमित्त कोट्यवधीची उलाढाल; बाजारात अडीच लाखाचा लाकडी नंदीबैल

Tanha Pola 2023 : नागपूर शहरात पोळा सणाच्या दुसऱ्या दिवशी तान्हा पोळा साजरा केला जातो. ही परंपरा वर्षानुवर्षापासून सुरु आहे. तान्हा पोळा या परंपरेस यंदा 217 वर्ष पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने नागपूर शहरात अनेक ठिकाणी लाकडी नंदीबैल विक्रीची दुकाने सजली आहेत. तर यंदा मार्केटमध्ये लाकडी नंदीबैल विक्रीची तीन महिन्यातील उलाढाल ही 5 कोटी पेक्षा अधिक झाली आहे.

Read More

Festival Season: यंदा सणासुदीच्या काळात 70% नागरिक अतिरिक्त खर्च करण्यास उत्सुक

भारतीय ग्राहकांच्या खर्चात दिवसेंदिवस वाढ होत असून गेल्या वर्षीच्या तुलनेत 53% नागरिकांची आर्थिक परिस्थिती सुधारली असल्याचे या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. सोबतच 49% नागरिक यावर्षी मोठ्या उत्साहाने दिवाळी-दसरा सण साजरा करणार आहेत आणि त्यासाठी अधिकचा खर्च करण्याची देखील त्यांची इच्छा आहे.

Read More

Realme 5G Sale मध्ये ग्राहकांना मिळतेय 20 हजारांपर्यंतची सूट, जाणून घ्या ऑफर

'Realme 5G Sale' हा सेल कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर म्हणजेच realme.com, फ्लिपकार्ट (Flipkart) आणि अमेझॉन (Amazon) वर आयोजित केला गेला आहे. ग्राहक या वेबसाइटवरून त्यांच्या आवडीचा Realme स्मार्टफोन खरेदी करू शकणार आहेत. या सेलची खासियत अशी की, ग्राहकांना या सेलमध्ये थोडे थोडके नाही तर तब्बल 20 हजार रुपयांची बचत करता येणार आहे.

Read More

Pola Festival 2023 : पोळा सणाच्या पार्श्वभूमीवर बाजारात 10 कोटींची उलाढाल, शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण

Pola Festival: महाराष्ट्रातील शेतकरी ज्या सणांची अतिशय आतुरतेने वाट बघतात, असा सण म्हणजे पोळा होय. यावर्षी 14 सप्टेंबर गुरुवार रोजी पोळा हा सण आहे. त्यामुळे वर्षभर राबणाऱ्या आपल्या सर्जा राजाला सजविण्याचे साहित्य खरेदीसाठी शेतकरी बंधूंची बाजारात गर्दी दिसून येत आहे. यंदा पावसाचे प्रमाण अत्यल्प असले तरीही शेतकरी पोळा सणासाठी बाजारात गर्दी करताना दिसून येत आहे.

Read More

Amazon Indian Festival Sale: ॲमेझॉनचा ग्रेट इंडियन फेस्टिवल सेल 23 सप्टेंबरपासून सुरू

Amazon Indian Festival Sale: येत्या 23 सप्टेंबर रोजी गणेशोत्सवाच्या निमित्ताने 'ॲमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिवल सेल' सुरू होत आहे. यामध्ये विविध ब्रँडेड उत्पादनांवर तब्बल 75 टक्के एवढा भरघोस डिस्काउंट देण्यात येत आहे.

Read More

Ganesh Festival: खासगी ट्रॅव्हल्सकडून चाकरमान्यांची लूट थांबणार? आरटीओकडून प्रवासभाडे निश्चित

खासगी ट्रॅव्हल्स चालकांकडून गणेशोत्सवाच्या काळात 1500 ते 2000 रुपयांपर्यंत तिकीटाची आकारणी केली जाते. त्यामुळे आता नवी मुंबई उप प्रादेशिक परिवहन विभागाने वाशीतून कोकणात विविध ठिकाणी जाणाऱ्या बसेससाठी भाडे दर निश्चित केले आहे. त्यामध्ये किमान भाडे हे 428 रुपये असून कमाल भाडेदर हा 1260 इतका निश्चित करण्यात आला आहे.

Read More

Ganesh Festival: मुंबईतील जीएसबी गणेशोत्सव मंडळाने घेतले तब्बल 360 कोटींचे विमा संरक्षण

मुंबईतील सर्वात श्रीमंत गणपती म्हणनू ओळखल्या जाणार्‍या गौड सारस्वत ब्राह्मण (GSB) च्या मंडळाने यावर्षी तब्बल 360 कोटी रुपयांचे विमा संरक्षण (Insurance) घेतले आहे. मंडळाने न्यू इंडिया अॅन्शुरन्स या कंपनीकडून हे विमा संरक्षण घेतले आहे.

Read More

Ganesh Festival: गणेश उत्सवासाठी जनतेकडून वर्गणी गोळा करणे कायदेशीर आहे का?

गणेशमंडळाकडून जनतेमधून वर्गणी गोळा केली जाते. मात्र, ज्या मंडळांची धर्मदाय आयुक्त कार्यालयाकडे (charity commissioner office) नोंदणी झाली आहे. याशिवाय ज्या मंडळानी उत्सव साजरा करण्यासाठी वर्गणी गोळा करण्यासाठी आयुक्तालयाची परवानगी घेतली नाही, अशा मंडळांनी जनतेकडून वर्गणी गोळा करणे हे बेकायदेशीर ठरते.

Read More

Special Trains For Ganesh Festival: गणपतीला गावी जाताय, रेल्वेचा मोठा निर्णय, लाखो चाकरमान्यांचा प्रवास सुकर होणार

Special Trains For Ganesh Festival: कोकण मार्गावरील गणेशोत्सवातील मागणी लक्षात घेता रेल्वेने जादा गाड्या सोडण्याची घोषणा केली आहे. कोकण रेल्वे मार्गावर नियमित मेल-एक्सप्रेस व्यतिरिक्त पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वेकडून गणेशोत्सव काळात 312 स्पेशल ट्रेन्स धावणार आहेत.

Read More