यंदाच्या दिवाळीत भारतीय लोक 70% भारतीय अधिक खर्च करण्याच्या तयारीत आहे. लीडर द ट्रेड डेस्क या खासगी संस्थेने केलेल्या एका सर्वेक्षणात ही माहिती समोर आली आहे. सध्या कोविडचा प्रभाव निवळला असून, देशभरातील बाजारपेठा आता फुलल्या आहेत. देशाची अर्थव्यवस्था स्थिरस्थावर झाली असून नागरिकांची खर्च करण्याची क्षमता देखील वाढली असल्याचे या अहवालात म्हटले आहे.
भारतीय ग्राहकांच्या खर्चात दिवसेंदिवस वाढ होत असून गेल्या वर्षीच्या तुलनेत 53% नागरिकांची आर्थिक परिस्थिती सुधारली असल्याचे या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. सोबतच 49% नागरिक यावर्षी मोठ्या उत्साहाने दिवाळी-दसरा सण साजरा करणार आहेत आणि त्यासाठी अधिकचा खर्च करण्याची देखील त्यांची इच्छा आहे.
बाजारपेठा फुलणार
देशाची अर्थव्यवस्था सध्या सुस्थितीत असून बाजारपेठा फुलल्याचे चित्र आहे. सामान्य नागरिकांची खरेदी क्षमता वाढली असून त्याचा परिणाम यंदाच्या सणासुदीत पाहायला मिळणार आहे. याचा परिणाम आता जाहिरात क्षेत्रावर पहायला मिळतो आहे. तसेच नागरिकांच्या आवडी-निवडी लक्षात घेऊन वेगवेगळ्या जाहिरातींच्या माध्यमातून खरेदीदारांना आकर्षित करत आहेत. दसरा-दिवाळीच्या दरम्यान हा ट्रेंड वाढणार असल्याचे अहवालात म्हटले आहे.
The Trade Desk Report shows approximately 70 percent of Indians are ready to spend more this Diwali with a 35 percent increase from last year. pic.twitter.com/PvBIiXSO1c
— Social Samosa (@Social_Samosa) September 12, 2023
सोन्याला पसंती
सणासुदीच्या निमित्ताने बहुसंख्य लोक चैनीच्या वस्तू खरेदी करण्यास प्राधान्य देताना दिसत आहेत. गाडी, एसी, फर्निचर आदी वस्तू खरेदी करण्यास लोक उत्सुक आहेत आणि तसे त्यांनी स्वतःचे बजेट देखील तयार केले आहे. याशिवाय सुमारे 80% लोक हे सोने खरेदी करण्यास उत्सुक आहेत.
दरवर्षी सणासुदीच्या काळात सोन्याला चांगली मागणी असते. शुभ मुहूर्तावर सोने खरेदी करण्याची भारतीय परंपरा देखील आहे. याशिवाय ब्रांडेड कपडे, भेटवस्तू, दिवाळीचा फराळ आदी गोष्टींवर देखील खर्च करण्यास नागरिक तयार असल्याचे या अहवालात म्हटले आहे.