Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Realme 5G Sale मध्ये ग्राहकांना मिळतेय 20 हजारांपर्यंतची सूट, जाणून घ्या ऑफर

Realme 5G Sale

'Realme 5G Sale' हा सेल कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर म्हणजेच realme.com, फ्लिपकार्ट (Flipkart) आणि अमेझॉन (Amazon) वर आयोजित केला गेला आहे. ग्राहक या वेबसाइटवरून त्यांच्या आवडीचा Realme स्मार्टफोन खरेदी करू शकणार आहेत. या सेलची खासियत अशी की, ग्राहकांना या सेलमध्ये थोडे थोडके नाही तर तब्बल 20 हजार रुपयांची बचत करता येणार आहे.

स्मार्टफोन कंपनी Realme ने आज 'Realme 5G सेल' ची घोषणा केली आहे. भारतात रिअलमी कंपनीच्या स्मार्टफोनला चांगली मागणी राहिलेली आहे. सध्या सणासुदीचे दिवस आहेत, गणपती फेस्टिव्हल, त्यानंतर येणारा दसरा आणि दिवाळी या सणांच्या निमित्ताने होणारी खरेदी लक्षात घेऊन Realme ने ग्राहकांसाठी ही खास ऑफर आणली आहे.

'Realme 5G सेल' हा सेल कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर म्हणजेच realme.com, फ्लिपकार्ट (Flipkart) आणि अमेझॉन (Amazon) वर आयोजित केला गेला आहे. ग्राहक या वेबसाइटवरून त्यांच्या आवडीचा Realme स्मार्टफोन खरेदी करू शकणार आहेत. या सेलची खासियत अशी की, ग्राहकांना या सेलमध्ये थोडे थोडके नाही तर तब्बल 20 हजार रुपयांची बचत करता येणार आहे.

आत्तापर्यंत Realme कंपनीने 33 5G स्मार्टफोन लॉन्च केले आहेत, ते सर्व फोन या सेलमध्ये ग्राहकांना उपलब्ध करून दिले जाणार आहेत आणि त्यावर घसघशीत सूट देखील दिली जाणार आहे. हा सेल 11 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर दरम्यान सुरु असणार आहे. यासोबतच यामध्ये कूपन डिस्काउंट, बँक ऑफर, एक्सचेंज ऑफर (Exchange Offer), नो कॉस्ट ईएमआय (No Cost EMI) अशा अनेक ऑफर्सचा समावेश आहे.

या Realme स्मार्टफोन्सवर बंपर सूट

Realme GT 2 Pro

या सेलमध्ये तुम्हाला Realme च्या GT 2 Pro हा मोबाईल अगदी स्वस्तात खरेदी करता येणार आहे. या स्मार्टफोनचे 8GB + 128GB आणि 12GB + 256GB असे दोन्ही व्हेरीयेंट सेलमध्ये उपलब्ध करून दिले आहेत. 8GB + 128GB स्मार्टफोनची किंमत 49,999 रुपये असून सेलमध्ये हाच मोबाईल तुम्हांला 29,999 रुपयांना खरेदी करता येणार आहे. तर 12GB + 256GB हा व्हेरीयेंट मोबाईलची किंमत 57,999 रुपये असून तो 37,999 रुपयांना खरेदी करता येणार आहे.

Realme C53

Realme C53 हा सामान्यांना आणि कॉलेजवयीन विद्यार्थ्यांना परवडणारा आणि आवडीचा मोबाईल म्हणून ओळखला जातो. या स्मार्टफोनच्या 6GB + 64GB व्हेरीयेंटची किंमत 10,999 रुपये इतकी असून या सेलमध्ये तुम्ही तो 9999 रुपयांना खरेदी करू शकता. ग्राहकांना थेट 1 हजार रुपयांची सूट दिली जाणार आहे.

Realme 11 5G

Realme 11 5G च्या 8GB + 128GB व्हेरिएंटची किंमत ही 18,999 रुपये असून सेल दरम्यान, हा स्मार्टफोन तुम्हाला 17,499 रुपयांना खरेदी करता येणार आहे आणि तुमचे 1 हजार रूपये बचत करता येणार आहे.

Realme 11 Pro+ 5G

Realme 11 Pro+ 5G या स्मार्टफोनच्या 8GB + 256GB व्हेरिएंटची किंमत 27,999 रुपये इतकी आहे. परंतु हाच स्मार्टफोन ग्राहकांना सेल दरम्यान 24,999 रुपयांना खरेदी करता येणार आहे. म्हणजेच तुमचे थेट 3 हजार रुपये वाचतील. तसेच हा मोबाईल खरेदी करत असाल तर तुम्हांला 1000 रुपयांचे डिस्काउंट कूपन देखील मिळेल. हे कुपन तुम्ही तुमच्या पुढील खरेदीसाठी वापरू शकाल.

Realme 11x 5g

Realme 11 5G च्या 6GB + 128GB व्हेरिएंटची किंमत 14,999 रुपये इतकी असून या सेल दरम्यान ग्राहकांना यावर 1000 रुपयांची सूट मिळणार आहे.

Realme C55

या विशेष सेलमध्ये ग्राहकांना 10,999 रुपयांच्या Realme C55 च्या 4GB + 64GB व्हेरीयेंटवर खास 1000 रुपयांची सूट दिली जात आहे. म्हणजेच हा स्मार्टफोन ग्राहकांना 9999 रुपयांना खरेदी करता येणार आहे.