Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Ganesh Festival: गणेश उत्सवासाठी जनतेकडून वर्गणी गोळा करणे कायदेशीर आहे का?

Ganesh Festival:  गणेश उत्सवासाठी जनतेकडून वर्गणी गोळा करणे कायदेशीर आहे का?

Image Source : www.in.pinterest.com

गणेशमंडळाकडून जनतेमधून वर्गणी गोळा केली जाते. मात्र, ज्या मंडळांची धर्मदाय आयुक्त कार्यालयाकडे (charity commissioner office) नोंदणी झाली आहे. याशिवाय ज्या मंडळानी उत्सव साजरा करण्यासाठी वर्गणी गोळा करण्यासाठी आयुक्तालयाची परवानगी घेतली नाही, अशा मंडळांनी जनतेकडून वर्गणी गोळा करणे हे बेकायदेशीर ठरते.

गणेशोत्सव तोंडावर आला आहे. अनेक सार्वजनिक गणेशमंडळाकडून गणेशोत्सवाच्या तयारीला वेग आला आहे. संपूर्ण देशभरात उत्साहाने साजरा करण्यात येणाऱ्या या गगणेशोत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे सार्वजनिक वर्गणीतून हा उत्सव मोठ्या धुमधडक्यात साजरा होतो. समाजातील अनेक घटक  आपले योगदान या उत्सवासाठी देतात. मात्र, गणेशोत्सवासाठी नागरिकांकडून वर्गणी (donations for the festival) गोळा करणे कायदेशीर आहे का? वर्गणी गोळा करण्यासाठी कोणाची परवानगी घ्यावी लागते का? याबाबतची माहिती आपण जाणून घेऊयात..

वर्गणी गोळा करणे कायदेशीर आहे का?

आपल्याकडे  गणेशोत्सव हा सार्वजनिकरित्या साजरा केला जातो. या उत्सवासाठी गणेशमंडळाकडून जनतेमधून वर्गणी गोळा केली जाते. मात्र, ज्या मंडळांची धर्मदाय आयुक्त कार्यालयाकडे (charity commissioner office) नोंदणी झाली आहे. याशिवाय ज्या मंडळानी उत्सव साजरा करण्यासाठी वर्गणी गोळा करण्यासाठी आयुक्तालयाची परवानगी घेतली नाही, अशा मंडळांनी जनतेकडून वर्गणी गोळा करणे हे बेकायदेशीर ठरते.

नोंदणीकृत मंडळेच वर्गणी गोळा करू शकतात

सार्वजनिक गणेशउत्सवास मंडळांना वर्गणी गोळा करण्यासाठी धर्मादाय आयुक्तांच्या परवानगी घेणे आवश्यक आहे. विना परवानगी जनतेकडून पैसे वसूल करणे बेकायदेशीर ठरते शिवाय. जर एखाद्या मंडळाकडून सक्तीची वसुली झाल्यास त्याला खंडणीच्या गुन्ह्याचे स्वरुप प्राप्त होऊ शकते. तसेच या संदर्भात नागरिकांनी तक्रार केल्यास धर्मदाय कार्यालयाकडून कारवाई केली जाऊ शकते. मंडळे नागरिकांकडून ऐच्छिक देणगी स्वीकारू शकतात. मात्र, त्यासाठी देखील नोंदणी नसलेल्या सामाजिक संस्था किंवा मंडळांनी महाराष्ट्र सार्वजनिक न्यास अधिनियम, 1950 च्या कलम 41C या नुसार धर्मदाय कार्यालयाकडून देणगी गोळा करण्यासाठी परवानगी घेणे आवश्यक आहे.

ऑनलाईन सुविधा

सार्वजनिक गणेश उत्सवांना गणेश उत्सवाची परवानगी घेण्यासाठी धर्मादाय आयुक्तालयाकडून प्रतिवर्षी ऑनलाइन नोंदणी सुविधा उपलब्ध करून देण्यात येते. यासाठी मंडळांनी www.charity.maharashtra.gov.in या वेबसाइटवर संपर्क करणे आवश्यक आहे. तसेच नोंदणीकृत गणेश मंडळांना गणेशोत्सवाचा खर्चाचा अहवाल आयुक्तालयाकडे सादर करणे गरजेचे असते.