Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

TVS-x EV scooter : टीव्हीएसची नवीन इलेक्ट्रिक स्कूटर लाँच; किंमतीमुळे विक्रीला बसणार फटका?

TVS-x या इलेक्ट्रिक स्कूटरची वैशिष्ट्ये जाणून घ्यायची झाल्यास स्कूटरसाठी 4.44 kWh ची बॅटरी दिली आहे. तसेच ही बॅटरी एका फास्ट चार्जिग तंत्रज्ञाने सुसज्ज असून 50 मिनिटात 50% चार्ज होत असल्याचे कंपनीकडून सांगण्यात येत आहे. तसेच 950W चा पोर्टेबल चार्जर वापरून चार्ज करण्यासाठी 4.5 तासाचा कालावधी लागतो.

Read More

Bajaj Chetak E-Scooter Price : बजाजची "चेतक इलेक्ट्रिक स्कूटर'' झाली स्वस्त; तब्बल 22 हजारांची कपात

इलेक्ट्रिक वाहन निर्मितीमध्येही पाऊल ठेवलेल्या बजाज ऑटोने त्यांच्या चेतक या इलेक्ट्रिक स्कूटरच्या किमतीमध्ये मोठी कपात करण्याची घोषणा केली आहे. चेतक या इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत यापूर्वी 1 लाख 52 हजार रुपये इतकी होती. त्यामध्ये कपात केल्याना ग्राहकांना ही स्कूटर आता 1 लाख 30 हजार रुपयांना खरेदी करता येणार आहे. कंपनीने चेतकच्या एक्स-शोरूम प्राईसमध्ये तब्बल 22 हजार रुपये कपात केले आहेत.

Read More

Electric 2-Wheelers: 10 पेक्षा जास्त इलेक्ट्रिक दुचाकी होणार लाँच; पाहा स्टाइलिश मॉडेल्सची झलक

TVS Creon, कायनॅटिक इ लूना, होंडा अॅक्टिव्हासह इतर 10 पेक्षा जास्त इलेक्ट्रिक गाड्यांची मॉडेल बाजारात येणार आहेत. आकर्षक लूक, अत्याधुनिक फिचर्स आणि बरंच काही ग्राहकांना मिळणार आहे. पाहा नव्या मॉडेल्सची एक झलक.

Read More

Ather 450S इलेक्ट्रिक स्कूटरच्या प्री-बुकिंगला सुरुवात! बुकिंगसाठी मोजावे लागतील 'इतके' रुपये

Ather 450S Pre-Booking: इलेक्ट्रिक वाहन निर्माती कंपनी एथरने त्यांच्या आगामी 'Ather 450S' स्कूटरची प्री-बुकिंग सुरू केली आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये कंपनीने अनेक आधुनिक फीचर्स दिले आहेत. ग्राहकांना Ather 450S चे प्री-बुकिंग करायचे असेल, तर किती रुपये मोजावे लागतील जाणून घेऊयात.

Read More

Lectrix EV Launched in India: लेक्ट्रिक्स कंपनीची इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च; 499 रुपयात बुकिंग करता येणार!

Lectrix EV Launched in India: इलेक्ट्रिक वाहन निर्माती कंपनी लेक्ट्रिक्सने भारतीय बाजारपेठेत नवीन ई-स्कूटर लॉन्च केली आहे. ही स्कूटर ग्राहकांना केवळ 499 रुपयांमध्ये बुक करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. विशेष म्हणजे लेक्ट्रिक्स स्कूटर खरेदी करणाऱ्या पहिल्या 10,000 ग्राहकांना मूळ किंमतीवर विशेष सवलत देखील मिळणार आहे.

Read More

'Okinawa Okhi-90' इलेक्ट्रिक स्कूटर भारतीय बाजारपेठेत लॉन्च; किंमत आणि फीचर्स जाणून घ्या

Okinawa Okhi-90 EV Launched in India: भारतीय बाजारपेठेत अनेक स्वदेशी ऑटोटेक कंपन्यांनी स्वतःचा कारभार विस्तारायला सुरुवात केली आहे. त्यापैकीच ओकिनावा ऑटोटेकने त्यांची नवीन इलेक्ट्रिक स्कूटर नुकतीच लॉन्च केली आहे. ज्यामध्ये अनेक आधुनिक फीचर्स कंपनीकडून देण्यात आले आहेत. या स्कूटरसाठी ग्राहकांना किती रुपये मोजावे लागतील, जाणून घेऊयात.

Read More

Okaya Price Discount : ओकाया कंपनीकडून इलेक्ट्रिक स्कूटर खरेदीदारांना मोठी ऑफर; थायलंड प्रवासाची संधी

इलेक्ट्रॉनिक दुचाकी निर्माता ओकाया (Okaya EV) या कंपनीने ग्राहकांसाठी किमतीमध्ये सवलत देणारी विशेष ऑफर जाहीर केली आहे. कंपनीने इलेक्ट्रिक वाहन निर्मिती क्षेत्रात दोन वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर आपल्या काही इलेक्ट्रिक दुचाकीच्या किमतीमध्ये 10 हजार रुपयांपर्यंत सवलत जाहीर केली आहे.

Read More

Battery swapping policy: इलेक्ट्रिक वाहनांची बॅटरी चार्जिंग करण्याऐवजी बदलून घेण्याच्या पॉलिसीला कंपन्यांचा विरोध

इलेक्ट्रिक वाहनाची बॅटरी चार्जिंग करण्याऐवजी चार्जिंग स्टेशनवरुन बॅटरी बदलून घेण्याची संकल्पना केंद्र सरकारने आणली होती. मात्र, या संकल्पनेस बॅटरी आणि वाहन निर्मिती कंपन्यांनी विरोध केला आहे. इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग करण्यास 30 मिनिटांपेक्षाही जास्त वेळ लागतो. बॅटरी बदलून घेण्याची व्यवस्था उभी राहील तर चालकांना वाट पाहत बसण्याची गरज नाही.

Read More

Komaki Launched New Model: इलेक्ट्रिक कंपनी Komaki ने SE चे अपग्रेड मॉडेल केले लॉन्च

Komaki SE Eco Scooter: इलेक्ट्रिक वाहन निर्माता कंपन्या भारतात अतिशय वेगाने नवीन आणि अपग्रेटेड वाहने लॉन्च करत आहेत. याच अंतर्गत Komaki कंपनीने Komaki SE स्कूटर मॉडेल अपग्रेड करून बाजारात पुन्हा लॉन्च केली. कोमाकी एसई स्कूटर तीन मॉडेलमध्ये उपलब्ध आहेत.

Read More

Two Wheeler and Car Prices Set To Rise: 1 जूनपासून इलेक्ट्रिक टू-व्हीलर आणि कार्स महागणार, जाणून घ्या सविस्तर

Two Wheeler and Car Prices Set To Rise: तुम्ही वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर 1 जून 2023 पूर्वी त्याची बुकिंग करा. कारण 1 जून 2023 पासून वाहनांच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता आहे. फेम इंडिया अंतर्गत इलेक्ट्रिक दुचाकींना दिले जाणारे अनुदान 1 जूनपासून कमी होणार आहे. अनेक कंपन्या किमती वाढवणार आहेत.

Read More

EV subsidy : इलेक्ट्रिक स्कूटर 15 टक्क्यांनी महागणार! सरकार करणार सबसिडीत कपात

EV subsidy : इलेक्ट्रिक स्कूटर घेणाऱ्यांच्या खिशाला आता कात्री लागणार आहे. सरकारनं इलेक्ट्रिक स्कूटरसाठीची सबसिडी कमी केलीय. त्यामुळे सध्या मिळणाऱ्या किंमतीमध्ये वाढ होणार आहे. त्याचा थेट परिणाम ग्राहकांवर होणार आहे. त्यामुळे अतिरिक्त किंमत मोजावी लागणार आहे.

Read More

Electric two-wheelers in Demand : देशात इलेक्ट्रिक टू-व्हिलरची विक्री वाढली, ओला ठरली मार्केट लिडर

Electric two-wheelers in Demand : नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात 7.3 लाख इलेक्ट्रिक दुचाकींची विक्री झाली. 2022 वर्षाशी तुलना करता ही आकडेवारी तिप्पट आहे. इ-दुचाकी विक्रीमध्ये ओला कंपनी मार्केट लिडर ठरली आहे. 2030 पर्यंत इलेक्ट्रिक गाड्यांची विक्री कोटींमध्ये जाईल, असा अंदाज वर्तवला जात आहे. नवीन टेक्नॉलॉजी आणि माडर्न डिझाइन ग्राहकांना देण्यावर कंपन्यांनी लक्ष केंद्रित केले आहे.

Read More