भारतात इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढताना दिसत आहे. त्यामुळे अनेक कंपन्यांकडून भारतात इलेक्ट्रिक वाहने सादर केली जात आहेत. यासाठी केंद्र सरकारकडून प्रोत्साहन दिले जात आहे. भारतात दरम्यान, या भारतात टीव्हीएस (TVS) या कंपनीने आपली नवीन इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात दाखल केली आहे. ही प्रीमियम श्रेणीतील इलेक्ट्रिक स्कूटर असून अनेक अत्याधुनिक वैशिष्ट्ये आणि तंत्रज्ञानाने सुसज्ज दुचाकी आहे.
TVS X इलेक्ट्रिक स्कूटर
इंधनाचा वाढता खर्च आणि इलेक्ट्रिक वाहनांची वाढत चालली उपलब्धता त्यामुळे भारतीय नागरिकांकडून इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढत आहे. त्यामुळे विविध वाहन निर्मित्या कंपन्यांकडून भारतीय नागरिकांना आकर्षित करतील अशा इलेक्ट्रिक दुचाकी आणि चारचाकी वाहनांची निर्मिती केली जात आहे. टीव्हीएस मोटार्स या वाहन निर्मात्या कंपनीने देखील बहुप्रतिक्षीत TVS-X ही इलेक्ट्रिक स्कूटर भारतीय बाजारपेठेत दाखल केली आहे. या इलेक्ट्रिक दुचाकीची शोरूम किंमत ही 2 लाख 50 हजार रुपये इतकी ठेवण्यात आली आहे.
काय आहेत वैशिष्ट्ये?
TVS-x या इलेक्ट्रिक स्कूटरची वैशिष्ट्ये जाणून घ्यायची झाल्यास स्कूटरसाठी 4.44 kWh ची बॅटरी दिली आहे. तसेच ही बॅटरी एका फास्ट चार्जिग तंत्रज्ञाने सुसज्ज असून 50 मिनिटात 50% चार्ज होत असल्याचे कंपनीकडून सांगण्यात येत आहे. तसेच 950W चा पोर्टेबल चार्जर वापरून चार्ज करण्यासाठी 4.5 तासाचा कालावधी लागतो. यावेळत गाडीची बॅटरी 80 टक्के चार्ज होते. एका चार्जमध्ये TVS X ही 140 किमी धावू शकते. गाडीचा सर्वाधिक वेग 105 kmph इतका आहे. डिजिटल तंत्रज्ञानाच्या बाबतीत TVS -x या दुचाकीला रॅम एअर कूलिंग तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. वेब ब्राउझर, लाइव्ह लोकेशन शेअरिंग प्रणाली वापरण्यात आली आहे. तसेच 10.25 इंचाचा मोठा टचस्क्रीन डिजिटल डिस्प्ले देण्यात आला आहे.
इतर इलेक्ट्रिक वाहनांच्या तुलनेत महागच
टीव्हीएस मोटर्सने TVS-x या इलेक्टिक स्कूटरची शोरूम किंमत 2.50 लाख आहे. मात्र, भारतीय बाजारपेठेत सध्या उपलब्ध असलेल्या इतर इलेक्ट्रिक दुचांकीच्या तुनलेत या गाडीची किंमत जास्तच आहे. सध्या भारतात, बजार, ओला, एथर या कंपन्याच्या स्कूटरच्या किंमती 1.50 लाख रुपयांच्या आत आहेत. याशिवाय बॅटरीचे फिचर्स देखील जवळपास त्याच रेंजमध्ये आहेत. त्यामुळे TVC ची ही स्कूटर महागडीच आहे. त्यामुळे या गाडीच्या विक्रीला फटका बसण्याची शक्यता आहे.