भारतात इलेक्ट्रिक वाहन वापरणाऱ्या ग्राहकांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. या वाहनांच्या किंमती थोड्या महाग असल्यातरीही ग्राहकांकडून इलेक्ट्रिक वाहनांच्या वापरास पंसती मिळत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान इलेक्ट्रॉनिक दुचाकी निर्माता ओकाया (Okaya EV) या कंपनीने ग्राहकांसाठी किमतीमध्ये सवलत देणारी विशेष ऑफर जाहीर केली आहे. कंपनीने इलेक्ट्रिक वाहन निर्मिती क्षेत्रात दोन वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर आपल्या काही इलेक्ट्रिक दुचाकीच्या किमतीमध्ये 10 हजार रुपयांपर्यंत सवलत जाहीर केली आहे.
दुसरा वर्धापनदिन आणि मान्सूनसाठी खास ऑफर-
Okaya EV या कंपनीने आपल्या इलेक्ट्रिक स्कूटरची (Okaya ClassIQ+) प्रारंभीची किंमतही 74,499 रुपये ठेवली आहे. इतकेच नाही तर कंपनीने दुसऱ्या वर्धापनदिनानिमित्त खास मर्यादित कालावधीची ऑफर लॉन्च केली आहे. त्यानुसार कंपनीने त्याच्या Faast सिरीजमधील F2T आणि F2B या मॉडेल्सच्या किमतीमध्ये सवलत जाहीर ( Price Discount) केली आहे. त्यानुसार Okaya Faast F2B या मॉडेलवर 10,800 ची सवलत देण्यात आली असून ही दुचाकी 99,950/-रुपयांना उपलब्ध होणार आहे. तर Okaya Faast F2T ही दुचाकी 8,500च्या सवलतीनंतर 99,400/ रुपयांना उपलब्ध होणार आहे.
थांयलड प्रवासासह कॅशबँकची मान्सून ऑफर
याच बरोबर कंपनीने खास मान्सून ऑफर सुरू केली आहे. त्यानुसार जे ग्राहक 31 जुलै 2023 पर्यंत ओकायाची इलेक्ट्रिक दुचाकी खरेदी करतील त्यांना मान्सून कॅशबॅक योजना मिळणार आहे. त्यामध्ये ग्राहकांना 5000 रुपयांपर्यंतच्या आकर्षक कॅशबॅक मिळू शकतो असे कंपनीने सांगितले आहे. याशिवाय, कोणत्याही एका भाग्यवान ग्राहकाला 4 दिवसांसाठी थायलंडची सहल करण्याची संधी मिळू शकते. यासाठी कंपनी 50,000 रुपयांपर्यंतचा खर्च करणार आहे.
पात्रता निकष
ऑफरचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना Okaya EV Faast मालिकेतील दुचाकी खरेदी करायची आहे. या योजनेच्या कालावधीत ग्राहकांना Faast F4, Faast F3, F2B आणि F2T या मॉडेलमधील दुचाकी खरेदी करायची आहे.