देशात इंधनाचे दर गगनाला भिडले असताना इलेक्ट्रिक दुचाकींची विक्री दिवसेंदिवस वाढत आहे. नवनवीन इलेक्ट्रिक दुचाकींची मॉडेल्स ग्राहकांना विकण्यासाठी ऑटो कंपन्यांमध्ये स्पर्धा सुरू आहे. ग्राहकांकडूनही इलेक्ट्रिक गाड्यांना पसंती मिळत आहे. देशात नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात 7.3 लाख इलेक्ट्रिक दुचाकींची विक्री झाली. 2022 वर्षाशी तुलना करता ही आकडेवारी तिप्पट आहे. इ-दुचाकी विक्रीमध्ये ओला कंपनी मार्केट लिडर ठरली आहे. 2030 पर्यंत इलेक्ट्रिक गाड्यांची विक्री कोटींमध्ये जाईल, असा अंदाज वर्तवला जात आहे.
ओला कंपनीचा मार्केट शेअर 22 टक्के
"लेटेस्ट इलेक्ट्रिक मोबिलिटी" हा अहवाल Redseer कंपनीने जाहीर केला आहे. ओला कंपनीचा वाहन विक्रीतील मार्केट शेअर 22 टक्के राहीला. (Electric bike market leader India) तर FY 23 मधील शेवटच्या तिमाहीत ओलाचा बाजारातील वाटा 30 टक्क्यांवर गेला. सोबतच टीव्हीएस, होंडा, एथर, बजाजसह अनेक कंपन्यांचे ब्रँड बाजारात आहेत. ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरामध्ये इलेक्ट्रिक वाहनांची विक्री तेजीने वाढत आहे. ग्रामीण भागात चार्जिंग अडथळा ठरत आहे. मात्र, ग्रामीण भागातील विक्रीही वेगाने वाढत आहे. वाढत आहे.
सॉफ्टवेअर आणि बॅटरी टेक्नॉलॉजीवर लक्ष (EV software and Battery cell tech)
ओलाच्या गाड्यांमध्ये डिजिटल टेक्नॉलॉजीचा पुरेपुर वापर करण्यात आला आहे. टेक्नॉलॉजीद्वारे कंपनीने स्पर्धेतून आपले वेगळेपण सिद्ध केले. तसेच ओला कंपनीच्या गाड्या ग्राहकांसाठी परवडणाऱ्या दरात उपलब्ध आहेत. या गोष्टींमुळे ओला कंपनी मार्केट लिडर ठरली, असे Redseer कंपनीने अहवालात म्हटले आहे.
"टेक्नॉलॉजी हे इलेक्ट्रिक गाड्यांचे भविष्य असेल. सॉफ्टवेअर आणि बॅटरी टेक्नॉलॉजी हे दोन प्रमुख मुद्दे आहेत. यातील दोन्हींमध्येही आम्ही आघाडीवर आहोत. या दोन तंत्रज्ञानावर आणखी काम करून आणखी चांगल्या दुचाकी तयार करू. तसेच आमची पुरवठा साखळी पूर्ण क्षमतेने उभी राहिल्यास आमच्याशी स्पर्धा करणे इतर कंपन्यांना अवघड जाईल", असे ओला कंपनीचे सहसंस्थापक भाविश अगरवाल यांनी नुकतेच एका मुलाखतीमध्ये म्हटले.
इ-दुचाकी निर्मिती करणाऱ्या कंपन्यांकडून विविध वयोगटातील नागरिकांना लक्ष्य केले आहे. यात न्यू जनरेशनसाठी टेक्नॉलॉजी फिचर्स देण्यावर कंपन्यांचा भर आहे. मॉडर्न व्हेइकल डिझाइन, पर्सनलाइझेशन, सरकारी योजना तसेच ग्राहकांचीही मागणी वाढत असल्याने इलेक्ट्रिक दुचाकी कंपन्यांना चांगले दिवस आले आहेत. इलेक्ट्रिक वाहन निर्मिती करणाऱ्या कंपन्यांसाठी सरकारची प्रॉडक्शन लिंक्ड इंसेटिंव्ह योजनाही सुरू आहे. तसेच इव्ही गाड्यांना करातून सुटका मिळते.
दरमहा 60 हजार ओला दुचाकींची विक्री (e-scooter sales in FY 2023)
मागील आर्थिक वर्षात भारतीय ग्राहकांनी दरमहा 60 हजार इलेक्ट्रिक दुचाकी खरेदी केल्या. इंधनाच्या वाढत्या किंमती आणि इलेक्ट्रिक वाहनांच्या वाढत्या जनजागृतीमुळे गाड्यांची विक्री वाढत आहे. सध्या इलेक्ट्रिक वाहन निर्मिती करताना बॅटरी निर्मितीचा मोठा खर्च आहे. बॅटरी सेल परदेशातून आयात केले जातात. किंवा त्यांचे सुटे पार्ट्स् भारतात निर्मिती होत नाही. त्यामुळे गाड्यांच्या किंमती जास्त आहेत. भविष्यात भारतामध्ये बॅटरी निर्मितीची क्षमता उभी राहिल्यास गाड्यांच्या किंमती आणखी कमी होतील. ओला कंपनीने तामिळनाडू राज्यात EV दुचाकी आणि बॅटरी निर्मितीचा प्रकल्प सुरू केला आहे.
नुकतेच ओला कंपनीने भारतभर एकाच दिवशी 50 शोरुम्स सुरू केले. कंपनीकडून पुरवठा साखळी उभी करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. कारण, इतर आघाडीच्या स्पर्धक कंपन्यांचे जाळे भारतभर उभे राहिले आहे. या कंपन्यांना टक्कर देण्यासाठी ओला कंपनीही शोरुम्सची संख्या वाढवत आहे. वाढवत आहे.