Electric Komaki SE Model: इलेक्ट्रिकवर चालणाऱ्या वाहनांची मागणी जोर धरताना दिसत आहे. याचअंतर्गत ओला कंपनीने येत्या जुलैपासून आपल्या एस1 एअर मॉडेलची डिलिव्हरी सुरू करणार असल्याची माहिती दिली आहे. तर याता इलेक्ट्रिक वाहन कंपनी Komaki ने त्यांची दुचाकी Komaki SE स्कूटर मॉडेल अपग्रेड करून बाजारात पुन्हा लॉन्च केली आहे. कोमाकी एसई स्कूटर रेंजमध्ये तीन मॉडेल्स उपलब्ध आहेत. तसेच Komaki कंपनीने SE च्या तिन्ही अपग्रेड मॉडेल्समध्ये प्रगत LiFePO4 स्मार्ट बॅटरीची सुविधा दिली आहे.
Table of contents [Show]
Komaki SE ECO मॉडेल
कोमाकी कंपनीने SE ECO मॉडेल अपग्रेड करून लाँच केले आहे. जे सुमारे 70 ते 90 किलोमीटरच्या मायलेजसह उपलब्ध आहे. त्याची एक्स-शोरूम किंमत 96 हजार 968 रुपये आहे. Komaki SE ECO मॉडेलची वेगमर्यादा सुमारे 50 ते 60 किमी आहे.
Komaki SE Sport Performance मॉडेल
तर, Komaki SE स्पोर्ट परफॉर्मन्स मॉडेलबद्दल बोलायचे झाले तर, त्याची एक्स-शोरूम किंमत सुमारे 1 लाख 38 हजार 427 रुपये आहे. या मॉडेलचा टॉप स्पीड सुमारे 75 ते 80 किमी प्रतितास आहे. तसेच मायलेज 150-180 किमी आहे.
Komaki SE Sport मॉडेल
कोमाकी एसई स्पोर्ट मॉडेल 110-140 किमीच्या रेंजसह उपलब्ध आहे. SE Sport ची सर्वोच्च गती मर्यादा 75-80 kmph आहे. त्याची एक्स-शोरूम किंमत 1 लाख 29 हजार 938 रुपये आहे.
काय आहेत सुविधा
कोमाकी कंपनीने तिन्ही अपग्रेडेड स्कूटरमध्ये प्रवाशांना बसण्यासाठी आरामदायी जागा आणि सिट्स दिल्या आहेत. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, 3000 वॅट हब मोटर, क्रूझ कंट्रोल, एलईडी फ्रंट विंकर्स, पार्किंग असिस्ट, 50 एएमपी कंट्रोलर आणि रिव्हर्स असिस्ट, 20L ची बूट स्पेस यांसारखी सर्वोत्कृष्ट वैशिष्ट्ये कोमाकी SE मध्ये ग्राहकांना ऑफर केली जात आहेत.
इतर फिचर्स सुविधा
कोमाकी कंपनी आपल्या स्कूटरमध्ये TFT स्क्रीन सुविधा देत आहे. ज्यामध्ये साउंड सिस्टीम, ऑन बोर्ड नेव्हिगेशन, राइड दरम्यान कॉलिंग ऑप्शन समाविष्ट आहे. Komaki SE मध्ये ड्युअल डिस्क ब्रेक सिस्टम देण्यात आली आहे. कंपनीने आपल्या स्कूटरमध्ये ECO मोड, स्पोर्ट मोड आणि टर्बो मोडचे गियर मोड दिले आहेत.
Advanced LiFePO4 Smart बॅटरी
Komaki SE च्या तीनही अपग्रेड केलेल्या मॉडेल्समध्ये कंपनीने अॅडव्हान्स LiFePO4 स्मार्ट बॅटरी चा वापर केलेला आहे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ते APP वर आधारित आहे. कंपनीचा दावा आहे की, ही बॅटरी 4 ते 5 तासात फुल चार्ज होऊ शकते. सोबतच ही बॅटरी आग प्रतिरोधक आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेची खात्री असते.