भारतात अनेक स्वदेशी ऑटोटेक कंपन्यांनी स्वतःचा कारभार विस्तारायला सुरुवात केली आहे. इंधनाच्या कमतरतेमुळे बहुतांश कंपन्या आता इलेक्ट्रॉनिक वाहनांच्या निर्मितीकडे वळल्या आहेत. भारतातील गुडगाव (Gurgaon) येथील ओकिनावा ऑटोटेक कंपनीने आपली नवीन ई- स्कूटर भारतीय बाजारपेठेत लॉन्च केली आहे. या नवीन ई-स्कूटरचे नाव ‘ओकिनावा ओकी 90 इव्ही’ (Okinawa Okhi 90 EV) असे आहे.
या इलेक्ट्रॉनिक स्कूटरमध्ये अनेक आधुनिक फीचर्स कंपनीकडून देण्यात आले आहेत. याची बॅटरी पूर्णतः चार्ज केल्यावर ही स्कूटर साधारणपणे 160 किलोमीटरचा प्रवास सहज पूर्ण करते. Okinawa Okhi 90 ई-स्कूटरमध्ये कोणते फीचर्स दिलेले आहेत आणि त्यासाठी ग्राहकांना किती किंमत मोजावी लागेल, जाणून घेऊयात.
'Okinawa Okhi 90 EV' चे फीचर्स जाणून घ्या
Okinawa Okhi 90 या ई-स्कूटरमध्ये रिमुव्हेबल बॅटरी देण्यात आली आहे. जी तुम्ही कोणत्याही ठिकाणी काढून चार्ज करू शकता. तसेच 3.8 किलोवॅटची इलेक्ट्रिक मोटार देखील यामध्ये ग्राहकांना देण्यात आली आहे.
या ई-स्कूटरमध्ये इको आणि स्पोर्ट्स असे दोन मोड देण्यात आले आहेत. ही स्कूटर जास्तीत जास्त 90 किलोमीटर वेगाने चालवता येते. कंपनीने असा दावा केला आहे की, ही स्कूटर पूर्णता चार्ज केल्यावर 160 किलोमीटरचे अंतर कापेल. पूर्णतः बॅटरी चार्ज करण्यासाठी साधारणपणे पाच ते सहा तासांचा वेळ द्यावा लागणार आहे.
Okinawa Okhi-90 EV च्या मागील बाजूस टेलिस्कोपिक फॉर्क्स आणि ड्युअल स्प्रिंग-लोडेड शॉक एब्जॉर्बर मिळणार आहेत. ब्रेकिंग सिस्टीमबद्दल बोलायचे झाले तर, नवीन इलेक्ट्रिक स्कूटरच्या दोन्ही टोकांना E-ABS सह डिस्क ब्रेक देण्यात आले आहेत. ज्याच्या मदतीने ही स्कूटर नियंत्रित केली जाऊ शकते.
Okhi-90 च्या नवीन आवृत्तीमध्ये डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, एलईडी लाइटिंग सिस्टम, मोबाईल चार्जिंग यूएसबी पोर्ट, 16-इंचाचे अलॉय व्हील यांसारखी सर्व वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. प्रवासादरम्यान आवश्यक वस्तू घेऊन जाण्यासाठी स्कूटरला 40-लिटर बूट स्पेस मिळते.
किंमत जाणून घ्या
'Okinawa Okhi 90' ई-स्कूटरची एक्स शोरूम किंमत 1.86 लाख रुपये आहे. ओकिनावा ऑटोटेकचे एमडी आणि संस्थापक जितेंद्र शर्मा यांनी ही इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च करताना मत मांडले की, नवीन एडिशनची ई- स्कूटर अपडेटेड बॅटरी मोटर आणि सर्वोत्तम कनेक्टिव्हिटीच्या तंत्रज्ञानाने तयार करण्यात आली आहे. या ई-स्कुटरला ग्राहक भरभरून प्रेम देतील, अशी अपेक्षा आहे.
Source: hindi.financialexpress.com