पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे लोकांचा कल सीएनजी (CNG) आणि इलेक्ट्रिक गाड्यांकडे (EV) मोठ्या प्रमाणात वळला आहे. त्यामुळे अनेक कंपन्यांनी आता इलेक्ट्रिक गाड्यांची निर्मिती आणि विक्रीवर भर देण्यास सुरुवात केली आहे. इलेक्ट्रिक सेक्टरमधील 'लेक्ट्रिक्स' (Lectrix) कंपनीने भारतीय बाजारपेठेत नुकतीच इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च केली. कंपनीने ही स्कूटर दोन व्हेरिएंटमध्ये लॉन्च केली आहे. या व्हेरियंटचे नाव LXS G2.0 आणि LXS G3.0 आहे.
या इलेक्ट्रिक स्कूटरची बुकिंग सुरू झाली आहे. कंपनीकडून ग्राहकांना फक्त 499 रुपयांमध्ये या स्कूटरची बुकिंग करता येणार आहे. पुढील महिन्यात म्हणजे 16 ऑगस्ट 2023 पासून या इलेक्ट्रिक स्कूटरची डिलेव्हरी दिली जाणार आहे. चला तर मग या स्कूटरची बुकिंग ऑफर, किंमत आणि फीचर्सबद्दल माहिती जाणून घेऊयात.
बुकिंग ऑफर
इलेक्ट्रिक स्कूटर निर्माती लेक्ट्रिक्स कंपनीने आपल्या LXS G2.0 आणि LXS G3.0 या नवीन स्कूटर दोन दिवसांपूर्वी लॉन्च केल्या आहेत. त्या दिवसापासूनच या स्कूटरची बुकिंग सुरू झाली आहे. जास्तीत जास्त ग्राहकांनी या स्कूटरची बुकिंग करण्यासाठी कंपनीकडून एक आकर्षक ऑफर ठेवण्यात आली आहे.
कंपनीने केवळ 499 रुपयांमध्ये या दोन्ही स्कूटर्स बुक करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. त्यासाठी ग्राहकांना कंपनीच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल आणि त्या ठिकाणी नोंदणी करून 499 रुपये ऑनलाईन पद्धतीने जमा करावे लागतील. किंवा देशभरातील कंपनी शोरूमला भेट देऊन बुकिंग करावी लागेल. संपूर्ण देशात कंपनीची एकूण 100 शोरूम कार्यरत आहेत.
पहिल्या 10,000 ग्राहकांसाठी विशेष ऑफर
लेक्ट्रिक्स LXS G2.0 या इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत कंपनीने 1,03,000 रुपये निश्चित केली आहे. तर LXS G3.0 ची किंमत अजून जाहीर करण्यात आलेली नाही. महत्त्वाचं म्हणजे लेक्ट्रिक्स LXS G2.0 स्कूटर खरेदी करणाऱ्या पहिल्या 10,000 ग्राहकांना ही स्कूटर केवळ 97,999 रुपयांना खरेदी करता येणार आहे. ही स्कूटर खरेदी करण्यासाठी ग्राहक कंपनीच्या अधिकृत शोरूमला भेट देऊ शकतात.
फीचर्स जाणून घ्या
Lectrix LXS G2.0 आणि LXS G3.0 या दोन्ही स्कूटरमध्ये कंपनीने आधुनिक फीचर्स दिले आहेत. ज्यामध्ये नेव्हिगेशन,फॉलो मी हँडलॅम्प, की-लेस एक्सेस आणि एसओएस अलर्ट यासारखे फीचर्स मिळणार आहेत. या दोन्ही व्हेरियंटचा लुक अतिशय प्रीमियम असल्याने तो ग्राहकांना नक्कीच आवडेल,अशी कंपनीला आशा आहे.
Lectrix LXS G2.0 या स्कूटरमध्ये कंपनीने 2.3kWh युनिट बॅटरी क्षमता दिली असल्यामुळे ती एकदा पूर्णतः चार्ज केली, की 80 किलोमीटरचे मायलेज देईल. तर Lectrix LXS G3.0 या स्कूटरमध्ये 3kWh युनिट बॅटरी क्षमता देण्यात आल्यामुळे एकदा चार्ज केली की, ही स्कूटर 105 किलोमीटरचे मायलेज देणार असल्याचा दावा कंपनीने केला आहे.