सध्या इलेक्ट्रिक वाहनांच्या (EV) किमती खूपच जास्त आहेत. त्यातच केंद्र सरकारकडून देण्यात येणारी FAME-2 ही सबसिडी देखील बंद करण्यात आली आहे.त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशाला इलेक्ट्रिक वाहन खरेदी थोडीशी महागच आहे. पंरतु तुम्ही जर इलेक्ट्रिक दुचाकी वाहन घेण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला स्वस्तात खरेदीची संधी आहे. ऑटोमोबाई क्षेत्रातील नावाजलेल्या बजाज कंपनीने आपल्या चेतक या इेलेक्ट्रिक (Bajaj Chetak electric scooter) स्कूटरच्या किमतीमध्ये मोठी कपात केली आहे.
22 हजार रुपये कपात
इलेक्ट्रिक वाहन निर्मितीमध्येही पाऊल ठेवलेल्या बजाज ऑटोने त्यांच्या चेतक या इलेक्ट्रिक स्कूटरच्या किमतीमध्ये मोठी कपात करण्याची घोषणा केली आहे. चेतक या इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत यापूर्वी 1 लाख 52 हजार रुपये इतकी होती. त्यामध्ये कपात केल्याना ग्राहकांना ही स्कूटर आता 1 लाख 30 हजार रुपयांना खरेदी करता येणार आहे. कंपनीने चेतकच्या एक्स-शोरूम प्राईसमध्ये तब्बल 22 हजार रुपये कपात केले आहेत.
इतर इलेक्ट्रिक वाहनांपेक्षा स्वस्त-
या किंमत कपातीनंतर बजाज चेतक ही इतर इलेक्ट्रिक दुचांकी पेक्षा स्वस्तात उपलब्धत होत आहे. मार्केटमध्ये सध्या Ather 450X या इलेक्ट्रिक दुचाकीची किंमत 1.38 लाख रुपये आहे. तर Ola S1 Pro Gen 2 ची मार्केट प्राईज ही 1.47 लाख इतकी आहे. त्यामुळे ग्राहकांना इलेक्ट्रिक स्कूटर घ्यायची असेल तर बजाजच्या चेतकचा पर्याय स्वस्तात उपलब्ध आहे.
बजाज चेतकीची वैशिष्ट्ये
बजाजच्या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये 3kWh क्षमतेची लिथियम-आयन बॅटरी देण्यात आली आहे. तसेच या चेतक स्कूटरला 3.8kW ची इलेक्ट्रिक मोटार जोडण्यात आलेली आहे. ही स्कूटर एकदा चार्ज केल्यानंतर जवळपास 95 किमी पर्यंत धावू शकते. या गाडीची बॅटरी पूर्णपर्ण चार्ज होण्यासाठी 5 तास लागतात. या स्कूटरच्या चाकांबाबत बोलायचे झाल्यास दुचाकीला 12 इंचांचे अलॉय व्हील्स देण्यात आले आहेत. तर दोन्ही टायर्स हे ट्युबलेस आहेत.