Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

eCourts Project: भारतातील न्यायालये पेपरलेस होणार; 7 हजार कोटींच्या eCourts प्रकल्पाला कॅबिनेटची मंजूरी

इ-कोर्ट प्रकल्पाच्या तिसऱ्या टप्प्याला केंद्रीय कॅबिनेटने नुकतीच मंजूरी दिली. या प्रकल्पाच्या तिसऱ्या टप्प्यासाठी 7 हजार 200 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. याअंतर्गत न्यायव्यवस्था हायटेक करण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येणार आहेत. डिजिटल कोर्ट म्हणजे काय? जाणून घ्या.

Read More

TATA Digital India Fund: डिजिटल इंडियाच्या पार्श्वभूमीवर सुरू झालेल्या या फंडात अवघ्या 150 रुपयांत करा गुंतवणूक

TATA Digital India Fund: टाटा डिजिटल इंडिया फंडाने सुरूवातीपासून गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना आतापर्यंत 20.45 टक्के परतावा दिला आहे. तर मागील 5 वर्षांत 20.28 टक्के रिटर्न्स दिले आहेत. या फंडमध्ये एसआयपीच्या माध्यमातून अवघ्या 150 रुपयांत गुंतवणूक सुरू करता येते.

Read More

Indian Startup Proxgy कंपनीने फेरीवाल्यांसाठी आणले 'युपीआय वॉच'; किंमत अगदी परवडणारी

प्रॉक्झी या स्टार्टअप कंपनीने फेरीवाल्यांचा व्यवहार डिजिटल आणि आणखी जलद व्हावा यासाठी Kadi UPI Watch लॉन्च केले. या Kadi UPI Watch ची किंमत 1 हजार रुपयांच्या आत ठेवली आहे. स्मार्टफोनवर हजारो रुपये खर्च करण्याऐवजी या 1 हजार रुपयांच्या वॉचमधून डिजिटल पेमेंट स्वीकारता येणार आहे.

Read More

Digital Farming : डिजिटल शेती म्हणजे काय? त्यातून शेतकऱ्यांना कशी मदत होईल? जाणून घ्या

Digital Farming : भारत सरकारने देशातील कृषि क्षेत्र वाढवण्यासाठी Digital Agriculture and AI ची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे. आता ही डिजिटल शेती काय आहे आणि शेतकरी AI च्या मदतीने शेती कशी करता येऊ शकते? जाणून घेऊया

Read More

E-Saras: महिला बचत गटांनी बनवलेल्या वस्तूंची आता थेट ऑनलाइन विक्री

दीनदयाल उपाध्याय अंत्योदय योजना-राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियानांतर्गत बचत गटातील महिलांनी बनवलेल्या उत्पादनांच्या ऑनलाइन विक्रीसाठी ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. Digital India या अभियानाचा भाग म्हणून भारतीय हस्तकला, कलाकुसर यांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत उपलब्ध करून देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

Read More

Job opportunities: नोकरकपातीचं टेन्शन? आता 'या' क्षेत्रात निर्माण होत आहेत नव्या संधी

Job opportunities: नोकरकपातीच्या या दिवसांमध्ये काही क्षेत्रात नव्या रोजगाराच्या संधी निर्माण होत आहेत. एकीकडे माहिती तंत्रज्ञान म्हणजेच आयटी क्षेत्रात सर्वात जास्त लेऑफ म्हणजेच नोकरकपात केली जात आहे. तर या क्षेत्राशी संबंधित काही विभागांत रोजगार उपलब्ध होण्याची आशा निर्माण झाली आहे.

Read More

Chinese Business in India: भारतातील चिनी कंपन्यांना शोधावे लागणार भारतीय मॅनेजर, केंद्र सरकारच्या सूचना

चिनी मोबाईल फोन उत्पादक कंपन्यांना भारतात व्यवसाय करायचा असेल तर त्यांना त्यांच्या स्थानिक कामकाजासाठी भारतीय भागीदार निवडावे लागतील, असे भारत सरकारने स्पष्ट केले आहे. त्याशिवाय चायनीज कंपन्यांना भारतात उद्योग सुरु करता येणार नाही असे देखील केंद्र सरकारने म्हटले आहे.

Read More

Apple Store India : एकीकडे ॲपल स्टोर सुरू होत असताना ॲपल प्रोडक्ट्सची विक्रीही वाढली

Apple Store India : आज मुंबईतील BKC इथं आणि 20 एप्रिलला दिल्लीतील साकेतमध्ये ॲपलची स्वत:ची दोन रिटेल स्टोअर सुरू होत आहेत. या उद्घाटन कार्यक्रमाला Apple चे सीइओ टीम कूक हे देखील उपस्थित राहणार आहे. त्यासाठी काल टिम कुक भारतात दाखल झाले. तर या सगळ्या घडामोडींचा परिणाम भारतात ॲपलची विक्री वाढण्यातही झालेला दिसून येत आहे.

Read More

Indian Economy: डिजिटल इंडिया आणि कौशल्य विकास कार्यक्रमातून देशाची अर्थव्यवस्था बळकट करणार- अर्थमंत्री निर्मला सीतारमण

Nirmala Sitharaman: गेल्या काही वर्षात भारतात झपाट्याने काही सकारात्मक बदल होताना दिसत आहेत. भारत सरकार अनेक लोककल्याणकारी योजना राबवत आहे. नागरीकांना राहण्यासाठी पक्की घरे, पिण्यासाठी स्वच्छ पाणी, वीज आणि चांगले रस्ते उपलब्ध करून देण्यात येत आहेत. शहरे गावांना जोडली जावीत यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत, अशी माहिती अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी दिली आहे.

Read More

Digital India: आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने भारताच्या डिजिटल अर्थव्यवस्थेचं केलं कौतुक, इतर देशांना बोध घेण्याचा दिला सल्ला

Digital India: आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने म्हटले आहे की भारताने व्यापक दृष्टिकोनातून जागतिक दर्जाची सार्वजनिक डिजिटल पायाभूत सुविधा तयार केली आहे. भारताची ही कृती इतर देशांसाठी अर्थव्यवस्था आणि लोकांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणण्यासाठी एक धडा ठरू शकते असे मत देखील आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने नोंदवले आहे.

Read More

Digilocker : आता डिजिलॉकरद्वारे तुम्ही करु शकता EPFO चे काम, काय आहे संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या

EPFO : दिवसेंदिवस संपूर्ण जग डिजिटायजेशन कडे वळत आहे. आपली सगळी कामे कुठेही बसुन एका क्लिकवर व्हायला पाहीजेत, अशा नागरिकांच्या अपेक्षा असते. हीच बाब लक्षात घेता, भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाने (MeitY) DigiLocker अॅप लाँच केले आहे. या अॅपद्वारे तुम्ही तुमची सर्व महत्वाची कागदपत्रे तुमच्या मोबाईलमध्ये डिजिटली सुरक्षित ठेवू शकता.

Read More

PrimeBook Laptop : आयआयटी दिल्लीच्या माजी विद्यार्थ्यांनी उभारली टेक कंपनी; 15 हजारांमध्ये तयार केला लॅपटॉप

PrimeBook Laptop: जागतिक पातळीवर टेक उत्पादनांच्या किमती वाढल्या आहेत या काळात तुम्ही कधी 15,000 रुपयांचा लॅपटॉप पाहिला आहे का? जे Android या ऑपरेटिंग सिस्टिमवर काम करते आणि लॅपटॉपचा वापराचा अनुभव मिळतो! आयआयटी दिल्लीच्या (IIT Delhi) प्रीमियर इन्स्टिट्यूटमधून उत्तीर्ण झालेल्या दोन विद्यार्थ्यांनी अश्याच उपकरणाची निर्मिती केली आहे.

Read More