Digital Farming : दिवसेंदिवस तंत्रज्ञानाचा वापर वाढत चालला आहे. असे कोणतेही क्षेत्र आता राहिलेले नाही जिथे तंत्रज्ञान पोहचलेले नसेल. शेती क्षेत्रामध्येही आता डिजिटलायझेशन आलेले आहेत. भारतातील क्षेत्र हे आधीच विकसित आहे. पण सरकार त्यावर अजून काम करत आहे. भारत सरकारने देशातील कृषी क्षेत्र वाढवण्यासाठी डिजिटल अॅग्रीकल्चर आणि एआयची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे. आता ही डिजिटल शेती काय आहे आणि शेतकरी AI च्या मदतीने शेती कशी करता येऊ शकते? जाणून घेऊया
डिजिटल शेती कशाला म्हणतात?
शेतकरी समृद्ध होण्याकरिता शासनाकडून अनेक प्रयत्न केले जात आहे. त्यातमधीलच एक म्हणजे डिजिटल शेती. डिजिटल शेतीला चालना देण्यासाठी, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने खाजगी कंपन्यांसोबत पाच सामंजस्य करार केले आहेत. या अंतर्गत देशातील 5.5 कोटी शेतकऱ्यांचा डेटाबेस आहे, ज्यांची मदत डिजिटल शेतीसाठी घेतली जात आहे. ज्यामध्ये कृषी आणि सरकारी योजनांची योग्य माहिती डिजिटल माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवली जाणार आहे.
त्याचबरोबर खासगी कंपन्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांवर चांगला नफा कसा मिळवून देता येईल यावरही काम सुरू आहे. डिजिटल शेतीमुळे चांगल्या होत असलेल्या काही गोष्टी आहेत. शेतकऱ्यांना चांगले उत्पादन, उत्तम माती परीक्षण, शेतीसाठी रसायनांचा कमी वापर, कमी पाण्यात चांगली शेती आणि आर्थिकदृष्ट्या मजबूत शेतकरी या सर्व बाबतीत लाभ मिळणार आहे. शासनाच्या अनेक योजनांचे लाभ शेतकऱ्यांना मिळत आहे. पण डिजिटल शेतीमुळे शेतकरी अधिक सुखी आणि समृद्ध होणार आहे.
डिजिटल शेतीचे फायदे कोणते?
- नवीन तंत्रज्ञानाच्या वापरामुळे शेतीची उत्पादकता वाढते
- उत्पादन खर्च कमी होऊ शकते.
- आधुनिक मशीनमुळे मातीची झीज रोखण्यास मदत होऊ शकते
- पीक उत्पादनात रासायनिक वापर कमी करते
- जलस्रोतांच्या प्रभावी आणि कार्यक्षम वापरास प्रोत्साहन देता येणार
- शेतकऱ्यांचा सामाजिक-आर्थिक स्तर उंचावण्यास मदत होऊ शकते
- सुरक्षिततेची उपकरणे वापरून कामगारांची सुरक्षितता वाढवण्यास मदत होते.