भारतातील प्रॉक्झी या स्टार्टअप कंपनीने फेरीवाल्यांचा व्यवहार डिजिटल आणि आणखी जलद व्हावा यासाठी Kadi UPI Watch लॉन्च केले. प्रॉक्झी ही एक इनोव्हेटीव्ह आयटी सोल्युशन सेवा पुरवणारी कंपनी आहे. या कंपनीने एक असे वॉच डेव्हलप केले आहे. ज्याच्या मदतीने फेरीवाले डिजिटल पद्धतीने पेमेंट स्वीकारू शकतात.
प्रॉक्झीचे संस्थापक पुलकित अहुजा हे असून त्यांनी हे प्रोडक्ट डेव्हलप केले आहे. सध्या या Kadi UPI Watch ची किंमत 1 हजार रुपयांच्या आत ठेवली आहे. पुलकित यांचे म्हणणे आहे की, आजही आपल्याकडील लोकांकडे स्मार्टफोन घेण्यासाठी पुरेसे पैसे नाहीत. ते संपर्कासाठी साधा फीचर फोन वापरतात. त्यामुळे असे लोक अजून डिजिटल व्यवहारापासून लांब आहेत. त्यांना जर डिजिटल भारत (Digital India) या कार्यक्रमात सामावून घ्यायचे असेल तर त्यांना परवडेल असे उपकरण बाजारात आणले पाहिजे. हीच गरज लक्षात घेऊन प्रॉक्झीने Kadi UPI Watch लॉन्च केले.
पुलकित अहुजा हे शार्क टँक इंडियाच्या पहिल्या सिझनमध्ये येऊन गेले होते. तिथे त्यांनी पार्टनर इंद्रजित सिंग मक्कर यांच्यासोबत या शोमधून 1 कोटी रुपयांचा फंड मिळवला होता.
सध्या मार्केटमध्ये इलेक्ट्रिसिटीवर चालणारी स्पीकरची सेवा उपलब्ध आहे. पण ही सेवा फेरीवाल्यांना वापरता येत नाही. त्यामुळे खास फेरीवाल्यांसाठी इलेक्ट्रिसिटीचा वापर करणारे Kadi UPI Watch आणले आहे. या वॉचमध्ये पेमेंट गेटवे पर्यायासह एक वन-टच क्यूआर डिस्प्ले सुद्धा देण्यात आला आहे. तसेच हे वॉच वापरणारे अगदी 1 रुपयात ऑनलाईन आपले हेल्थ स्टेट्स सुद्धा जाणून घेऊ शकतात. या वॉचमध्ये कंपनी अजून इतर सेवा देण्याचा विचार करत आहे. लवकरच कंपनी याचे अॅपसुद्धा आणण्याचा विचार करत आहे.