TATA Digital India Fund: टाटा म्युच्युअल फंड हाऊसने टाटा डिजिटल इंडिया फंडची सुरूवात 28 डिसेंबर, 2015 रोजी झाली होती. 2015 मध्ये केंद्र सरकारने डिजिटल इंडिया हा कार्यक्रम जाहीर केला होता. त्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर टाटा म्युच्युअल फंड हाऊसने टाटा डिजिटल इंडिया फंडची सुरूवात केली होती.
टाटा डिजिटल इंडिया फंडाने गुंतवणूकदारांना चांगले रिटर्न्स मिळवून दिले आहेत. हा फंड सुरू झाल्यापासून गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना आतापर्यंत 20.45 टक्के परतावा मिळाला आहे. तर एका वर्षाच्या गुंतवणुकीवर 19.6 टक्के रिटर्न्स दिले आहेत. या फंडाची इतर वैशिष्ट्ये आणि सर्वसामान्य गुंतवणूकदारांना किमान किती रुपयांपासून गुंतवणूक करता येते, हे जाणून घेऊ.
Table of contents [Show]
टाटा डिजिटल इंडिया फंडची वैशिष्ट्ये
करंट एनएव्ही (Current NAV)
टाटा डिजिटल इंडिया फंडाच्या डायरेक्ट प्लॅनचा एनएव्ही (नेट अॅसेट व्हॅल्यू) 42.13 रुपये (दि. 13 सप्टेंबरनुसार) आहे.
परतावा (Return)
टाटा म्युच्युअल फंड समुहातील या फंडाने वेगवेगळ्या कालावधीनुसार गुंतवणूकदारांना विविध प्रकारे रिटर्न्स दिले आहेत. जसे की, एका वर्षाच्या गुंतवणुकीवर 19.6 टक्के, 3 वर्षांच्या गुंतवणुकीवर 30.13 टक्के, 5 वर्षांत 20.28 टक्के आणि फंड सुरू झाल्यापासून गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांना 20.45 टक्के रिटर्न्स दिले आहेत.
फंड साईज (Fund Size)
टाटा डिजिटल इंडिया फंडाच्या डायरेक्ट प्लॅन अंतर्गत 31 जुलै, 2023 च्या रेकॉर्डनुसार 7,537.98 कोटी रुपयांची मालमत्ता जमा आहे.
खर्चाचे प्रमाण (Expense Ratio)
31 जुलै, 2023 च्या रेकॉर्डनुसार, टाटा डिजिटल फंडाच्या डायरेक्ट प्लॅनच्या खर्चाचे प्रमाण 0.33 टक्के इतके आहे.
एक्झिट लोड (Exit Load)
एक्झिट लोड म्हणजे मुदतीपेक्षा कमी कालावधीत गुंतवणुकीतून बाहेर पडल्यास त्यावर दंड आकारला जातो. टाटा डिजिटल फंडामध्ये गुंतवणूक केल्यानंतर 30 दिवसांच्या आत त्यातून बाहेर पडला तर त्यावर 0.25 टक्के एक्झिट लोड म्हणून दंड आकारला जातो.
किमान गुंतवणूक (Minimum Investment)
टाटा डिजिटल इंडिया फंडमध्ये एसआयपीच्या माध्यमातून गुंतवणूक करायची असेल तर किमान 150 रुपयांपासून गुंतवणूक करता येते. त्याचबरोबर एकदम गुंतवणूक करायची असल्यास किमान 5000 रुपयांची गुंतवणूक करता येते.
टाटा डिजिटल इंडिया फंडची गुंतवणूक
टाटा डिजिटल इंडिया फंडने टेक्नॉलॉजीमधील टॉपच्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे. त्यामुळे या फंडचा बेस स्ट्राँग आहे. टॉपच्या कंपन्यांमध्ये इन्फोसिस लिमिटेड, टाटा कन्सलटन्सी, टेक महिन्द्रा, लार्सन अॅण्ड टुब्रो इन्फोटेक, एचसीएल टेक्नॉलॉजी आणि पर्सिस्टन्ट सिस्टम्स लिमिटेड यासारख्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली.
या फंडमध्ये जमा होणारा सर्वाधिक निधी हा 97.99 टक्के इक्विटीमध्ये तर 2.01 टक्के इतर ठिकाणी गुंतवला गेला आहे. त्यामुळे हा फंड हाय रिस्क कॅटेगरीमध्ये मोडला जातो. पण यातून परतावा सुद्धा जास्त मिळण्याची अपेक्षा आहे. टाटा डिजिटल इंडिया फंडाबरोबरच मार्केटमधील आदित्य बिर्ला सन लाईफ डिजिटल इंडिया फंड, आयसीआयसीआय प्रुडेन्टिशिअल टेक्नॉलॉजी फंड, एसबीआय टेक्नॉलॉजी ऑपोर्च्युनिटी फंड आणि फ्रॅन्कलिन इंडिया टेक्नॉलॉजी फंड यांच्यासोबत स्पर्धेमध्ये आहेत.
(डिसक्लेमर : म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी सेबी अधिकृत आर्थिक सल्लागारांचा सल्ला घ्यावा. या बातमीद्वारे वाचकांना फक्त माहिती दिली जात आहे. 'महामनी' म्युच्युअल फंड खरेदी-विक्रीचा सल्ला देत नाही.)