Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लेटेस्ट न्यूज

Chit Fund: चिट फंड म्हणजे काय? आणि ते कसे काम करते?

Chit Fund: अत्यंत कमी वेळेत गुंतवणूक केलेले पैसे दुप्पट करून देतो, किंवा साखळी पद्धतीने लोकांकडून मोठ्या प्रमाणात पैसे जमा करून त्यांची फसवणूक करणाऱ्या स्कीमला चिट फंड म्हटले जाते. पण हे तेवढेच सत्य नाही. चला तर चिट फंडबद्दलची इत्यंभूत माहिती जाणून घेऊ.

Read More

Karnataka High Court Decision : ऑनलाइन ऑटोरिक्षा बुकिंगमध्ये पाच टक्के सेवा शुल्क मर्यादेवर स्थगिती, उच्च न्यायालयाचा निर्णय

Karnataka High Court Decision : ऑनलाइन ऑटोरिक्षा बुकिंगमध्ये 5 टक्के सेवा शुल्क मर्यादेवर स्थगिती आणण्याचा निर्णय झाला आहे. कर्नाटक उच्च न्यायालयाने याबाबतचा निर्णय दिला आहे. ऑटो रिक्षा संबंधी या विषयाबाबत कंपन्यांनी सांगितले की, 10 टक्के सेवा शुल्क आकारले तरी त्यांचे नुकसान होईल. आपल्या युक्तिवादात त्यांनी केंद्र सरकारने 20 टक्के सेवा शुल्काला मंजुरी दिल्याचा दाखला दिला.

Read More

Wheat Price : गव्हाने 3000 रुपये प्रतिक्विंटलचा टप्पा ओलांडला, पीठही महागले

शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. देशात गव्हाच्या दराने प्रतिक्विंटल 3000 रुपयांचा टप्पा (Wheat crossed the Rs 3000 per quintal mark) ओलांडला आहे. त्याचबरोबर गहू महाग होताच पिठाच्या दरातही पुन्हा एकदा वाढ झाली आहे.

Read More

Indian Economy : देशाचे दरडोई उत्पन्न 2047 पर्यंत 10 हजार डॉलर्स, GDP 20 हजार ट्रिलीयन डॉलर, जाणून घ्या कुणाचा अंदाज

Indian Economy : देशाचे दरडोई उत्पन्न 2047 पर्यंत 10 हजार डॉलर्स इतके होईल तर जीडीपी 20 हजार ट्रिलीयन डॉलरच्या जवळ पोचेल. असा अंदाज विवेक देबरॉय ( Bibek Debroy) यांनी व्यक्त केला आहे. एका कार्यक्रमादरम्यान बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे.

Read More

Is Your Bank Safe : RBI ने सादर केली देशातल्या सुरक्षित बँकांची यादी 

Is Your Bank Safe : रिझर्व्ह बँकेनं देशातल्या सुरक्षित आणि विश्वासार्ह बँकांची एक यादी अलीकडेच प्रसिद्ध केली आहे. 2022 मधल्या कामगिरीच्या आधारे मध्यवर्ती बँकेनं आपली आधीची यादी नव्याने प्रसिद्ध केली आहे.

Read More

Budget 2023: नवीन अर्थसंकल्पाने मध्यमवर्गाच्या अपेक्षा पूर्ण होतील का? अर्थमंत्री काही दिलासा देणार का?

देशाचा नवा अर्थसंकल्प (Budget 2023) सादर करण्याची तारीख जवळ आली आहे. 1 फेब्रुवारी 2023 रोजी देशाच्या संसदेत अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman, Finance Minister) हे महत्त्वाचे काम करणार आहेत. अशा स्थितीत मध्यमवर्गीय करदात्यांच्या मनात पुन्हा प्रश्न निर्माण झाला आहे की, या वेळी अर्थमंत्री त्यांना काही दिलासा देण्याचा विचार करतील का?

Read More

Shapoorji Pallonji's Joyville Pune: शापूरजी पालोनजी ग्रुप गृहनिर्माण प्रकल्पासाठी 750 कोटींची गुंतवणूक करणार

पुण्यातील हडपसर येथे शापूरजी पालोनजी ग्रुप एक नवीन गृहनिर्माण प्रकल्प घेऊन येत आहे. जागतिक पातळीवर गृहनिर्माण व्यवसायात अग्रेसर असलेल्या कंपन्या देखील यात गुंतवणूक करणार आहेत.

Read More

Maruti Suzuki Car Export: मारुती सुझुकीच्या गाड्यांची निर्यात 28 टक्के वाढली

2022 वर्षात कंपनीने 2 लाख 63 हजार 68 गाड्या परदेशात निर्यात केल्या आहेत. कंपनीने या वर्षी निर्यातीचा उच्चांक गाठला आहे. मारुतीने 2021 साली सुमारे दोन लाख गाड्या निर्यात केल्या होत्या. त्यात मागील वर्षी मोठी वाढ झाली आहे.

Read More

Hero Motors Investment in EV: हिरो मोटर्स इलेक्ट्रिक व्हेईकल श्रेणीत स्थान बळकट करणार, 1500 कोटींची गुंतवणूक

Hero Motors Investment in EV: दुचाकी निर्मितीमधील आघाडीची कंपनी हिरो मोटर्सने इलेक्ट्रिक व्हेइकल बाजारपेठेत स्थान बळकट करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीकडून इलेक्ट्रिक व्हेईकल क्षेत्रात 1500 कोटींची गुंतवणूक करण्याचे नियोजन केले आहे.

Read More

Income Tax Department :7.7 लाख कोटी रुपयांची थकबाकी वसूल करण्यासाठी आयकर विभागाचे प्रयत्न

येत्या आर्थिक वर्षात वित्तीय तूट भरून काढण्यासाठी आणि जीडीपी दर 6.4% पर्यंत घेऊन जाण्याचे सरकारचे उद्दिष्ट गाठण्यासाठी थकबाकीदारांकडून कर्जवसुली करण्याचे काम कर विभागाने हाती घेतले आहे.

Read More

Impact of Covid on FMCG: कोविड लाटेचा FMCG क्षेत्रावर परिणाम होणार?

चीनमध्ये कोरोनाचा फैलाव वाढत असून भारतामध्येही कोरोनाची लाट येऊ शकते, अशी भीती वर्तवली जात आहे. कोविड प्रसारामुळे देशाची अर्थव्यवस्था, उद्योग आणि नागरिकांवरही परिणाम होतो. जर भारतामध्ये पुन्हा कोरोनाची लाट आली तर FMCG क्षेत्रावर परिणाम होणार नाही, असे मत या क्षेत्रातील कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे.

Read More