शापूरजी पालोनजी ग्रुप (Shapoorji Pallonji Group) पुण्यात एक नवीन निवासी प्रकल्प घेऊन येत आहे. या नवीन निवासी प्रकल्पाच्या विकासासाठी सुमारे 750 कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे आहे. Joyville Shapoorji Houseing, नावाने असणाऱ्या या निवासी प्रकल्पांच्या विकासासाठी शापूरजी पालोनजी समुहासोबत एडीबी (EDB), आईएफसी (IFC) और एक्टिस (Actis) हे उद्योगसमूह देखील असणार आहेत, सगळे मिळून सुमारे 20 करोड डॉलर इतके पैसे या प्रकल्पात गुंतवणार आहेत.
सुमारे नऊ एकरच्या विस्तृत प्रकल्पात कंपनीने डुप्लेक्स आणि पेंटहाऊससह सुमारे 1,350 निवासी युनिट्स विकसित करण्याचा संकल्प केला आहे. 750 कोटी रुपयांच्या या प्रकल्पातून अंदाजे 1,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त महसूल उत्पन्न होईल असा अंदाज कंपनीतर्फे वर्तवला गेला आहे.
या गृह प्रकल्पात स्विमिंग पूल, स्पा, स्टीम रूम, जिम, कॅफे, मुलांसाठी खेळण्याची जागा, इनडोअर गेमिंग झोन, वर्क फ्रॉम-होम एरिया, स्क्रीनिंग रूम आणि गेस्ट हाऊस सारख्या सुविधा प्रदान केल्या जाणार आहेत. सोबतच या प्रकल्पात नैसर्गिक वातावरण अबाधित राहील याची पुरेपूर काळजी घेतली जाईल असेही कंपनीकडून सांगण्यात आले आहे.