Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

New Emission Norms : कंपन्या बंद करणार ‘या’ 17 कारचे उत्पादन, पहा यादी

New Emission Norms

एप्रिल 2023 पासून, वाहनांच्या उत्सर्जनाशी संबंधित नवीन नियम (New Emission Norms) भारतात लागू होतील. BS6 उत्सर्जन नियमांचा हा दुसरा टप्पा असेल. याला RDE किंवा रिअलटाइम ड्रायव्हिंग एमिजन नॉर्म्स (Realtime Driving Emission Norms) म्हटले जाईल. हा नियम लागू झाल्यानंतर अनेक कंपन्या आपली डिझेल वाहने बंद करणार आहेत. त्याचबरोबर पेट्रोल कारमध्येही काही बदल करण्यात येणार आहेत. प्रथम नवीन नियमांबद्दल जाणून घेऊया.

रिअल-टाइम ड्रायव्हिंग एमिशन म्हणजे काय?

खरं तर आत्तापर्यंत कारच्या उत्सर्जन पातळीची प्रयोगशाळेत चाचणी करण्यात आली होती परंतु अनेक वेळा वाहने वापरताना उत्सर्जन पातळी वाढल्याचे दिसून आले आहे. अशा परिस्थिती लक्षात घेऊन सरकारने चारचाकी प्रवासी आणि व्यावसायिक वाहनांमधील उत्सर्जन पातळी वेळोवेळी तपासण्याचा नियम केला आहे. त्यासाठी वाहनांमध्ये उपकरणे बसविण्यात येणार आहेत. प्रगत उत्सर्जन मानदंडांची (Advance Emission Norms) पूर्तता करण्यासाठी, वाहनांमध्ये एक उपकरण बसवले जाईल जे वाहन चालत असताना उत्सर्जन पातळीचे निरीक्षण करण्यास सक्षम असेल. अशा परिस्थितीत कारच्या उत्पादनाचा खर्च वाढू शकतो. यामुळेच बहुतांश कंपन्या आपली डिझेल वाहने बंद करण्याचा विचार करत आहेत.

कंपन्या एप्रिल 2023 पासून ही वाहने बंद करू शकतात

विविध मीडिया रिपोर्ट्सनुसार, मारुती आपली लोकप्रिय कार अल्टो 800 एप्रिल 2023 पासून बंद करू शकते. विक्रीच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर असलेली ह्युंदाई तिच्या i20 डिझेल व्हेरिएंट आणि Verna डिझेल प्रकाराचे उत्पादन थांबवू शकते. त्याचप्रमाणे, टाटा अल्ट्रोझ डिझेल देखील नवीन आर्थिक वर्षापासून बंद केली जाऊ शकते. महिंद्रा आपली Marazzo, Alturas G4 आणि KUV1OO बंद करू शकते. स्कोडा त्याच्या लोकप्रिय सेडान ऑक्टाव्हिया आणि सुपर्ब बंद करू शकते. Renault Kwid 800, Nissan Kicks, Toyota Innova Crysta Petrol देखील बंद होणार आहेत. होंडा आपली 4th Gen City, 5th Gen City डिझेल, Amaze Diesel, Jazz आणि WR-V बंद करू शकते.

या गाड्यांचे उत्पादन होणार बंद

  • होंडा जाझ
  • होंडा WR-V
  • होंडा अमेझ डिझेल
  • होंडा सिटी फोर्थ जनरेशन
  • होंडा सिटी 5 वी जनरल डिझेल
  • महिंद्रा अल्ट्रॉझ G4
  • महिंद्रा मराझो
  • महिंद्रा KUV100
  • स्कोडा सुपर्ब
  • स्कोडा ऑक्टाव्हिया
  • Hyundai i20 डिझेल
  • ह्युंदाई व्हर्ना डिझेल
  • टाटा अल्ट्रोझ डिझेल
  • मारुती सुझुकी अल्टो 800
  • रेनॉल्ट क्विड 800
  • निसान किक्स
  • टोयोटा इनोव्हा क्रिस्टा पेट्रोल