येत्या तीन महिन्यांत 19.35 लाख कोटी रुपयांच्या एकूण थकबाकीपैकी सुमारे 40 टक्के वसुली करण्याचे उद्दिष्ट कर विभागासमोर असणार आहे. सुमारे 7.7 लाख कोटी रुपये वसूल करण्याचे जोरदार प्रयत्न विभागातर्फे केले जाणार आहेत.
2022-23 वर्षातले आर्थिक उद्दिष्टे गाठता यावे यासाठी थकबाकी असलेल्या ग्राहकांकडून वसुली करण्याचे दिव्य कर विभागातील कर्मचाऱ्यांपुढे असणार आहे. या वसुलीद्वारे सरकारचा महसूल वाढवणे हे मुख्य काम विभागापुढे असणार आहे. याद्वारे सरकारला वित्तीय तूट भरून काढण्यास मदत होणार आहे. GDP दर 6.4% पर्यंत घेऊन जाण्याचे सरकारचे उद्दिष्ट गाठण्यासाठी कर विभागाने कंबर कसली आहे.