Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

क्रिप्टोकरन्सीच्या गुंतवणुकीबद्दल या 10 गोष्टी तुम्हाला माहित आहेत का?

crypto bitcoin

क्रिप्टोकरन्सीमधील गुंतवणूक मोठ्या प्रमाणात फायदाही मिळवून देऊ शकते व तेवढ्याच पटीने नुकसानही होऊ शकते. त्यामुळे क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करण्याआधी त्याबद्दलची माहिती असणे गरजेचे आहे.

इंटरनेटच्या वाढत्या वापरामुळे आणि वापरकर्त्यांमुळे अनेक नवनवीन संकल्पनांवर प्रकाश पडत आहे. त्यातीलच एक संकल्पना म्हणजे आभासी जग (Virtual World) आणि ह्याच संकल्पनेतून उदयास आलेली क्रिप्टोकरन्सी (Cryptocurrency). क्रिप्टोकरन्सीमधील गुंतवणूक मोठ्या प्रमाणात फायदाही मिळवून देऊ शकते व तेवढ्याच पटीने नुकसानही होऊ शकते. त्यामुळे क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करण्याआधी त्याबद्दलची माहिती असणे गरजेचे आहे.

क्रिप्टोत गुंतवणूक करण्यापूर्वी या 10 गोष्टी तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे.

1. क्रिप्टोकरन्सी हे एक आभासी चलन आहे. क्रिप्टोकरन्सीचा वापर देवाणघेवाणाच्या (Exchange) माध्यमासाठी केला जातो. क्रिप्टोकरन्सीची देवाणघेवाण कॉम्प्युटर नेटवर्किंगद्वारे केली जाते. ज्यावर कोणत्याही देशाच्या सरकारचे किंवा बँकांचे नियंत्रण नाही.

2. क्रिप्टो कॉईनच्या खरेदी-विक्रीच्या नोंदी डिजिटल खातेवहीमध्ये केल्या जातात. ही डिजिटल खातेवही म्हणजे संगणकीकृत डेटाबेस (Computerised Database) आहे. क्रिप्टो कॉईन तयार करण्यासाठी अवघड अशा क्रिप्टोग्राफी प्रणालीचा वापर केला जातो. ज्यामुळे या खातेवही हॅक करणे अशक्य आहे. क्रिप्टोग्राफी या प्रणालीद्वारे सुरक्षित देवाणघेवाण, खरेदी-विक्रीच्या नोंदी, नवीन कॉईन्सच्या निर्मितीवर नियंत्रण, तसेच  कॉईनच्या व्यवहाराची आणि देवाणघेवाणीची शहानिशा केली जाते.

3. क्रिप्टोकरन्सी ही विक्रेय वस्तू (Commodities), रोखे (Securities) आणि नाणी (Currency ) यांमध्ये वर्गीकृत केली जाते. क्रिप्टोकरन्सीला वेगळ्या मालमत्ता वर्गात म्हणजे assets class मध्ये मोजले जाते.


4. क्रिप्टोकरन्सी भौतिक स्वरूपात म्हणजेच Physical Form मध्ये आढळत नाही. क्रिप्टोकरन्सी केंद्रीय प्राधिकरणाद्वारे जारी केली जात नाही.

5. क्रिप्टोकरन्सीमध्ये विकेंद्रित नियंत्रणाचा (Decentralised Control) वापर होतो, हे सेंट्रल बँक डिजिटल चलन (CBDC)च्या विरूद्ध आहे.

6. क्रिप्टोकरन्सी तयार केल्यानंतर ती जारी किंवा अधिकृत करण्याआधी केंद्रीकृत (Centralised) असते. जेव्हा ती जारी केली जाते तेव्हा त्याचे विकेंद्रीकरण होते. विकेंद्रीकरणाच्या अंमलबजावणीनंतर करन्सीचे कार्य डिजिटल खातेवही तंत्रज्ञाना (Digital Ledger Technology) द्वारे सुरू होते. डिजिटल लेजर टेक्नॉलॉजी ही एक प्रकारची ब्लॉकचेन (Blockchain) आहे; जी सार्वजनिक आर्थिक व्यवहार डेटाबेस सर्व्ह करते.

7. क्रिप्टो मार्केटमध्ये गुंतवणूकदाराच्या खरेदी-विक्रीच्या इष्टतम (ऑप्टीमल) किमतीची हमी घेतली जात नाही.

8. याच पळवाटांचा (Loophole) फायदा घेत अनेक गुंतवणूकदार arbitrage पद्धतीने वेगवेगळ्या मार्केटमधील एकाच करन्सीच्या किमतीमधील फरकाचा शोध घेतात आणि फायदा मिळवतात.

9. बिटकॉईन ही पहिली विकेंद्रित क्रिप्टोकरन्सी आहे. ज्याची निर्मिती 2009 मध्ये सातोशी नाकामोटो यांनी केली होती. मार्च 2022 पर्यंत 9 हजारांहून अधिक क्रिप्टोकरन्सी अस्तित्वात आहेत. यातील जवळपास 70 क्रिप्टोकरन्सीजचं बाजारमूल्य 1 अब्ज डॉलरपेक्षा जास्त होतं.

10. क्रिप्टोकरन्सी विकत घेण्यासाठी आणि ती जतन करण्यासाठी ब्लॉकचेन वॉलेटची (Blockchain Wallet) गरज असते. हे वॉलेट क्रिप्टोग्राफी (Cryptography) प्रणालीमध्ये तयार केलेले असल्यामुळे ते सुरक्षित असते.