Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Crypto Price: बिटकॉईन 4 टक्क्यांच्या घसरणीसह 27,000 डॉलरच्या खाली; टॉप-10 पैकी 8 करन्सी रेड झोनमध्ये

Crypto Market Update

Crypto Price Fall: क्रिप्टो मार्केटमध्ये आज (दि. 12 मे) टॉप-10 क्रिप्टोकरन्सीपैकी 8 करन्सी रेड झोनमध्ये दिसून आल्या आहेत. एकूण क्रिप्टो मार्केटमध्ये गेल्या 24 तासांत 2.60 टक्क्यांची घसरण झाली आहे.

Crypto Price Fall: क्रिप्टो मार्केटमध्ये शुक्रवारी (दि. 12 मे) जोरदार घसरण झाल्याचे दिसून आले. टॉप-10 क्रिप्टो करन्सीपैकी 8 क्रिप्टो करन्सी रेड झोनमध्ये ट्रेड करत होत्या. यामध्ये बिटकॉईनमध्ये 4 टक्क्यांची घसरण झाली असून त्याची किंमत 27,000 डॉलरच्या खाली आली आहे. तर इथेरिअम 3 टक्क्यांनी घसरून 1800 डॉलरच्या खाली आली आहे.

बिटकॉईनमध्ये 4.01 टक्क्यांनी घसरण झाली असून तो 26,391.02 डॉलर (21.69 लाख रुपये) वर आला आहे. तर इथेरिअममध्ये 3 टक्क्यांची घसरण झाली असून त्याचा भाव 1800 डॉलरच्या खाली आला आहे. मागील 24 तासांमधील क्रिप्टो मार्केटमधील परिस्थिती पाहता मार्केटमध्ये 2.60  टक्क्यांची घसरण झाली असून क्रिप्टो मार्केट भांडवल 1.10 लाख कोटी डॉलरवर आले आहे.

Time Table-02

मार्केटमधील भांडवलानुसार, टॉप-10 क्रिप्टोकरन्सीमधील एक्सआरपी (XRP) आणि कार्डानो (Cardano) या करन्सी ग्रीन झोनमध्ये ट्रेड करत होत्या. पण यातही किंचित वाढ होत आहे. गेल्या 7 दिवसात पॉलीगॉन करन्सीमध्ये जवळपास 14 टक्क्यांनी घसरण झाली आहे आणि क्रिप्टो मार्केटमधील टॉप-10 क्रिप्टो करन्सीपैकी बिटकॉईनचा भाव पाहता तो एका आठवड्यात 9 टक्क्यांनी खाली आला आहे. तर इथेरिअम 7 टक्क्यांनी घसरला आहे.

मागील 24 तासांमधील क्रिप्टो करन्सीमधील चढ-उतार पाहता यामध्ये सर्वाधिक घसरण झालेली दिसून येते. कॉईनमार्केट कॅप या वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, मागील एका दिवसात क्रिप्टो मार्केटमध्ये 4263 कोटी डॉलरची (3.50 लाख कोटी रुपये) उलाढाल झाल्याचे दिसून येते. जी त्याच्या अगोदरच्या दिवसाच्या तुलनेत 8.74 टक्क्यांनी कमी आहे. मागील 24 तासांत बिटकॉईनची किंमत 0.59 टक्क्यांनी खाली आली आहे. सध्या क्रिप्टो मार्केटमध्ये बिटकॉईनचा हिस्सा 46.33 टक्के इतका आहे.