Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Crypto Price Update: बिटकॉईनमध्ये 1.53 टक्के तर इथेरिअममध्ये 1.86 टक्क्यांची घसरण

Crypto Price Update

Cryptocurrency Price Update: क्रिप्टोकरन्सी मार्केटमध्ये मागील 24 तासात मोठ्या प्रमाणात अपडाऊन झालेले दिसून आले आहे. यामध्ये बिटकॉईन ही नेहमीच ट्रेंडिग राहिलेली क्रिप्टोकरन्सी आहे. पण यामध्येही गेल्या 24 तासात 1.53 टक्क्यांनी घसरण झाली आहे.

Cryptocurrency Price Update: ग्लोबल क्रिप्टोकरन्सी मार्केटमध्ये सध्या घसरणीचे वातावरण सुरू असून, गुरूवारी (दि. 8 जून) दुपारीपर्यंत क्रिप्टोमार्केटचे भांडवल 1.1 ट्रिलिअन डॉलर इतके होते. त्यात मागील 24 तासात 1.83 टक्क्यांनी घसरण झाली आहे. यामध्ये जगातील सर्वांत ट्रेडिंग करन्सी असलेल्या बिटकॉईनमध्ये  1.53 टक्क्यांनी घसरण झाली आहे. स्टॅक्स एसटीएक्स (Stacks STX) ही क्रिप्टोकरन्सी तेजीमध्ये होती तर Kava KAVA या क्रिप्टोकरन्सीमध्ये सर्वाधिक घसरण झाल्याचे दिसून येते.

क्रिप्टोकरन्सी मार्केटमध्ये मागील 24 तासात मोठ्या प्रमाणात अपडाऊन झालेले दिसून आले आहे. यामध्ये बिटकॉईन ही नेहमीच ट्रेंडिग राहिलेली क्रिप्टोकरन्सी आहे. पण यामध्येही गेल्या 24 तासात 1.53 टक्क्यांनी घसरण झाली आहे. कालच्या दिवसाच्या तुलनेत आज बिटकॉईनची किंमत 26,481.62 डॉलर इतकी आहे.

मागील 24 तासातील क्रिप्टोमार्केटमधील ट्रेडिंग पाहिली असता Stacks STX ही क्रिप्टोकरन्सी तेजीमध्ये होती. यामध्ये 4.43 टक्क्यांनी वाढ झाल्याचे दिसून आले. त्याची आजची किंमत 0.6551 डॉलर ट्रेडिंग करत होती. तर मागील 24 तासातील त्याचा ट्रेडिंग व्हॉल्यूम 282.09 मिलिअन डॉलर इतका होता.

Top 10 Crypto Currency
Source: www.moneycontrol.com

Kava KAVA ही या क्रिप्टोकरन्सीमद्ये सर्वाधिक घसरण झाली. तिच्यामध्ये जवळपास 18.97 टक्क्यांनी घसरण झाली. त्याची किंमत 0.9445 डॉलर इतकी होती.

बिटकॉईन(Bitcoin)

जगातील एक नंबरची क्रिप्टोकरन्सी बिटकॉईन ही मागील 24 तासात 1.53 टक्क्यांनी घसरली असून ती 26,481.62 डॉलरवर ट्रेडिंग करत होती. त्याचा या कालावधीतील ट्रेडिंग व्हॉल्यूम 17.322 बिलिअन डॉलर इतका राहिला आहे. coinmarketcap या वेबसाईटनुसार, सध्या ही पहिल्या क्रमांकाची क्रिप्टोकरन्सी आहे.

इथेरिअम (Ethereum)

बिटकॉईनप्रमाणे इथेरिअममध्येह 1.86 टक्क्यांनी घसरण झाली आहे. ती सध्या 1,843.27 डॉलरवर ट्रेडिंग करत आहे. मागील 24 तासात त्याचा ट्रेडिंग व्हॉल्यूम 7.20 बिलिअन डॉलर इतका राहिला आहे.

टेथर (Tether)

टेथर या क्रिप्टोकरन्सीमध्ये 0.02 टक्क्यांनी घसरण झाली असून ही करन्सी 0.9999 डॉलरवर मागील 24 तासात ट्रेडिंग करत होती. या करन्सीचा या कालावधीतील व्हॉल्यूम 25.51 बिलिअन डॉलर इतका राहिला आहे. coinmarketcap या वेबसाईटनुसार, टेथर ही क्रिप्टोकरन्सी तिसऱ्या क्रमांकावर आहे.

इतर कॉईन्समध्ये सोलाना ही सुद्धा 6.85 टक्क्यांनी आणि कार्डानो ही 4.22 टक्क्यांनी घसरली आहे. तर डॉजकॉईनमध्ये 2.44 टक्क्यांनी वाढ झाली आहे.