क्रिप्टो मार्केटमधील मागील 24 तासातील उलाढाल पाहता क्रिप्टोमधील सर्वांत महागडे कॉईन बिटकॉईन 30,000 डॉलरच्या खाली आला होता. पण त्याने त्यानंतर पुन्हा एकदा आपला 30,000 डॉलरचा टप्पा गाठला आहे.
आजच्या दिवसभरात क्रिप्टोमार्केटमध्ये मिक्स ट्रेंड दिसून आला आहे. यामध्ये यामध्ये XRP, Cardano, Tron आणि Polygon या क्रिप्टोकरन्सी चांगल्या ट्रेंड करत होत्या. पण त्याचवेळी क्रिप्टोमधील सर्वांना परिचित असलेल्या करन्सीमध्ये मात्र पडझड होत होती. क्रिप्टोमधील सर्वांत महागडी करन्सी म्हणून परिचित असलेली बिटकॉईन ही 30,000 डॉलरच्या खाली होती. coindesk.com या वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या चार्टनुसार, मागील 24 तासांत बिटकॉईन ही 29,780.10 डॉलर इतकी खाली होती. त्यानंतर झालेल्या ट्रेडनुसार बिटकॉईन पुन्हा 30,000 डॉलरच्यावर गेली होती. तिचा मागील 24 तासातील उच्चांक 30,411.20 डॉलर इतका आहे.
बिटकॉईनप्रमाणेच इथेरिअम ही करन्सीसुद्धा 1,900 डॉलरच्या खाली होती. मागील 24 तासामध्ये इथेरिअम करन्सी 1,882.29 डॉलरपर्यंत खाली आली होती. त्यानंतर ती 1,928.22 डॉलरपर्यंत पोहोचली होती.
तर दुसरीकडे क्रिप्टो मार्केटमधील महत्त्वाच्या क्रिप्टोकरन्सी वगळता XRP करन्सी 4 टक्क्यांनी तर Cardano मध्ये 2 टक्क्यांनी वाढ झाली. त्याचबरोबर Dogecoin आणि Polygon या करन्सीमध्ये सुद्धा 1 टक्क्यांची वाढ दिसून आली होती.
दरम्यान, G-20 मधील Financial Stability Board ने क्रिप्टोमार्केटला धरून त्याचे नियम करण्याबाबत शिफारस केली आहे. या शिफारशीद्वारे क्रिप्टोमार्केट अजून सक्षम करण्याची मागणी केली जात आहे.
(डिसक्लेमर : या बातमीद्वारे वाचकांना फक्त माहिती दिली जात आहे. 'महामनी' क्रिप्टोकरन्सीबाबत खरेदी-विक्रीचा सल्ला देत नाही.)