Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Bittrex Crypto exchange: क्रिप्टो मार्केटमध्ये पुन्हा भूकंप; Bittrex एक्सचेंजकडून दिवाळखोरी अर्ज दाखल

Bittrex Crypto exchange

2022 मध्ये जगातील सर्वात मोठा क्रिप्टो एक्सचेंज FTX दिवाळखोरीत निघाला होता. त्यानंतर आता पुन्हा क्रिप्टो मार्केटला हादरा बसला आहे. अमेरिकेतील Bittrex क्रिप्टो एक्सचेंजने सरकारकडे दिवाळखोरीचा अर्ज दाखल केला आहे. अमेरिकेतील क्रिप्टो गुंतवणूकदारांचे पैसे यामुळे अडकून पडले आहेत.

Bittrex Crypto exchange: 2022 मध्ये जगातील सर्वात मोठा क्रिप्टो एक्सचेंज FTX दिवाळखोरीत निघाला होता. त्यानंतर आता पुन्हा क्रिप्टो मार्केटला हादरा बसला आहे. अमेरिकेतील Bittrex क्रिप्टो एक्सचेंजने सरकारकडे दिवाळखोरीचा अर्ज दाखल केला आहे. क्रिप्टो गुंतवणूकदारांचे पैसे यामुळे अडकून पडले आहेत.

तीन आठवड्यांपूर्वीच अमेरिकेच्या सिक्युरिटी अँड एक्सचेंज कमिशनने Bittrex वर बेकायदेशीर व्यवहाराचे आरोप केले होते. Bittrex मधील व्यवहार नोंदणीकृत नाहीत, असे सरकारने म्हटले होते. मात्र, हे आरोप Bittrex ने फेटाळून लावले होते. त्यानंतर तीन आठवड्यातच या एक्सचेंजने दिवाळखोरीसाठी अर्ज दाखल केला.

कोणत्या ग्राहकांवर परिणाम होणार?

Bittrex एक्सचेंजचे अमेरिकेतील कामकाज थांबले आहे. म्हणजेच Bittrex चा फक्त अमेरिकेतील एक्सचेंज दिवाळखोरीत निघाला आहे. इतर देशात चालणाऱ्या व्यवहारांवर याचा कोणताही परिणाम होणार नाही. त्यांना Bittrex एक्सचेंजवरून व्यवहार करता येतील. Bittrex ही सियाटल येतील क्रिप्टो क्षेत्रातील कंपनी आहे.

अमेरिकेतील गुंतवणूकदार अडचणीत

डेलावेअर येथील न्यायालयात कंपनीने दिवाळखोरीचा अर्ज दाखल केला आहे. जमा केलेल्या कागदपत्रांनुसार कंपनीची मालमत्ता 500 मिलियन ते 1 बिलियन डॉलरच्या दरम्यान आहे. 30 एप्रिलच्या आधी ज्या ग्राहकांनी क्रिप्टो एक्सचेंजमधून गुंतवणूक काढून घेतली नाही त्यांची गुंतवणूक कंपनीकडे सुरक्षित आहे. ग्राहकांना व्यवहार करता यावेत यासाठी तात्पुरत्या स्वरुपात एक्सचेंज सुरू करण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी कंपनीने न्यायालयाकडे केली आहे.

पुरावे नष्ट केल्याचा आरोप

मागील काही वर्षात क्रिप्टो क्षेत्रातील अनेक कंपन्या दिवाळखोरीत निघाल्या आहेत. FTX क्रिप्टो एक्सचेंजवर तर फौजदारी गुन्हा दाखल झाला आहे. गैरव्यवहार, नियमांचे उल्लंघन, भ्रष्टाचार यामुळे क्रिप्टो मार्केटवरील ग्राहकांचा विश्वास उडत चालला आहे. अनेक देशांमध्ये क्रिप्टो बाबत स्पष्ट कायदे नाहीत. त्यामुळे गोंधळ उडतो. Bittrex क्रिप्टो एक्सचेंजचे सीइओ William Shihara यांच्यावर बेकायदेशीर क्रिप्टो व्यवहारांचे पुरावे नष्ट केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.

क्रिप्टो मायनिंग आणि वातावरण बदलाचा संबंध काय?

क्रिप्टो करन्सी तयार करण्यासाठी उच्च क्षमतेच्या कॉम्प्युटरवर क्लिष्ट गणिते सोडवली जातात. त्यातून व्हर्च्युअल क्रिप्टो करन्सी तयार केली जाते. मात्र, असे करताना ऊर्जेचा अती वापर होतो. त्यामुळे वातावरणाला घातक असे ग्रीन हाऊस गॅसेस तयार होतात. ऊर्जेचा अती वापर आणि पर्यावरणास घातक वायू यातून तयार होत असल्याने क्रिप्टो मायनिंगवर बंदी घातली जावी, अशी मागणी पर्यावरणवादी संघटनांकडून होत आहे.