Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Crypto Scam: अमेरिकेत 35 लाख गुंतवणूकदारांची फसवणूक,OneCoin क्रिप्टो संस्थापकाला 20 वर्षांचा कारावास

Crypto Scam

Image Source : www.coindesk.com

Crypto Scam: वनकॉईन क्रिप्टो दिवाळखोरीत निघाली आहे. गुंतवणूकदारांचे पैसे मातीमोल झाले.वर्ष 2014 ते 2016 या काळात बनावट क्रिप्टोंच्या विक्रीतून हा घोटाळा करण्यात आला. याबाबत वनकॉईनचा संस्थापक कार्ल सेबास्टीन ग्रीनवुड याला अमेरिकेतील न्यायलयाने दोषी ठरवले असून 20 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली.

बनावट क्रिप्टो करन्सीच्या माध्यमातून अमेरिकेतील लाखो गुंतवणूकदारांची 4 बिलियन डॉलर्सची फसवणूक करणाऱ्या OneCoin क्रिप्टोचा संस्थापक कार्ल सेबस्टीन ग्रीनवुड याला 20 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्याची पार्टनर आणि क्रिप्टोक्वीन म्हणून ओळखल्या जाणारी रुजा इग्नाटोवा मात्र फरार आहे. क्रिप्टो करन्सी क्षेत्रातली अलिकडच्या काळातील ही मोठी कारवाई मानली जाते.

सोफिया बल्गेरिया येथे कार्यालय असलेल्या वनकॉईन या क्रिप्टो कंपनीने बनावट क्रिप्टोंची विक्री करुन गुंतवणूकदारांची आर्थिक फसवणूक केल्याचे वृत आयएएनएस या वृत्तसंस्थेने दिले आहे. वर्ष 2014 ते 2016 या काळात बनावट क्रिप्टोंच्या विक्रीतून हा घोटाळा करण्यात आला. याबाबत वनकॉईनचा संस्थापक कार्ल सेबास्टीन ग्रीनवुड याला अमेरिकेतील न्यायलयाने दोषी ठरवले असून 20 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली.

थायलंडमधील कोह सामुई या बेट्यावरून ग्रीनवुड याला जुलै 2018मध्ये अटक करण्यात आली होती. मनी लॉंडरिंग आणि क्रिप्टो घोटाळ्याचे आरोप त्याच्यावर होते. मागील पाच वर्ष हा खटला सुरु होता. अखेर त्यावर न्यायालयाने 20 वर्षांची शिक्षा सुनावली.

वनकॉईन क्रिप्टो दिवाळखोरीत निघाली आहे. गुंतवणूकदारांचे 4 बिलियन डॉलर्स मातीमोल झाले. मुख्य आरोपी ग्रीनवुड याच्याकडे 300 मिलियन डॉलर्सची संपत्ती आहे. यातून ग्रीनवुड याने ब्राझिल आणि थायलंडमध्ये पंचतारांकित हॉटेलात राहण्यासाठी 31000 डॉलर्स खर्च केले आहेत.

लक्झुरी लाईफस्टाईलसाठी वापरायचा पैसे 

वनकॉईनचा संस्थापक कार्ल सेबस्टीन ग्रीनवुड याने गुंतवणूकदारांकडून प्राप्त केलेल्या लाखो डॉलर्सचा गैरवापर केल्याचे चौकशीतून समोर आले आहे. ग्रीनवुड याचे वनकॉईन नावाचे खासगी विमान होते. तो या विमानाने जगभर प्रवास करायचा. त्याचे राहणीमान पंचतारांकित होते. स्पेन, दुबई, थायलंडसारख्या देशांतून महागडे कपडे, घड्याळ, शूज खरेदी केल्याचे चौकशीत आढळून आले आहे.

क्रिप्टोक्वीन फरार, 'FBI'कडून 1 लाख डॉलर्सचे बक्षिस

वनकॉईन क्रिप्टो घोटाळ्यातील आणखी एक आरोपी क्रिप्टोक्वीन रुजा इग्नोटोवा ही सध्या फरार आहे. अमेरिकेची मुख्य तपास यंत्रणा FBI च्या टॉप टेन मोस्ट वॉंटेड लिस्टमध्ये इग्नाटोवा हीचे नाव आहे. त्यामुळे FBI कडून तिचा कसून शोध घेतला जात आहे. दरम्यान तिच्या अटकेसाठी FBI ने 1 लाख डॉलर्सचे बक्षिस जाहीर केले आहे.

'बिटकॉईनपेक्षा मूल्यवान' याची पडली गुंतवणूकदारांना भुरळ

कार्ल सेबास्टीन ग्रीनवुड आणि त्याची पार्टनर रुजा इग्नाटोवा यांनी वनकॉईनबाबत भन्नाट स्ट्रॅटेजीचा वापर केला. वनकॉईन हा क्रिप्टो करन्सीमधील आजवरचा सर्वात क्रांतिकारक कॉइन आहे. हा बिटकॉईनपेक्षा मूल्यवान असून तो बिटकॉइनवर भारी पडेल, असा दावा त्यांनी जाहिरातींमधून केला होता. या टॅगलाईनची भुरळ पडल्याने गुंतवणूकदारांनी वनकॉईनमध्ये बिलियन डॉलर्स गुंतवले. 

आंतरराष्ट्रीय पातळीवर व्यापक नियमावलीची गरज

अमेरिकेत क्रिप्टो करन्सीच्या नियमांबाबत अद्याप सरकारी धोरण नाही. नुकताच भारतात पार पडलेल्या जी-20 देशांच्या शिखर परिषदेत क्रिप्टो करन्सीच्या व्यापक नियमांबाबत चर्चा करण्यात आली होती. जागतिक पातळीवर क्रिप्टो करन्सी आणि त्यातील गुंतवणुकीबाबत सामायिक नियमावलीची आग्रही मागणी भारताने केली आहे.