Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

इतर

जेके लक्ष्मी सिमेंट AHPL ची 20.80% भागीदारी मिळवणार; 21.60 कोटींची करणार गुंतवणूक

जेके लक्ष्मी कंपनीचा छत्तीसगड दुर्ग येथील सिमेंट युनिट आहे. त्यासाठी कंपनी सौर उर्जेचा वापर करणार आहे. तर तर एम्प्लस कंपनीचा छत्तीसगडमधील दुर्ग जिल्ह्यात 50 MWAC (मेगा वॅट अल्टरनेटिंग करंट)च्यासौर ऊर्जा प्रकल्पावर काम करत आहे. याच प्रकल्पातून जेके लक्ष्मी 40 MWAC सौरउर्जेचा वापर करणार आहे. यासाठी कंपनीने ही गुंतवणूक केली आहे.

Read More

LIC Agent Gratuity : एलआयसी एजंटच्या ग्रॅच्युइटीमध्ये वाढ; कर्मचाऱ्यांसाठी कल्याणकारी योजनांची घोषणा

अर्थमंत्रालयाने सोमवारी झालेल्या बैठकीत एलआयसीच्या एजंट आणि कर्मचाऱ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी काही निर्णय घेतले आहे. त्यामध्ये LIC एजंट्सना दिल्या जाणाऱ्या ग्रॅच्युइटीच्या मर्यादेमध्ये (gratuity limit) 3 लाख रुपयांवरून 5 लाख रुपयांपर्यंत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Read More

Maharashtra Lottery 2023: राज्य सरकारतर्फे चालविल्या जाणाऱ्या अधिकृत लॉटरी तुम्हाला माहितीये का?

Maharashtra Lottery 2023: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर 'महाराष्ट्र गणपती भव्यतम सोडत' लॉटरी 27 सप्टेंबरला काढली जाणार आहे. यातील विजेत्यांना 40 लाखांचे बक्षिस मिळणार आहे.

Read More

Bamboo Farming : एकदाच करा लागवड खर्च; 30 वर्षापर्यंत घेता येईल उत्पन्न, जाणून घ्या सविस्तर

बांबू ही दीर्घकालीन आणि सदाहरित वनस्पती आहे. याच्या लागवडीचा येणारा खर्चही कमी आहे. तसेच बांबूच्या रोपांचे जीवनमान हे 40 ते 100 वर्षापर्यंत आहे. त्यामुळे बांबूची लागवड केल्यानंतर भविष्यात लागवडीनंतर उत्पादन सुरू झाल्यापासून( लागवडी नंतर 3 वर्षानंतर) सुमारे 30 ते 35 वर्षापर्यंत शेतकऱ्यांना लागवडीचा खर्च करण्याची आवश्यकता नाही.

Read More

Toll Rate Hike : मुबंईतील वाहनधारकांच्या खर्चात भर पडणार; 5 टोल नाक्यांच्या दरात होणार वाढ

मुंबईतील टोलचे दर वाढवण्यात आलेल्या टोल नाक्यांमध्ये वाशी टोलनाका, मुलुंड (LBS ROAD), मुलुंड (Eastern ExpressWay), तसेच दहिसर आणि ऐरोली खाडी पूल येथील टोलनाक्यांच्या किमतीमध्ये वाढ करण्यात आली आहे. वाहनधारकांना आता 1 ऑक्टोबरपासून जादा दराने टोल द्यावा लागणार आहे.

Read More

Vivo Ganesh Festival offer : गणेशोत्सवानिमित्त विवोच्या मोबाईल्सवर मिळवा 8500 रुपयांपर्यंतची ऑफर

Vivo कंपनीने V29e, Y56, आणि X90 या श्रेणीतील मोबाईल खरेदीवर तब्बल 8,500 पर्यंतचा विशेष कॅशबॅक ऑफर सुरू केला आहे. विवो कंपनीने गणेश उत्सावानिमित्त ही खास ऑफर आणली आहे.

Read More

मुंबईतील रेल्वे स्टेशनवर डिजिटल लॉकरची सोय; 30 रुपयात 24 तास ठेवता येणार साहित्य

मध्य रेल्वेने प्रवाशाच्या सुविधेसाठी आणि त्यांच्या साहित्याच्या सुरक्षेच्या दृष्टीकोणातून मुंबईतील दादर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स आणि लोकमान्य टिळक टर्मिनल्स या स्थानकांवर डिजिटल लॉकर रूम उपलब्ध करून दिल्या आहेत. यामध्ये 300 लॉकर्स CSMT वर, 160 लॉकर्स दादर स्थानकावर आणि 100 लॉकर्स हे LTT स्थानकांवर उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

Read More

Marathwada Liberation Day: मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी जाणून घ्या मराठवाड्याचे महाराष्ट्राला लाभलेले आर्थिक योगदान

Marathwada Liberation Day: मराठवाडा विभाग हा महाराष्ट्रसाठी आर्थिक दृष्टिने नेहमीच एक महत्वाचा भाग राहिलेला आहे. आज आपण मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त मराठवाड्याचे आर्थिक गणित आणि GDP समजून घेऊ.

Read More

Train Ticket Refund: रेल्वे लेट किंवा कॅन्सल झाल्यावर मिळेल पूर्ण रिफंड, पाहा डिटेल्स

सहसा रेल्वे कॅन्सल किंवा लेट होत नाही. मात्र, वातावरण योग्य नसल्यास ट्रेन लेट होऊ शकते. सध्या तसेही पाण्या-पावसाचे दिवस सुरू आहेत. त्यामुळे तुमची ट्रेन लेट किंवा कॅन्सल झाल्यास तुम्हाला पूर्ण रिफंड मिळवता येणार आहे. पण, त्यासाठी रेल्वेचे काही नियम आहेत. चला तर मग सविस्तर जाणून घेऊया.

Read More

Ganesh Festival Impact : गणेशोत्सवाने टेलरिंग व्यवसायाला सुगीचे दिवस; हजारोंना रोजगार, लाखोंची उलाढाल

ग्रामीण भागात किमान 100 ते 150 ड्रेसची एका एका मंडळाची, तर शहरी भागात एका एका मंडळाकडून 250 ते 500 ड्रेसची ऑर्डर दिली जाते. त्यामुळे गणेश उत्सव काळात ड्रेस शिवण्याची ही ऑर्डर हजारोच्या संख्येत जाते. या काळात शहरी अथवा ग्रामीण भागातील टेलरिंग व्यवसायिकांना मोठ्या प्रमाणात कपड्यांच्या ऑर्डर उपलब्ध होतात.

Read More

E-waste : मोबाईल, लॅपटॉप, फ्रिज सारखी 134 उपकरणे फेकून द्यावी लागणार; इलेक्ट्रॉनिक उपकरणांची कालमर्यादा ठरली

आता दैनदिन जीवनात वापारात असलेल्या मोबाईल , फ्रिज, लॅपटॉप, वॉशिंग मशीन यासारख्या तब्बल 134 इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा एक्सपायरी कालावधी निश्चित करण्यात आला आहे. निश्चित केलेली कालमर्यादा संपल्यानंतर तुम्हाला ही उपकरणे रिसायकल करण्यासाठी भंगारात द्यावी लागणार आहेत.

Read More

Maha ZP Refund : जिल्हा परिषदेच्या रद्द झालेल्या नोकर भरतीचे परीक्षा शुल्क परत मिळणार, जाणून घ्या प्रोसेस

राज्याच्या ग्राम विकास मंत्रालयाने 2019- आणि 2021 मध्ये राज्यातील 34 जिल्हा परिषदांमधील पदांची भरती प्रक्रिया रद्द केली होती. त्यामुळे या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना त्यांचे परीक्षा शुल्क परत देण्याचा निर्णय ग्रामविकास मंत्रालयाने घेतला आहे. त्यानुसार एकूण 2 लाख 38 हजार 380 पेक्षा जास्त उमेदवारांना तब्बल 21 कोटी 70 लाख 64 हजार रुपये परीक्षा शुल्क परत करण्यात येणार आहे.

Read More