Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

मुंबईतील रेल्वे स्टेशनवर डिजिटल लॉकरची सोय; 30 रुपयात 24 तास ठेवता येणार साहित्य

मुंबईतील रेल्वे स्टेशनवर डिजिटल लॉकरची सोय; 30 रुपयात 24 तास ठेवता येणार साहित्य

Image Source : www.twitter.com/Central_Railway

मध्य रेल्वेने प्रवाशाच्या सुविधेसाठी आणि त्यांच्या साहित्याच्या सुरक्षेच्या दृष्टीकोणातून मुंबईतील दादर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स आणि लोकमान्य टिळक टर्मिनल्स या स्थानकांवर डिजिटल लॉकर रूम उपलब्ध करून दिल्या आहेत. यामध्ये 300 लॉकर्स CSMT वर, 160 लॉकर्स दादर स्थानकावर आणि 100 लॉकर्स हे LTT स्थानकांवर उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

देशाची आर्थिक राजधानी मुंबई या शहराला दररोज हजारो नागरिक भेट देत असतात. यामध्ये रेल्वेने येणाऱ्या प्रवाशांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे. बाहेरून आलेले प्रवासी अथवा पर्यटक बऱ्याच वेळा रेल्वे स्थानकांवर आपले साहित्य ठेवण्यासाठी लॉकरचा वापर करतात. मात्र, काही वेळा क्लॉक रुमबाबत ग्राहकांच्या तक्रारी येत असल्याने मध्य रेल्वेने आता मुंबईतील काही निवडक स्थानकांमध्ये डिजिटल लॉकरची (digilockers) सोय उपलब्ध करून दिले आहे. तसेच या डिजिटल लॉकरसाठी आकारण्यात येणारे भाडेदेखील 24 तासांसाठी एका बॅगला 30 रुपये आकारले जात आहे. या डिजिटल लॉकरची वैशिष्ट्ये काय आहेत हे आपण जाणून घेऊयात..

560 डिजिटल लॉकरची सोय

मध्य रेल्वेने प्रवाशाच्या सुविधेसाठी आणि  त्यांच्या साहित्याच्या सुरक्षेच्या दृष्टीकोणातून मुंबईतील दादर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स आणि लोकमान्य टिळक टर्मिनल्स या स्थानकांवर डिजिटल लॉकर रूम उपलब्ध करून दिल्या आहेत. यामध्ये 300 लॉकर्स CSMT वर, 160 लॉकर्स दादर स्थानकावर आणि 100 लॉकर्स हे LTT स्थानकांवर उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

काय आहेत वैशिष्ट्ये?

स्थानकांमध्ये साहित्य ठेवायचे म्हणजे प्रश्न निर्माण होतो तो सुरक्षेचा, यापूर्वीच्या क्लॉक रुमबाबत कुलूप नसणे, दुसरी चावी कर्मचाऱ्यांकडे असणे यासह इतर काही तक्रारी प्रवाशांकडून रेल्वे विभागाकडे करण्यात येत होत्या. यावर उपाय म्हणून मध्य रेल्वेने आता प्रवाशांसाठी डिजिटल लॉकरची  (Digital locker) सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या डिजिटल लॉकरचे वैशिष्ट्य म्हणजे या हे लॉकर्स पासवर्ड किंवा पिन नंबरद्वारे संरक्षित करण्यात आले आहे. शिवाय हे लॉकर उघडण्यासाठी  RFID टॅगचा वापर करण्यात आला आहे. प्रवाशांना डिजिटल लॉकरचे पेमेंट केल्यानंतर त्यांनी निवडलेल्या लॉकरचे दार उघडले जाणार आहे. त्यानंतर एकदा सामान ठेवल्यानंतर ते बंद केल्यास  तुम्हाला  पावती उपलब्ध होणार आहे. या पावतीचा वापर करून प्रवाशांना पु्न्हा आपले सामान बाहेर काढता येणार आहे. यासाठी क्यूआर कोड किंवा पावतीवर छापलेल्या आरएफआयडीद्वारेचा वापर करावा लागणार आहे.

24 तासांसाठी 30 रुपये भाडे-

प्रवाशांना या डिजी लॉकरमध्ये आपले साहित्य ठेवण्यासाठी रेल्वे विभागाकडून नाममात्र भाडे आकारले जात आहे. एका बॅगसाठी पहिल्या 24 तासांसाठी 30 रुपये भाडे आकारले जात आहे. त्यानंतरच्या 24 तासांसाठी प्रतिबॅग 40 रुपये आकारले जात आहेत.