Maharashtra Lottery 2023: तुम्हाला लॉटरी काढायची आवड आहे का? पण नेमकी कोणती लॉटरी काढायची आणि त्यावर विश्वास ठेवायचा का? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर तुम्ही चिंता करू नका. सरकारतर्फे चालविल्या जाणाऱ्या आणि त्याला अधिकृतरीत्या मान्यता दिलेल्या लॉटरींची यादी आज तुम्हाला सांगणार आहोत.
लॉटरी म्हणजे... लॉटरीच. लागली तर ठीक नाही तर आपलं नशीबच चांगलं नाही म्हणून सोडून द्यायचं, असं अनेक जण विचार करतात. काही जण प्रत्येक महिन्याला ठरवून लॉटरीचे तिकिट विकत घेतात. कारण त्यांना त्यांचं नशीब आजमावून लखपती, करोडपती व्हायचं असतं. पण यातील बऱ्याच जणांना अधिकृत तिकिट कोणतं हे देखील माहित नसतं. आपल्या राज्याबरोबरच बाहेरील राज्यातील लॉटरीसुद्धा इथे विकत मिळतात. त्याचबरोबर काही खाजगी लॉटरी सुद्धा चालतात. यातून अनेकांची फसवणूक होऊ शकते. ती होऊ नये, यासाठी महाराष्ट्र सरकारतर्फे चालविल्या जाणाऱ्या अधिकृत लॉटरींची माहिती घेऊ.
राज्य सरकारतर्फे विक्री होणाऱ्या लॉटरी
महाराष्ट्र सरकारने लॉटरीला अधिकृतरीत्या मान्यता दिली असून, राज्य सरकारतर्फे अधिकृत लॉटरींची यादी नियमितपणे प्रसिद्ध केली जाते. यामध्ये नागालॅण्ड, पंजाब, मिझारोम आणि गोवा या राज्यांतील लॉटरींचा समावेशसुद्धा राज्य सरकारने आपल्या अधिकृत यादीमध्ये केला आहे. राज्य सरकारने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या शासन निर्णयानुसार, 18 सप्टेंबर 2023 ते 24 सप्टेंबर 2023 या कालावधीत सोडत काढल्या जाणाऱ्या 29 लॉटरींची यादी जाहीर केली आहे. ही यादी, त्याच्या सोडतीचा दिनांक आणि सोडतीची वेळ तुम्ही खालील तत्क्त्यामध्ये पाहू शकता.
महाराष्ट्र गणपती भव्यतम सोडत
महाराष्ट्र राज्य लॉटरी अंतर्गत गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर 27 सप्टेंबर, 2023 रोजी सायंकाळी 4.00 वाजता सोडत काढण्यात येणार आहे. या लॉटरीचे पहिले बक्षिस 40 लाखाचे असून, 40 लाखाची दोन बक्षिसे दिली जाणार आहेत. तर दुसरे बक्षिस 1 लाखाचे असून ती 5 जणांना दिली जाणार आहेत. तिसरे आणि चौथे बक्षिस अनुक्रमे 10 आणि 5 हजारांचे असून ते 45 विजेत्यांना दिले जाणार आहे.