Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Maha ZP Refund : जिल्हा परिषदेच्या रद्द झालेल्या नोकर भरतीचे परीक्षा शुल्क परत मिळणार, जाणून घ्या प्रोसेस

Maha ZP Refund : जिल्हा परिषदेच्या रद्द झालेल्या नोकर भरतीचे परीक्षा शुल्क परत मिळणार, जाणून घ्या प्रोसेस

Image Source : www.study24x7.com

राज्याच्या ग्राम विकास मंत्रालयाने 2019- आणि 2021 मध्ये राज्यातील 34 जिल्हा परिषदांमधील पदांची भरती प्रक्रिया रद्द केली होती. त्यामुळे या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना त्यांचे परीक्षा शुल्क परत देण्याचा निर्णय ग्रामविकास मंत्रालयाने घेतला आहे. त्यानुसार एकूण 2 लाख 38 हजार 380 पेक्षा जास्त उमेदवारांना तब्बल 21 कोटी 70 लाख 64 हजार रुपये परीक्षा शुल्क परत करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र शासनाच्या वतीने 2019-2021 मध्ये  राज्यातील विविध जिल्हा परिषदेतील गट क आणि आरोग्य विभागासाठी भरती प्रक्रिया जाहीर केली होती. मात्र, ही भरती रद्द करण्यात आली आहे. परंतु या भरती प्रक्रियेसाठी पात्र विद्यार्थ्यांनी अर्ज करताना शासनाकडे जमा केलेल्या परीक्षा शुल्काचा प्रश्न उपस्थित झाला होता. दरम्यान  शासना आता हे परीक्षा शुल्क परीक्षार्थी उमेदावारांना परत करण्याचा निर्णय (ZP Fee Refund) घेतला आहे. त्यासाठी ग्राम विकास मंत्रालयाकडून संकेतस्थळ उपलब्ध करून देण्यात आले आहे. ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा शुल्क भरले होते ते परत मिळवण्यासाठी अर्जाची प्रक्रिया काय आहे याची माहिती आपण जाणून घेऊयात..

2 लाख 38 हजार पेक्षा जास्त उमेदवार

राज्याच्या ग्राम विकास मंत्रालयाने 2019- आणि 2021 मध्ये राज्यातील 34 जिल्हा परिषदांमधील पदांची भरती प्रक्रिया रद्द केली होती. त्यामुळे या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना त्यांचे परीक्षा शुल्क परत देण्याचा निर्णय ग्रामविकास मंत्रालयाने घेतला आहे. त्यानुसार  एकूण 2 लाख 38 हजार 380 पेक्षा जास्त उमेदवारांना तब्बल 21 कोटी 70 लाख 64 हजार रुपये परीक्षा शुल्क परत करण्यात येणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांना https://maharddzp.com या संकेतस्थळावर जाऊन परीक्षा शुल्क परताव्यासाठीचा अर्ज (Apllication for ZP Fee Refund) सादर करावा लागणार आहे.

अर्ज कसा करायचा?

ग्राम विकास मंत्रालयाने रद्द केलेल्या जिल्हा परिषदेच्या विविध संवर्गातील भरतीसाठी ज्या ज्या उमेदवारांनी अर्ज केला होता. त्या पात्र उमेदवारांनी  https://maharddzp.com या संकेतस्थळावर जाऊन परीक्षा शुल्क परताव्यासाठी अर्ज करायचा आहे. संकेतस्थळावर गेल्यावर उमेदवाराने परीक्षा अर्ज करताना वापरलेला युजर आयडी किंवा अर्ज क्रमांक टाकून पोर्टलवर लॉगिन करायचे आहे. तो तुम्हाला सबमिट बटना वरती क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला स्क्रीनवर परतावा शुल्का संदर्भात अर्ज प्राप्त होईल. त्यामध्ये तुम्हाला तुमचे नावासह तिथे विचारण्यात आलेला इमेल, मोबाईल क्रमांक असा सर्व तपशील सादर करायचा आहे. तुमची योग्य माहिती अपडेट केल्यानंतर तुम्हाला जिल्हा परिषद शुल्क परतावा अर्ज प्राप्त होईल. त्यामध्ये तुम्हाला तुमचा योग्य बँक तपशील भरायचा आहे. तपशील भरल्यानंतर तुम्हाला नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांकावर OTP प्राप्त होईल तो टाकून तुम्हाला तुमच्या अर्जाची पडताळणी करायची आहे. त्यानंतर तुम्ही तपशील सेव्ह करण्यापूर्वी अर्जातील सर्व माहिती योग्य असल्याची खात्री करून अर्ज सेव्ह करा.

परतावा शुल्क अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

  • जिल्हा परिषद भरतीसाठी केलेल्या अर्जाचा क्रमांक
  • इमेल आयडी
  • आधार कार्ड
  • बँक पासबुकचा फोटो 
  • बँक आयएफएससी (IFSC) कोड


परीक्षा शुल्क देण्यासाठी शासनाकडून 5 सप्टेंबरपासून https://maharddzp.com हे संकेतस्थळ अर्ज करण्यासाठी सुरू करण्यात आले आहे. उमेजदवारांनी वेळेत परीक्षा शुल्कासाठी अर्ज करणे गरजेचे आहे. मुदतीनंतर शासनाकडून प्रक्रिया करून उमेदवारांना परीक्षा शुल्क परत केले जाणार नाही. तसेच परीक्षा शुल्क परताव्यासाठी जिल्हा परिषदेकडून उमेदवारांना कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नसल्याचे शासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.