देशभरात भारतीय आयुर्विमा महामंडळाचे (LIC) 13 लाखांपेक्षा जास्त एजंट (agents) कार्यरत आहेत. तसेच 1 लाखांपेक्षा जास्त नियमित कर्मचारी आहेत. हे एजंट आणि कर्मचारी एलआयसीचा व्यवसाय वाढवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतात. मात्र, अलिकडच्या काळात एलआयचीसे एजंट दुसऱ्या विमा कंपन्यासाठी काम करत होते. त्यामुळे एलआयसीने काही प्रमाणात एजंट काढून नवीन एजंटची भरती केली होती. दरम्यान आता एलआयसीचे कमिशन एजंट आणि कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी वित्त मंत्रालयाने काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.
ग्रॅच्युईटी,टर्म इन्शुरन्समध्ये वाढ
केंद्रीय अर्थमंत्रालयाने भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या (LIC)च्या एजंट आणि कर्मचाऱ्याच्या फायद्याच्या दृष्टीने अनेक महत्वपूर्ण कल्यणाकारी उपाययोजनांना मंजुरी दिली आहे. त्यामध्ये महत्त्वाचा निर्णय म्हणजे एलआयसीच्या दिल्या जाणाऱ्या ग्रॅच्युईटीच्या मर्यादेत वाढ करण्यात आली आहे. तसेच त्यांना देण्यात येणाऱ्या टर्म इन्शुरन्सचा कव्हर देखील वाढवण्यात आला आहे. एलआयसीसाठी काम करणाऱ्या एजंटसाठी हा निर्णय फायद्याचा असल्याचे म्हटले जात आहे.
ग्रॅच्युइटीच्या मर्यादेमध्ये 5 लाख रुपयांपर्यंत
अर्थमंत्रालयाने सोमवारी झालेल्या बैठकीत एलआयसीच्या एजंट आणि कर्मचाऱ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी काही निर्णय घेतले आहे. त्यामध्ये LIC एजंट्सना दिल्या जाणाऱ्या ग्रॅच्युइटीच्या मर्यादेमध्ये (gratuity limit) 3 लाख रुपयांवरून 5 लाख रुपयांपर्यंत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच या एजंट्ससाठी देण्यात येणाऱ्या टर्म इन्शुरन्स 25,000 ते 1,50,000 पर्यंत वाढवण्यात आला आहे. तसेच कर्मचाऱ्यांना भविष्याच्यादृष्टीने एक समान 30 टक्के दराने कौटुंबिक पेंशन दिली जाणार आहे.