Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

जेके लक्ष्मी सिमेंट AHPL ची 20.80% भागीदारी मिळवणार; 21.60 कोटींची करणार गुंतवणूक

जेके लक्ष्मी सिमेंट AHPL ची 20.80% भागीदारी मिळवणार; 21.60 कोटींची करणार गुंतवणूक

Image Source : https://www.jklakshmicement.com/

जेके लक्ष्मी कंपनीचा छत्तीसगड दुर्ग येथील सिमेंट युनिट आहे. त्यासाठी कंपनी सौर उर्जेचा वापर करणार आहे. तर तर एम्प्लस कंपनीचा छत्तीसगडमधील दुर्ग जिल्ह्यात 50 MWAC (मेगा वॅट अल्टरनेटिंग करंट)च्यासौर ऊर्जा प्रकल्पावर काम करत आहे. याच प्रकल्पातून जेके लक्ष्मी 40 MWAC सौरउर्जेचा वापर करणार आहे. यासाठी कंपनीने ही गुंतवणूक केली आहे.

सिमेंट निर्मिती क्षेत्रातील आघाडीची कंपनी जेके लक्ष्मी सिमेंट एम्प्लस हेलिओस प्रायवेट लिमिटेड (AHPL) मध्ये सुमारे 20.80 % भागिदारी प्राप्त करणार आहे.  यासाठी जे के लक्ष्मीकडून AHPL मध्ये  21.60 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. AMPLUS HELIOS प्रायव्हेट लिमिटेड ही हरियाणा स्थित कंपनी संपूर्ण भारतामध्ये विद्युत, गॅस, स्टीम या संदर्भातील प्रकल्पावर काम करते.

सौर उर्जेची गरज पूर्ण करणार-

सध्या एम्प्लस कंपनीचा छत्तीसगडमधील दुर्ग जिल्ह्यात 50 MWAC (मेगा वॅट अल्टरनेटिंग करंट)च्यासौर ऊर्जा प्रकल्पावर काम करत आहे. तर  जेके लक्ष्मी कंपनीचा छत्तीसगड दुर्ग येथील सिमेंट युनिट आहे. त्यासाठी कंपनी सौर उर्जेचा वापर करणार आहे. कंपनी कॅप्टिव्ह पॉवर प्लांट मॉडेलच्या माध्यमातून 40 MWAC निर्मितीचा सौर ऊर्जेचा स्त्रोत निर्माण करणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून जेके लक्ष्मीने  Amplus Heliosच्या छत्तीसगडमधील सौर ऊर्जा प्रकल्पामध्ये गुंतवणूक केली आहे. या प्रकल्पातून जेके लक्ष्मी 40 MWAC सौरउर्जेचा वापर करणार आहे. तर उर्वरित 10 MWAC इतर खासगी संस्थांना पुरवठा केला जाणार आहे.

जेके लक्ष्मीचे विस्तारित नेटवर्क

वार्षिक 6000 कोटींची उलाढाल असलेल्या जे के लक्ष्मी सिमेंट कंपनीने आपल्या दुर्ग येथील सिंमेंट प्लॅटच्या सौर उर्जेची गरज पूर्ण करण्यासाठी गुंतवणुकीची ही रणनिती वापरली आहे. 1982 ला सुरु झालेल्या या कंपनीकडे सध्या 400 पेक्षा जास्त सिमेंटचे पाँईट आहेत. 4000 हजार भागिदारांचे विस्तृत नेटवर्क आहे. तसेच कंपनीने आजपर्यंत सरदार सरोवर प्रकल्प, सुवर्ण चतुर्भुज महामार्ग, या सारख्या प्रकल्पासाठी काम केले आहे.तसेच कंपनीने L&T, Reliance, NTPC आणि Essar सारख्या भारतातील आघाडीच्या कॉर्पोरेशन्ससोबत भागीदारी केली आहे.