Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Vivo Ganesh Festival offer : गणेशोत्सवानिमित्त विवोच्या मोबाईल्सवर मिळवा 8500 रुपयांपर्यंतची ऑफर

Vivo Ganesh Festival offer : गणेशोत्सवानिमित्त विवोच्या मोबाईल्सवर मिळवा 8500  रुपयांपर्यंतची ऑफर

Image Source : www.twitter.com/Vivo_India

Vivo कंपनीने V29e, Y56, आणि X90 या श्रेणीतील मोबाईल खरेदीवर तब्बल 8,500 पर्यंतचा विशेष कॅशबॅक ऑफर सुरू केला आहे. विवो कंपनीने गणेश उत्सावानिमित्त ही खास ऑफर आणली आहे.

महाराष्ट्राचे आराध्य दैवत गणरायाच्या आगमनाच्या मुहूर्तावर बरेचजण नवीन वस्तू खरेदी करण्याला प्राधान्य देतात. त्यामुळे या उत्सावाच्या पार्श्वभूमीवर अनेक कंपन्यांकडून आपल्या ग्राहकांसाठी विशेष ऑफर देण्यात येतात. जर तुम्हाला या गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर मोबाईल खरेदी करायचा असेल तर बाजारात विवो कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी विशेष ऑफर आणली आहे. विवोच्या (Vivo)  ग्राहकांना गणेश उत्सावानिमित्त काही निवडक मोबाईलवर तब्बल 8500 रुपयांपर्यंतची सूट मिळवता येणार आहे. चला तर जाणून घेऊयात विवो मोबाईल्सच्या या खास ऑफर बद्दल..

खरेदी करा लेटेस्ट 5-G मॉडेल-

गणरायाचे आगमन 19 सप्टेंबरला होत आहे. या निमित्ताने  Vivo India या मोबाईल कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी एक अप्रतिम ऑफर आणली आहे. कंपनीने खास गणेश चतुर्थी  आपल्या लेटेस्ट मोबाईल खरेदी करणाऱ्यांसाठी विशेष कॅशबॅक ऑफरची अधिकृत घोषणा केली आहे. विवो कंपनीने V29e, Y56, आणि X90 या श्रेणीतील मोबाईल खरेदीवर तब्बल 8,500 पर्यंत कॅशबॅक ऑफर दिली आहे. विवोच्या ग्राहकांचा स्वस्तात मोबाईल खरेदीमुळे गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणीत होणार आहे.

VIVO X90  या  5G मोबाईल फोनची विवोच्या ऑनलाईन स्टोअरमध्ये 64999 रुपये (12GB) इतकी आहे. गणेश फेस्टीव्ह ऑफरमध्ये ग्राहकांना कॅशबॅक ऑफरमध्ये हा फोन खरेदी करता येणार आहे. या फोनला 50MP कॅमेरा असून 8GB आणि 12GB RAM तसेच 256 GB स्टोअरेज कॅपिसिटी देण्यात आली आहे. मोबाईलला 4810 mAhची फास्ट चार्ज होणारी बॅटरी देण्यात आली आहे.

30 सप्टेंबर पर्यंतच सुरू राहणार ऑफर-

Vivo India ने आपल्या मोबाईलच्या लेटेस्ट श्रेणीतील मोबाईलवर ही सवलत दिली आहे. यामध्ये Vivo V29e, X90 मालिका, आणि V56 स्मार्टफोन्सचा समावेश आहे. कंपनीकडून ही  ऑफर 30 सप्टेंबर 2023 या कालवधीपर्यंतच देण्यात आली आहे. ग्राहकांना ऑफरमधील हे फोन  Vivo ई-स्टोअर, यासह इतर कोणत्याही ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म आणि ऑफलाइन रिटेल स्टोअरवर उपलब्ध असणार आहेत. दरम्यान या ऑफर्ससाठी नियम व अटी लागू आहेत. ग्राहकांनी फोन खरेदीपूर्वी ऑफर बाबत खात्री करावी.