Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Toll Rate Hike : मुबंईतील वाहनधारकांच्या खर्चात भर पडणार; 5 टोल नाक्यांच्या दरात होणार वाढ

Toll Rate Hike : मुबंईतील वाहनधारकांच्या खर्चात भर पडणार; 5 टोल नाक्यांच्या दरात होणार वाढ

Image Source : www.tis.nhai.gov.in

मुंबईतील टोलचे दर वाढवण्यात आलेल्या टोल नाक्यांमध्ये वाशी टोलनाका, मुलुंड (LBS ROAD), मुलुंड (Eastern ExpressWay), तसेच दहिसर आणि ऐरोली खाडी पूल येथील टोलनाक्यांच्या किमतीमध्ये वाढ करण्यात आली आहे. वाहनधारकांना आता 1 ऑक्टोबरपासून जादा दराने टोल द्यावा लागणार आहे.

मुंबईतील वाहनधारकांच्या दृष्टीने महत्त्वाची बातमी आहे. पुढील महिन्यांपासून मुंबईकरांना शहरातील टोलनाक्यांवर अधिकचा टोल द्यावा लागणार आहे.  येत्या  1 ऑक्टोबरपासून मुंबईतील 5 टोलनाक्यांवर वाहनांसाठी आकारण्यात येणाऱ्या टोलच्या किंतमीमध्ये (Toll Plaza Rate)वाढ  करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दर तीन वर्षांनी टोलच्या किमतीमध्ये वाढ करण्यात येते. दरम्यान, या टोलवाढीच्या निर्णयामध्ये कोणकोणत्या टोल नाक्यांचा समावेश आहे. तसेच टोलमध्ये किती वाढ करण्यात आली आहे हे जाणून घ्या..

5 टोलनाके कोणते?

मुंबईतील टोलचे दर वाढवण्यात आलेल्या टोल नाक्यांमध्ये वाशी टोलनाका, मुलुंड (LBS ROAD), मुलुंड (Eastern ExpressWay), तसेच दहिसर आणि ऐरोली खाडी पूल येथील टोल नाक्यांच्या किमतीमध्ये वाढ करण्यात आली आहे. वाहनधारकांना आता 1 ऑक्टोबरपासून जादा दराने टोल द्यावा लागणार आहे. नवीन टोल दर 2026 पर्यंत लागू राहणार आहेत.यापूर्वी 2020 मध्ये टोलच्या किमतीमध्ये वाढ करण्यात आली होती.

असे असतील नवीन टोल दर-

टोलदरामध्ये वाढ करण्याच्या निर्णयानुसार आता कार किंवा जीपसाठी सारख्या चारचाकी वाहनांना 45 रुपये टोल आकारला जाणार आहे. यापूर्वी हा टोल 40 रुपये आकारला जात होता. तसेच टेम्पो किंवा तत्सम हलक्या मोटार वाहनांसाठी आकारला जाणाऱ्या टोलच्या किमतीमध्ये 10 रुपयांनी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहनधारकांना आता 65 रुपये ऐवजी 75 रुपये टोल(Toll) द्यावा लागेल. तसेच मोठ्या अवजड वाहनांच्या टोल किमतीतही 20 रुपयांची वाढ होऊ शकते. त्यामुळे यापुढे बस/ट्रकसाठी आता 130 ऐवजी 150 टो लद्यावा लागणार आहे. यासह मल्टी एक्सल वाहनांना यापुढे 190 रुपये टोल आकारला जाण्याची शक्यता आहे. सध्या या वाहनांसाठी  160 रुपये टोल द्यावा लागत आहे.