Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Union Budget 2023: उद्योगधंद्यांना प्रोत्साहन देणारे सरकार! राष्ट्रपतींनी केली मोदी सरकारची प्रशंसा

Budget

Union Budget 2023: उद्योगधंद्यांच्या वाढीसाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू त्यांच्या अभिभाषणात म्हणाल्या. येणाऱ्या अर्थसंकल्पात उद्योगधंद्यांसाठी, व्यावसायिकांसाठी काही महत्वाच्या घोषणा होऊ शकतात असा अंदाज वर्तवला जात आहे. कोविड संसर्गानंतर आधीच आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या उद्योगक्षेत्राला या अर्थसंकल्पाकडून मोठ्या अपेक्षा आहेत.

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरु झाले आहे. अधिवेशनाच्या सुरुवातीला राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू  (President Draupadi Murmu) यांनी अभिभाषण केले. या अभिभाषणात त्यांनी गेल्या 8 वर्षात केंद्र सरकारने केलेल्या कामगिरीचा आढावा घेतला. सरकारने सुरु केलेल्या अनेक योजनांच्या यशस्वितेबद्दल त्यांनी सरकारची पाठ थोपटली आहे. केंद्र सरकारच्या प्रयत्नांमुळे देशात उद्योगधंदे वाढीस लागले आहेत असे राष्ट्रपती म्हणाल्या.

राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या अभिभाषणातील महत्वाचे मुद्दे

  • केंद्र सरकारने विकासाला प्राधान्य देण्याचा मार्ग निवडला आहे. त्यामुळे भारताच्या विकासाठी आवश्यक ते निर्णय सरकार घेत असून त्याचे परिणाम आता दिसू लागले आहेत.
  • ‘ डिजिटल इंडिया’ या योजनेने भारतात मोठी क्रांती घडवून आणली आहे. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून देशाचा सर्वांगीण विकास घडवून आणण्यासाठी सरकारने उचललेले हे महत्वाचे पाऊल होते. सध्या देशात सुरु केलेली 5 जी नेटवर्क सेवा देशासाठी अधिक फायदेशीर ठरणार आहे.
  • Made in India या योजनेमुळे देशाला जागतिक पातळीवर एक वेगळी ओळख मिळाली आहे. जगभरातील कंपन्या आता भारतात गुंतवणूक करत आहेत.गेल्या काही वर्षात देशाची इलेक्ट्रॉनिक वस्तूंची निर्यात मोठ्या प्रमाणात वाढली आहे. खेळण्यांच्या आयातीत 70% घट झाली असून निर्यात 60% पर्यंत वाढली आहे.
  • ‘मेड इन इंडिया’ या योजनेचा लाभ आता भारतीय सैन्याला देखील मिळू लागला आहे. भारतीय सैन्यदलात स्वदेशी बनावटीचे शस्रास्त्रे वापरली जात आहेत. भारतासाठी ही गौरवास्पद बाब आहे. माझ्या सरकारच्या नवीन उपक्रमांमुळे आपली संरक्षण उत्पादनांची निर्यात सहा पटीने वाढली आहे. मला अभिमान आहे की पहिली स्वदेशी विमानवाहू युद्धनौका देखील आज आयएनएस विक्रांतच्या (INS Vikrant) रूपाने आपल्या सैन्यात सामील झाली आहे.
  • ‘आत्मनिर्भर भारत’ (Aatmanirbhar Bharat Yojana) मोहिमेच्या यशाचा लाभ देशाला मिळू लागला आहे. आज भारताची स्वतःची उत्पादन क्षमताही वाढत आहे आणि जगभरातून उत्पादक कंपन्या भारतात गुंतवणूक करण्यासाठी पुढे येत आहेत.
  • माझ्या सरकारने नवोपक्रम (Innovative) आणि उद्योजकतेवर (entrepreneurship) सतत भर दिला आहे. सरकारच्या या धोरणांमुळे आज आपली तरुणाई आपल्या नवनिर्मितीची ताकद जगाला दाखवत आहे.

देशाच्या सर्वांगीण विकासात उद्योगधंद्यांची वाढ महत्वाची असते. मोदी सरकार स्टार्ट अप उद्योगांना प्रोत्साहन देत असल्याचे राष्ट्रपतींनी म्हटले आहे. सरकारने नवीन उद्योगांच्या वाढीसाठी वेळोवेळी धोरण आखले आहे असेही त्या म्हणाल्या. राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या अभिभाषणावरून असा अंदाज लावला जाऊ शकतो की, येणाऱ्या अर्थसंकल्पात उद्योगधंद्यांसाठी, व्यावसायिकांसाठी आणखी काही महत्वाच्या घोषणा होऊ शकतात. कोविड संसर्गानंतर आधीच आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या उद्योगक्षेत्राला या अर्थसंकल्पाकडून मोठ्या अपेक्षा आहेत.