अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनी आपले अभिभाषण केले. आमचे सरकार गरिबांसाठी आवश्यक त्या कल्याणकारी योजना आणण्यासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.येत्या वर्षात भारत सरकार लोककल्याणकारी योजनांवर भर देणार असून, अंत्योदय योजनेसाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करणार आहेत असा उच्चार देखील राष्ट्रपतींनी केला.
मेरी सरकार की प्राथमिकता में देश के 11 करोड़ छोटे किसान हैं। ये छोटे किसान, दशकों से, सरकार की प्राथमिकता से वंचित रहे थे। अब इन्हें सशक्त और समृद्ध करने के लिए हर तरह की कोशिश की जा रही है। pic.twitter.com/9bUqwz2Lvz
— President of India (@rashtrapatibhvn) January 31, 2023
राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या अभिभाषणातील काही मुद्दे
- आयुष्मान भारत योजनेने (Ayushman Bharat Yojana) देशातील करोडो गरीब लोकांना गरिबीच्या गर्तेत जाण्यापासून वाचवले आहे. या योजनेमुळे गरिबांचे 80 हजार कोटी रुपये खर्च होण्यापासून वाचले आहेत.
- जल जीवन अभियानांतर्गत (Jal Jeevan Abhiyan) तीन वर्षात सुमारे 11 कोटी कुटुंबांना थेट पाईपद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला आहे. याचा सर्वाधिक फायदा गरीब कुटुंबांना होत आहे.
- माझ्या सरकारने कोणताही भेदभाव न करता देशातील प्रत्येक वर्गासाठी काम केले आहे. माझ्या सरकारच्या गेल्या काही वर्षांतील प्रयत्नांचा परिणाम म्हणून अनेक मूलभूत सुविधा एकतर 100 टक्के लोकसंख्येपर्यंत पोहोचल्या आहेत किंवा त्या लक्ष्याच्या अगदी जवळ आहेत.
- सद्यस्थितीनुसार पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना (Pradhanmantri Garib Kalyan Yojana)पुढे देखील चालवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. हे संवेदनशील आणि गरिबांचे कल्याण करणाऱ्या सरकारचे वैशिष्ट्य आहे.
- माझ्या सरकारने शतकानुशतके वंचित असलेल्या प्रत्येक समाजाच्या इच्छा पूर्ण केल्या आहेत. गरीब, दलित, मागास, आदिवासींच्या इच्छा पूर्ण करून त्यांना स्वप्न पाहण्याची हिंमत दिली आहे.
- देशातील 11 कोटी छोटे शेतकरी हे माझ्या सरकारचे प्राधान्य आहे. हे छोटे शेतकरी अनेक दशकांपासून सरकारच्या अग्रक्रमापासून वंचित होते. आता त्यांना सशक्त आणि समृद्ध करण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न केले जात आहेत.
- माझ्या सरकारने अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीयांच्या आकांक्षा जागृत केल्या आहेत. हाच वर्ग विकासाच्या लाभापासून सर्वाधिक वंचित होता. आता मुलभूत सुविधा या वर्गापर्यंत पोहोचू लागल्याने हे लोक आता नवी स्वप्ने पाहू शकतात.
- माझ्या सरकारने आदिवासींच्या अभिमानासाठी देखील अभूतपूर्व निर्णय घेतले आहेत. भारताचा ईशान्य आणि आपला सीमावर्ती भाग विकासाचा एक नवीन वेग अनुभवत आहे.
- सीमावर्ती गावांना चांगल्या सुविधा देण्यासाठी माझ्या सरकारने व्हायब्रंट व्हिलेज प्रोग्रामवर (Vibrant Village Program) काम सुरू केले आहे. राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सीमावर्ती भागात गेल्या काही वर्षांत अभूतपूर्व पायाभूत सुविधा निर्माण झाल्या आहेत. शिवाय या भागात विकासाला गती मिळत आहे.
राष्ट्रपतींच्या या अभिभाषणातून येत्या अर्थसंकल्पात सरकार गरिबांसाठी आणखी काही कल्याणकारी योजना आणू शकतात असे संकेत मिळत आहेत. तसेच आधीपासून सुरु असलेल्या लोककल्याणकारी योजना अधिक सक्षम बनविण्याचा सरकार प्रयत्न करेल असा अंदाज वर्तवला जात आहे.