Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

mParivahan App: प्रवास करताना वाहनाची कागदपत्रं सोबत नाहीत? पोलिसांनी पकडल्यास दाखवा ‘हे’ अ‍ॅप

mParivahan App च्या मदतीने वाहनांशी संबंधित कोणतेही काम सहज करू शकता. या अ‍ॅपमुळे वाहनाची कागदपत्रं सोबत बाळगण्याची देखील गरज नाही.

Read More

Online Insurance Copy : वाहनाच्या इन्शुरन्सची कॉपी ऑनलाईन कशी मिळवायची?

विमा कंपन्याचे बरेचशे व्यवहार ऑनलाईन पद्धतीने पूर्ण केले जातात. त्यामध्ये विमा पॉलीसी खरेदी करणे, विमा पॉलिसीचे नुतनीकरण करणे, विम्यासाठी दावा करणे किंवा विम्याचा प्रिमियम भरणे यासारख्या सुविधा ऑनलाईन उपलब्ध केलेल्या असतात. दरम्यान, वाहन चालवताना तुम्हाला तुमच्या वाहनाच्या इन्शुरन्सची प्रत तुमच्याकडे असणे गरजेचे आहे.

Read More

Vehicle For ZP president : जिल्हा परिषद अध्यक्षांचा थाट वाढणार; सरकारी खर्चातून 20 लाखांचे वाहन खरेदीस परवानगी

जिल्हा परिषद अध्यक्षांना ग्रामीण भागात दौरे, जिल्हा परिषदेच्या वतीने जिल्ह्यात विविध भागात आयोजित कार्यक्रम, गावभेटी, यासह राजकीय आणि प्रशासकीय कामासानिमित्त दौरे करण्यासाठी सरकारी खर्चातून चारचाकी वाहन खेरदी केले जाते. यापूर्वी हे वाहन खरेदी करण्यासाठी राज्य शासनाकडून 12 लाख रुपयांची मर्यादा होती.

Read More

NCB : बाइक इन्शुरन्समध्ये नो क्लेम बोनस (NCB) चे महत्व काय आहे? त्याचा फायदा होतो का?

NCB (NO claim Bonus) हे एक प्रकारचे विमा धारकास दिलेले प्रोत्साहन किंवा बोनस मानले जाते. जो वाहन धारक आपल्या वाहनाचा विमा उतरवल्यानंतर त्या विम्याच्या मुदतीमध्ये एकदाही क्लेम करत नाहीत. अशावेळी त्याला बोनस म्हणून विमा कंपनीकडून प्रीमियमच्या किंमतीमध्ये काही टक्क्यांची सवलत दिली जाते, त्यालाच नो क्लेम बोनस म्हटले जाते.

Read More

Vehicle Insurance : विमा कंपनी कशी ठरवते तुमच्या वाहनाची नुकसान भरपाई?

तुमच्या कोणत्याही वाहनाचा विमा (Vehicle Insurance) उतरवत असता त्यावेळी तुमच्या वाहनाचे एक मूल्य निश्चित केली जाते. त्यानंतर तुमचे वाहन चोरीला गेले किंवा अपघातात पूर्णपणे खराब झाले, तर विमा कंपनी तुम्हाला विमा उतरवताना जे मूल्य निश्चित केलेले असते त्याप्रमाणेच वर्तमान स्थितीत तुमच्या वाहनाचे मूल्य निश्चित करून त्यानुसार भरपाईची रक्कम देते. हे भरपाई मूल्य तुमच्या वाहनाच्या आयडीव्हीवर (IDV)ठरते.

Read More

Vehicle Parking Rule: चुकीच्या पद्धतीने गाडी पार्क केल्यास भरावा लागेल दंड, नितीन गडकरी नवा नियम आणण्याच्या तयारीत

बेशिस्तीने वाहन पार्क करणाऱ्या आणि इतर नागरिकांच्या रहदारीत अडथळा आणणाऱ्या वाहन चालकांवर आता कारवाई करण्याच्या विचारात नितीन गडकरी आहेत. एका कार्यक्रमात बोलताना नितीन गडकरी म्हणाले की, जर कोणी रस्त्यावर चुकीच्या पद्धतीने वाहन पार्क केले तर त्याचे छायाचित्र पाठवणाऱ्याला 500 रुपयांचे बक्षीस दिले जाईल आणि वाहन चालकाला 1000 रुपयांचा दंड ठोठावला जाईल.

Read More

Scrapping of old Vehicles : जुन्या गाड्या भंगारात काढण्यास दिल्लीतून सुरुवात, 54 लाख गाड्यांचे रजिस्ट्रेशन रद्द

Scrapping Of Old Vehicles Started From Delhi : दिल्ली हे जगातील सर्वात प्रदूषित शहरांपैकी एक शहर आहे. या शहरातील प्रदूषण कमी करण्यासाठी 2018 मध्ये उच्च न्यायालयाने 10 आणि 15 वर्षे जुन्या पेट्रोल डिझेलच्या वाहनांवर बंदी घातली होती. याचाच परिणाम म्हणजे दिल्ली परिवहन विभागाने 54 लाखांहून अधिक वाहनांची नोंदणी रद्द केली आहे.

Read More

Road Tax Concessions: जुन्या गाड्या स्क्रॅप करून नव्या गाडी खरेदीवर मिळवा कर सवलत

Road Tax Concessions: 15 वर्षांपेक्षा अधिक जुनी वाहने असतील तरच ही सवलत दिली जाते हे देखील लक्षात असू द्या. ,महाराष्ट्र सरकार खासगी आणि व्यावसायिक वापराच्या वाहनांच्या स्क्रॅपिंगनंतर जर तुम्ही नवीन वाहन खरेदी करत असाल तर रोड टॅक्समध्ये 10% रिबेट सवलत दिली जाते.

Read More

Keshub Mahindra passes away : महिंद्रा अँड महिंद्राचे माजी चेअरमन केशब महिंद्रा यांचा उद्योग जगताला अलविदा

Keshub Mahindra passes away : महिंद्र अँड महिंद्राचे माजी अध्यक्ष केशब महिंद्रा यांनी जगाचा निरोप घेतलाय. ते 99 वर्षांचे होते. इनस्पेसचे (INSPACE) अध्यक्ष पवन के. गोयंका यांनी ट्विटरवर पोस्ट करून महिंद्रा यांच्या निधनाची माहिती दिली. त्यांच्या निधनाच्या वृत्तानं उद्योग जगतावर शोककळा पसरली.

Read More

Hero Moto Price Rise: एप्रिलपासून हिरो मोटो कॉर्पच्या बाईक्स महागणार, कंपनीने केली दरवाढ

Hero Moto Price Rise: वाढत्या महागाईने वाहन उत्पादकांना दरवाढ करावी लागली आहे. दुचाकी निर्मितीतील आघाडीची कंपनी हिरो मोटोकॉर्पने 1 एप्रिल 2023 पासून वाहनांच्या किमतीत 2% वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

Read More

Vehicle sales: फेब्रुवारी 2023 मध्ये वाहनांची वाढली विक्री, मारुती सुझुकीपासून टाटा मोटर्सपर्यंत सर्वांनाच झाला नफा

February vehicle sales: फेब्रुवारी 2023 मध्ये, प्रवासी वाहनांच्या एकूण विक्रीने 3.35 लाख युनिट्सचा टप्पा ओलांडला आणि वाहनांच्या प्रचंड मागणीमुळे हा वेग आला. सर्व प्रमुख ऑटोमोबाईल (Automobile) उत्पादक कंपन्यांनी वार्षिक आधारावर विक्रीत वाढ नोंदवली आहे.

Read More

Vehicles Scrap Policy: 1 एप्रिलपासून, वाहन स्क्रॅप धोरण लागू, 15 वर्षे जुनी सरकारी वाहने जाणार भंगारात!

Vehicle Scrappage Policy in India: 15 वर्षांहून अधिक जुनी वाहने भंगारात काढण्यासाठी भारत सरकार अनेक दिवसांपासून प्रयत्न करत आहे. आता याबाबत निर्णय आला असून यावर्षी 1 एप्रिलपासून या श्रेणीतील वाहने भंगारात काढण्यात येणार आहेत, याबाबतचा अधिक तपशील पुढे वाचा.

Read More