Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Online Insurance Copy : वाहनाच्या इन्शुरन्सची कॉपी ऑनलाईन कशी मिळवायची?

Online Insurance Copy : वाहनाच्या इन्शुरन्सची कॉपी ऑनलाईन कशी मिळवायची?

विमा कंपन्याचे बरेचशे व्यवहार ऑनलाईन पद्धतीने पूर्ण केले जातात. त्यामध्ये विमा पॉलीसी खरेदी करणे, विमा पॉलिसीचे नुतनीकरण करणे, विम्यासाठी दावा करणे किंवा विम्याचा प्रिमियम भरणे यासारख्या सुविधा ऑनलाईन उपलब्ध केलेल्या असतात. दरम्यान, वाहन चालवताना तुम्हाला तुमच्या वाहनाच्या इन्शुरन्सची प्रत तुमच्याकडे असणे गरजेचे आहे.

कोणतेही वाहन घेऊन सार्वजनिक ठिकाणी बाहेर पडताना तुम्हाला वाहतूक नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे तुमच्याकडे वाहनाचा विमा असणे हे देखील गरजेचे आहे. कित्येक वेळा वाहतूक पोलीस तुम्हाला विमा पॉलिसी बद्दल विचारणा करतात. तसेच दुर्दैवाने तुमच्या वाहनाचा अपघात झाल्यास तुमच्याकडे तुमच्या वाहनाच्या विमा पॉलिसीची कागदपत्रे असणे गरजेचे आहे. नसेल तर आपणास दंडात्मक कारवाई किंवा आर्थिक नुकसानीला सामारे जावे लागते. दरम्यान, वाहनाचा विमा काढलेला असताना त्याची प्रत ऑनलाईन कशी डाऊनलोड करायची याबाबतची माहिती जाणून घेऊयात..

विमा कंपन्यांचे ऑनलाईन व्यवहार-

मार्केटमध्ये विमा संरक्षण देणाऱ्या अनेक कंपन्या उपलब्ध आहेत. तसेच यातील बहुतांश कंपन्यांकडून ऑनलाईन सुविधा दिल्या जातात. विमा कंपन्याचे बहुतांश व्यवहार ऑनलाईन पद्धतीने पूर्ण केले जातात. त्यामध्ये विमा पॉलिसी खरेदी करणे, विमा पॉलिसीचे नुतनीकरण करणे, विम्यासाठी दावा करणे किंवा विम्याचा प्रिमियम भरणे यासारख्या सुविधा ऑनलाईन उपलब्ध केलेल्या असतात. दरम्यान, वाहन चालवताना तुम्हाला तुमच्या वाहनाच्या इन्शुरन्सची प्रत तुमच्याकडे असणे गरजेचे आहे. मात्र, तुमच्याकडून ती गहाळ झाली असल्यास तुम्ही ती प्रत ऑनलाईन देखील डाऊनलोड करू शकता किंवा तुम्ही ऑफलाईन पद्धतीने देखील डुप्लीकेट प्रत प्राप्त करू शकता. दरम्यान आपण ही प्रत पुढील पद्धतीने प्राप्त करू शकतो.

विमा कंपनीचे संकेतस्थळ

तुमच्या वाहनाच्या इन्शुरन्सची प्रत ऑनलाईन मिळवायची असल्यास तुम्ही संबंधित विमा कंपनीच्या संकेतस्थळावरून ती प्राप्त करू शकता. यासाठी तुम्हाला विमा कंपनीच्या संकेतस्थळावर जाऊन तुमचा वाहन क्रमांक, मोबाईल क्रमांक किंवा पॉलिसी क्रमांक टाकून लॉगिन करावे लागणार आहे. त्यानंतर तुम्हाला तिथे तुमची प्रोफाईल उपलब्ध होईल. तिथे तुम्ही तुमच्या पॉलिसी संदर्भातील सर्व तपशील पाहू शकता. तसेच तुम्हाला आवश्यक असणारी प्रत डाऊनलोड देखील करू शकता. पॉलिसी डाऊनलोड केल्यानंतर तुम्ही तुमचे नाव, वाहन क्रमांक, मोबाईल नंबर, पत्ता इत्यादी तपशील योग्य असल्याची खात्री करून घ्या. तसेच प्रत मिळवण्यास काही अडचण निर्माण झाल्यास तुम्ही तुमच्या विमा कंपनीच्या प्रतिनिधीला कॉल करून माहिती घेऊ शकता.

इन्शुरन्स इन्फॉर्मेशन ब्युरो (IIB)

वाहन क्रमांकाद्वारे विमा प्रत डाउनलोड करण्यासाठी तुम्ही इन्शुरन्स इन्फॉर्मेशन ब्युरो (IIB) या संकेतस्थळावर देखील भेट देऊ शकता. या ठिकाणी तुम्हाला IIB पोर्टलवर V-Seva पर्याय निवडायचा आहे. त्यानंतर तुम्हाला तुमच्यापुढे ओपण होणाऱ्या दुसऱ्या एका पेजवर आवश्यक ती माहिती भरायची आहे.  त्यानंतर तुम्ही फॉर्म'सबमिट' या बटणावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला तुमच्या वाहन विमा स्थितीचे तपशील उपलब्ध होतील. येथून तुम्ही तुमच्या वाहनाची प्रत डाऊनलोड करू शकता.

M-Parivahan अॅप किंवा वेबसाइटद्वारे

तुम्ही तुमच्या वाहनाच्या विम्याची प्रत mParivahan या अॅप किंवा वेबसाइटद्वारे देखील मिळवू शकता. परिवहन सेवा ही केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने देखरेख केलेली वेबसाइट आहे. यामध्ये सर्व वाहनांचा डेटा संग्रहित कऱण्यात येतो. या संकेतस्थळावरून विमा पॉलिसीची प्रत मिळवण्यासाठी तुम्हाला सुरुवातीला परिवहन सेवेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल. त्यानंतर तुम्हाला 'माहिती सेवा' या टॅबवर जाऊन  वाहनाचे तपशील जाणून घ्या’ या पर्यायावर क्लिक करावे लागेल. त्यानंतर तुम्हाला वाहन एनआर ई-सेवा या पेजवर लॉगिन करावे लागेल. तुमचा नोंदणीकृत मोबाइल क्रमांक टाकून लॉगिन केल्यानंतर, तुमचे वाहन नोंदणी क्रमांक टाकून व्हेरिफिकेशन प्रक्रिया पूर्ण करा. त्यानंतर वाहन शोधा या पर्यायावर क्लिक केल्यास तुम्हाला तुमच्या वाहनाचे तपशील आणि विमा पॉलिसीची सर्व माहिती उपलब्ध होईल. येथून ती तुम्ही डाऊनलोड करू शकता.

दरम्यान तुम्हाला तुमच्या वाहनाच्या विम्याची प्रत ऑनलाईन उपलब्ध नाही झाल्यास तुम्ही ती ऑफलाईन देखील प्राप्त करू शकता. यासाठी तुम्हाला विमा कंपनीच्या कार्यालयात जाऊन तुमच्या विमा पॉलिसीचा तपशील देऊन अर्ज सादर करावा लागेल. त्यानंतर तुम्हाला त्यांच्या नियमांप्रमाणे विमा पॉलिसीची प्रत उपलब्ध करून दिली जाते.