Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

mParivahan App: प्रवास करताना वाहनाची कागदपत्रं सोबत नाहीत? पोलिसांनी पकडल्यास दाखवा ‘हे’ अ‍ॅप

mparivahan app

Image Source : https://www.squareyards.com/

mParivahan App च्या मदतीने वाहनांशी संबंधित कोणतेही काम सहज करू शकता. या अ‍ॅपमुळे वाहनाची कागदपत्रं सोबत बाळगण्याची देखील गरज नाही.

बाईक, कारने प्रवास करताना अनेक कागदपत्रं सोबत बाळगावी लागतात. वाहनाने प्रवास करताना तुमच्याकडे ड्राइव्हिंग लायसन्स, रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट सारखी कागदपत्रं नसल्यास दंड भरावा लागतो. मात्र, तुमच्या मोबाइलमध्ये mParivahan App असल्यास अशी कागदपत्रं सोबत बाळगण्याची गरज नाही. वाहनांशी संबंधित कोणतेही काम अवघ्या काही मिनिटात या अ‍ॅपच्या मदतीने करता येईल. mParivahan App नक्की काय आहे? याचा कोणत्या कामांसाठी वापर करू शकता? याविषयी सविस्तर जाणून घेऊया. 

एमपरिवहन अ‍ॅप काय आहे?

भारत सरकारच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाद्वारे वाहनचालकांच्या सुविधेसाठी हे अ‍ॅप उपलब्ध करण्यात आले आहे. डिजिटल इंडिया अभियानांतर्गत देशातील वाहनचालकांना वाहतुकीसंदर्भातील सर्व सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हे अ‍ॅप लाँच करण्यात आले होते. या अ‍ॅपच्या माध्यमातून वाहनांसंबंधी सर्व कागदपत्रे डिजिटल स्वरुपात उपलब्ध होतील. ही डिजिटल कागदपत्रे तुम्ही पोलिसांना दाखवू शकता. विशेष म्हणजे हे अ‍ॅप पूर्णपणे मोफत उपलब्ध आहे. 

एमपरिवहन अ‍ॅपमध्ये असे करा रजिस्ट्रेशन

  • एमपरिवहन अ‍ॅपमध्ये रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम गुगल प्ले स्टोर अथवा अ‍ॅपल प्ले स्टोरवरून हे अ‍ॅप फोनमध्ये डाउनलोड करावे लागेल.
  • त्यानंतर भाषा निवडून Sign-in वर क्लिक करा.
  • आता तुमचा मोबाइल नंबर टाकून Terms & Conditions वर क्लिक करून सबमिट करा.
  • तुम्हाला एक ओटीपी येईल. हा ओटीपी व्हेरिफाय केल्यानंतर रजिस्ट्रेशन प्रोसेस पूर्ण होईल. 
  • यानंतर तुम्ही अ‍ॅपमध्ये गाडी व लायसन्सची माहिती टाकून व्हर्च्युअल ड्रायव्हिंग लायसन्स आणि आरसी जनरेट करू शकता.
brainstorming-techniques.png

एमपरिवहन अ‍ॅपवर मिळेल या सेवांचा फायदा

डिजिटल RC आणि DCवाहन चालवताना लायसन्स, रजिस्ट्रेशन, पीयूसी सारखी कागदपत्रं जवळ नसल्यास दंड भरावा लागतो. परंतु, तुम्ही एमपरिवहन अ‍ॅपच्या माध्यमातून व्हर्च्युअल ड्रायव्हिंग लायसन्स आणि RC जनरेट करू शकता. ट्रॅफिक पोलिसांनी वाहनाशी संबंधित कागदपत्रे मागितल्यास तुम्हाला अ‍ॅपमधील ही कागदपत्रे दाखवता येतील. तुम्ही गरज पडल्यास वाहनाचे नोंदणी प्रमाणपत्र इतरांना देखील शेअर करू शकता. 
दंडाची माहिती मिळेलया अ‍ॅपच्या माध्यमातून तुम्हाला तुमच्या वाहनावर असलेल्या दंडाची संपूर्ण माहिती मिळेल. तुम्ही  RC अथवा DC क्रमांक टाकून चलनाची माहिती जाणून घेऊ शकता.
RC आणि DC अर्जाची स्थिती

तुम्ही जर ड्रायव्हिंग लायसन्स अथवा रजिस्ट्रेशन सर्टिफिकेटसाठी अर्ज केला असल्यास याची स्थिती  अ‍ॅपच्या माध्यमातून जाणून घेऊ शकता. तुम्हाला लर्नर लायसन्स, तात्पुरते आरसी रजिस्ट्रेशन, पत्त्यातील बदल इत्यादी सर्व माहिती मिळेल. 

वाहतुक सेवांची मिळेल माहिती - तुम्हाला अ‍ॅपवर जवळील प्रादेशिक परिवहन कार्यालय (RTO), प्रदूषण तपासणी केंद्र (Pollution checking centre) आणि रोड टॅक्स सेवांची संपूर्ण मिळते.

वाहनांशी संबंधित मिळेल संपूर्ण माहितीअ‍ॅपवर गाडीचा नंबर टाकून कोणत्याही वाहनाच्या मालकाचे नाव, नोंदणी तारीख, वाहन विमा, फिटनेस वैधता इत्यादी सर्व माहिती जाणून घेऊ शकता.