Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Road Tax Concessions: जुन्या गाड्या स्क्रॅप करून नव्या गाडी खरेदीवर मिळवा कर सवलत

Road Tax Concessions

Road Tax Concessions: 15 वर्षांपेक्षा अधिक जुनी वाहने असतील तरच ही सवलत दिली जाते हे देखील लक्षात असू द्या. ,महाराष्ट्र सरकार खासगी आणि व्यावसायिक वापराच्या वाहनांच्या स्क्रॅपिंगनंतर जर तुम्ही नवीन वाहन खरेदी करत असाल तर रोड टॅक्समध्ये 10% रिबेट सवलत दिली जाते.

जेव्हा तुम्ही तुमचे जुने वाहन स्क्रॅप करत असाल तर तुम्हाला तुमच्या नव्या कार खरेदीवर रोड टॅक्समध्ये सवलत मिळेल. ही सवलत जेव्हा तुम्ही तुमच्या नव्या कारची नोंदणी करायला जाता तेव्हा तुमची मोठी बचत होऊ शकते, हे विसरू नका. प्रत्येक राज्याचे याबाबत वेगवेगळे नियम आहेत. यासाठी तुम्हाला राज्य परिवहन खात्याशी संपर्क करावा लागेल.आता तुम्ही म्हणाल वाहन स्क्रॅप केल्यानंतरच ही सुविधा का दिली जाते? याचे मुख्य कारण म्हणजे पर्यावरणाचा विचार. जुनी वाहने आधी वायू प्रदूषण करतात, जुन्या वाहनांचा जितका जास्त वापर करू तितके जास्त प्रदूषण वाढत जाते, त्यामुळे वेळीच अशा गाड्या स्क्रॅप करणे गरजेचे असते. त्यामुळेच जुन्या गाड्या स्क्रॅप करणाऱ्या ग्राहकांना नवीन गाडी खरेदीवर सरकार आकर्षक सवलत देत आहे.

15 वर्षांपेक्षा अधिक जुनी वाहने असतील तरच ही सवलत दिली जाते हे देखील लक्षात असू द्या. महाराष्ट्र सरकार खासगी आणि व्यावसायिक वापराच्या वाहनांच्या स्क्रॅपिंगनंतर जर तुम्ही नवीन वाहन खरेदी करत असाल तर रोड टॅक्समध्ये 10% रिबेट सवलत दिली जाते. गाडीचे RTO संबंधित असलेले जुनी देयके देखील माफ केले जातात. 

ही सवलत मिळवायची असेल तर खालील गोष्टींची पूर्तता करणे आवश्यक आहे.

वाहन स्क्रॅप केल्याचे प्रमाणपत्र ( Certificate of Destruction/Scrap):  रोड टॅक्स सवलतीसाठी अर्ज करण्यापूर्वी, तुम्हाला तुमचे जुने वाहन स्क्रॅप करणे आवश्यक आहे. वाहन अधिकृत स्क्रॅप यार्डमध्येच (Registered Vehicle Scrapping Facilities). स्क्रॅप होणे आवश्यक आहे. तुम्ही खासगी स्क्रॅप यार्डमध्ये जर तुमची गाडी स्क्रॅप केली तर तुम्हांला कुठलीही सवलत दिली जाणार नाही हे लक्षात असून द्या. अधिकृत स्क्रॅप यार्डमध्ये गाडी स्क्रॅप केल्यानंतर तुम्हांला यार्डतर्फे वाहन स्क्रॅप केल्याचे प्रमाणपत्र( Certificate of Destruction/Scrap) दिले जाते. हे प्रमाणपत्र हे दर्शवते की तुम्ही तुमच्या वाहनाची संपूर्ण विल्हेवाट लावली आहे.  

संबंधित अधिकाऱ्यांना सूचना द्या  (Notify the Relevant Authorities): सध्या या कामासाठी तुम्हांला धावपळ करण्याची गरज भासत नाही. थेट शोरूममधून गाडी खरेदी केल्यामुळे शोरूमद्वारेच RTO अधिकाऱ्यांशी संपर्क साधतात आणि आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण करतात. तुम्ही सादर केलेल्या वाहन स्क्रॅप प्रमाणपत्राची शहानिशा करूनच तुम्ही या सवलतीसाठी पात्र आहात किंवा नाही हे ठरवले जाते.

रोड टॅक्स सवलतीसाठी अर्ज करा (Apply for the Road Tax Concession):  एकदा तुमच्याकडे तुमचे वाहन स्क्रॅप प्रमाणपत्र असेल आणि तुम्ही संबंधित अधिकाऱ्यांना त्याबद्दल सूचित केले की, तुम्ही रोड टॅक्स सवलतीसाठी अर्ज करू शकता. यामध्ये अर्ज भरणे आणि तुमचे वाहन नोंदणी प्रमाणपत्र आणि मालकीचा पुरावा यासारखी कागदपत्रे प्रदान करणे आवश्यक असते.

प्रक्रियेसाठी प्रतीक्षा करा (Wait for Processing): तुमचा अर्ज सबमिट केल्यानंतर, तुम्हाला त्यावर प्रक्रिया होण्याची प्रतीक्षा करावी लागेल. साधारण आठवडाभरात तुम्हांला याची माहिती संबंधित विभागातर्फे कळवली जाते.

सवलत मिळवा (Receive the Concession): तुमचा अर्ज मंजूर झाल्यानंतरच, तुम्हाला रोड टॅक्समध्ये सवलत मिळेल ज्यामुळे तुमच्या वाहनाच्या नोंदणीचे नूतनीकरण करताना तुम्हाला भरावा लागणारा कर कमी होईल.

हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की रस्ता कर सवलत मिळविण्याची प्रक्रिया वेगवेगळ्या राज्यांसाठी वेगवेगळी आहे.  कर्नाटक, पंजाब, मध्य प्रदेश, ओडिशा, झारखंड, राजस्थान, बिहार, आसाम, चंदीगड आणि मिझोराम या राज्यांत रोड टॅक्समध्ये सरकारतर्फे 10% रिबेट सवलत दिली जाते. तर महाराष्ट्रात मात्र 10%  रिबेट सवलत दिली जाते आहे,.

भारतीय अर्थ मंत्रालयाने यंदाच्या अर्थसंकल्पात राज्यांसाठी 2,000 कोटी रुपये विशेष सहाय्य म्हणून राखून ठेवले आहेत.ही आर्थिक सवलत किंवा प्रोत्साहन ‘प्रथम येणाऱ्यास प्राधान्य’ या तत्त्वावर दिली जाणार आहे.त्यामुळे या सवलतीचा याच आर्थिक वर्षात तुम्हांला फायदा मिळणार आहे हे लक्षात असू द्या.