Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Vehicle Insurance : विमा कंपनी कशी ठरवते तुमच्या वाहनाची नुकसान भरपाई?

IDV

तुमच्या कोणत्याही वाहनाचा विमा (Vehicle Insurance) उतरवत असता त्यावेळी तुमच्या वाहनाचे एक मूल्य निश्चित केली जाते. त्यानंतर तुमचे वाहन चोरीला गेले किंवा अपघातात पूर्णपणे खराब झाले, तर विमा कंपनी तुम्हाला विमा उतरवताना जे मूल्य निश्चित केलेले असते त्याप्रमाणेच वर्तमान स्थितीत तुमच्या वाहनाचे मूल्य निश्चित करून त्यानुसार भरपाईची रक्कम देते. हे भरपाई मूल्य तुमच्या वाहनाच्या आयडीव्हीवर (IDV)ठरते.

आपल्या वाहनाचा अपघात झाल्यास अथवा ते चोरीस गेल्यास आपण तत्काळ विमा (Insurance) कंपनीकडे धाव घेतो. त्यानंतर विमा कंपनी तुम्हाला ठराविक नुकसान भरपाई देते. मात्र, मिळणारी नुकसान भरपाई नेमकी कशाच्या आधारावर ठरवली जाते. त्यासाठी कोणत्या नियमांचा आधार घेतला जातो,याबाबत बऱ्याच जणांना माहिती नसते. आज आपण विमा कंपनी वाहनाची नुकसान भरपाई कशी ठरवते त्याबाबतची माहिती जाणून घेऊयात.

कशी ठरवले जाते भरपाई


तुमच्या कोणत्याही वाहनाचा विमा उतरवत असता त्यावेळी तुमच्या वाहनाचे एक मूल्य निश्चिती केली जाते. त्यानंतर तुमचे वाहन चोरीला गेले किंवा अपघातात पूर्णपणे खराब झाले, तर विमा कंपनी तुम्हाला विमा उतरवताना जे मूल्य निश्चित केलेले असते त्याप्रमाणेच वर्तमान स्थितीत तुमच्या वाहनाचे मूल्य निश्चित करून त्यानुसार नुकसान भरपाईची रक्कम देते. हे भरपाई मूल्य तुमच्या वाहनाच्या आयडीव्हीवर (IDV) अवलंबून असते. यासाठी आपणास आव्हीडी म्हणजे काय ते समजून घ्यावे लागेल.

आयडीव्ही म्हणजे काय? Insured Declared Value (IDV)

आयडीव्ही म्हणजे विमा उतरवलेले घोषित मूल्य.विमा काढताना विमा कंपनी तुमच्या वाहनाच्या सध्याच्या किमतीचे मूल्यांकन करते आणि त्या किमतीची आयडीव्ही म्हणून विमा कंपनीकडे नोंद होते. थोडक्यात Insured Declared Value (IDV) म्हणजे तुमच्या वाहनाचे अंदाजे करण्यात आलेले एक बाजार मूल्य (approximate market value) आहे. म्हणजे तुमच्या वाहनाच्या विमा पॉलिसीतर्गंत प्राप्त होणारी रक्कम ठरवण्यासाठी आयव्हीडीचा उपयोग केला जातो. तुमच्या वाहनाच्या अवमूल्यन कालावधीनुसार प्रतिवर्षी IDV बदलत असतो. ज्यावेळी तुमची कार चोरीला जाते किंवा अपघात होऊन दुरुस्तीच्या पलीकडे नुकसान होते, अशावेळी IDV च्या माध्यमातून तुमच्या वाहनाचे सर्वोच्च बाजारमूल्य ठरवले जाते  आणि तुम्हाला मिळणारी नुकसान भरपाई निश्चित केली जाते. जितका जास्त IDV असेल तितकी प्रीमियम रक्कम जास्त आणि जितका कमी असेल तितकी प्रिमियम रक्कम कमी असते.

आयडीव्ही कसे ठरवतात? how to calculate?

आयडीव्ही निश्चित करण्यासाठी तुमच्या वाहनाचा कालावधी विचारात घेतला जातो. सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास आयडीव्ही म्हणजे तुमच्या वाहनाचे घोषित मूल्य हे त्या वाहनाच्या वयानुसार ठरलवले जाते. जेव्हा तुमचे वाहन नवीन  असते त्यावेळी विमा उतरवत असताना तिची आयडीव्ही किंमत ही शोरूमच्या किमतीएवढी ठेवली जाते. परंतु वाहन जसजसे जुने होईल तसे त्या वाहनाचे बाजारमूल्य घटत जाते. त्यानुसार आडीव्हीमध्येही बदल होते जातो. हा बदलनारा आडीव्ही पुढील प्रमाणे बाजार मूल्य ठरवतो. तुमच्या वाहनाच्या कालावधीनुसार तुमच्या वाहनाचे मूल्य हे शोरुम किमतीच्या तुलनेत पुढे दिलेल्या टक्केवारीनुसार घटत जाते. त्यानुसारच आयडीव्ही ठरतो आणि तुम्हाला किती भरपाई द्यायची हे निश्चित केले जाते. तसेच गाडीची नोंदणी आणि विम्याची किंमत IDV मूल्यामध्ये समाविष्ट केली जात नाही.

कालावधीआयडीव्ही टक्केवारी (IDV)  
6 महिन्यांपर्यंत  5%
6 महिने ते 1 वर्ष 15%
1-2 वर्षापर्यंत 20%
2-3 वर्षापर्यंत 30%
3-4 वर्षापर्यंत 40%
4-5 वर्षापर्यंत 50%
5 वर्षाहून अधिक+वाहनाची स्थिती पाहून


पाच वर्षांपेक्षा जास्त जुन्या वाहनांसाठी, IDV निश्चित करताना विमा कर्ता वाहनाच्या स्थिविमा कंपनीणी करतो आणि त्याचे मूल्यांकन ठरवतो. त्या मूल्यांकनानंतर विमाकंपनी आणि पॉलिसीधारक दोघांनाही IDV वर परस्पर सहमती द्यावी लागते.

IDV का आवश्यक आहे?

विमा कंपनी आणि ग्राहक यांच्यात वादाची स्थिती निर्माण होऊ नये या दृष्टीकोनातून आयडीव्हीची आवश्यकता अतिशय महत्त्वाची आहे. वाहनाची चोरी किंवा अपघात झाल्यास वाहन मालक विमा कंपनीकडे जास्त भरपाईची मागणी करतो तर विमा कंपनी कमीत कमी रक्कम देण्याचा प्रयत्न करत अशावेळी आयडीव्हीच्या आधारे तुमच्या वाहनाचे मुल्यांकन करून भरपाई दिली जाते. त्यामुळे प्रकरण गुंतागुंतीचे होत नाही.