केशब महिंद्रा हे महिंद्रा अँड महिंद्रा (Mahindra & Mahindra) या कंपनीचे माजी अध्यक्ष होते. 1947मध्ये आपल्या वडिलांच्या कंपनीत ते रुजू झाले. वाहन निर्मिती आणि विक्री हा प्रामुख्यानं त्यांचा व्यवसाय होता. 1963 ते 2012 या मोठ्या कालखंडात त्यांनी मुंबई लिस्टेड ग्रुपचे अध्यक्ष म्हणूनही काम पाहिलं. आपल्या निवृत्तीनंतर त्यांनी पुतण्या आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांच्यावर ही जबाबदारी सोपवली.
Table of contents [Show]
पंतप्रधानांच्या व्यापार आणि उद्योग परिषदेचे राहिले सदस्य
व्हार्टन, पेनसिल्व्हेनिया विद्यापीठाचे ते माजी विद्यार्थी. विलीस जीपच्या केवळ असेंबलरचं काम पाहणाऱ्या महिंद्रा अँड महिंद्राचं भारतातल्या एका समूहात रूपांतर करण्याचं श्रेय केशब महिंद्रा यांना जातं. यात त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची राहिली. महिंद्रा समूहानं ट्रॅक्टर आणि स्पोर्ट्स वाहनांच्याही पुढे जात आपला पोर्टफोलिओ अधिक मजबूत आणि विस्तारित केला. याचं मूल्य 19 अब्ज आहे. यातही केशब महिंद्रा यांचं योगदान होतं. सॉफ्टवेअर सेवा आणि रिअल इस्टेट क्षेत्रातदेखील त्यांच्या नेतृत्वात कंपनीनं चांगली कामगिरी केली. केशब महिंद्रा यांना फ्रेंच सरकारनं 1987 मध्ये शेवेलियर डी ल'ऑर्डे नॅशनल डेला लीजन डी'होनूर या पुरस्कारानं सन्मानित केलं. केशब महिंद्रा हे 2004 ते 2010पर्यंत पंतप्रधानांच्या व्यापार आणि उद्योग परिषदेचे नवी दिल्लीचे सदस्यही राहिलेले आहेत.
'त्यांचं काम कायम प्रेरणा देत राहील'
केशब महिंद्रा यांच्या निधनानं भरून न येणारी पोकळी निर्माण झालीय. उद्योग जगतासाठी त्यांचं मोठं योगदान आहे. त्यामुळे उद्योग जगतानं एक मोठं व्यक्तीमत्व गमावलंय. त्यांनी सच्चर आयोग, केंद्रीय सल्लागार परिषद यासह अनेक सरकार नियुक्त समित्यांवरही काम केलं. केशब महिंद्रा यांना जवळून पाहण्याची, जाणून घेण्याची संधी मला मिळाली, हे माझं भाग्य. त्याचं व्यवसाय, अर्थशास्त्रीय आणि सामाजिक काम नेहमीच प्रेरणा देत राहील, असं पवन गोयंका यांनी आपल्या आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय.
The industrial world has lost one of the tallest personalities today. Shri Keshub Mahindra had no match; the nicest person I had the privilege of knowing. I always looked forward to mtgs with him and inspired by how he connected business, economics and social matters. Om Shanti.
— Pawan K Goenka (@GoenkaPk) April 12, 2023
व्यवसाय वाढवला
महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीची वार्षिक बैठक 8 ऑगस्ट 2012ला पार पडली. या बैठकीतच त्यांनी आपल्या निवृत्तीची घोषणा केली. 1948मध्ये मंडळात ते रुजू झाले होते. 1963मध्ये त्यांची अध्यक्षपदी निवड झाली होती. वाहन निर्मिती, विक्री, ऑटोमोबाइल यात स्पोर्ट्स वाहनं, ट्रॅक्टर, ऑटो पार्ट्स, माहिती तंत्रज्ञान, रिअल इस्टेट, वित्तीय सेवा आणि व्यवसायांची साखळी या क्षेत्रातील कंपन्यांच्या फेडरेशनमध्ये विकास झाला.
अडचणींचाही करावा लागला सामना
केशब महिंद्रा यांनी सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातल्या विविध मंडळं आणि परिषदांवरही आपल्या कार्यकाळात काम केलं. भोपाळ गॅस अपघात प्रकरणात त्यांना अडचणींचा सामना करावा लागला होता. भोपाळ न्यायालयानं केशब महिंद्रा यांच्यासह सर्व 7 आरोपींना दोषी ठरवलं होतं. त्यांना जास्तीत जास्त दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली गेली. त्यावेळी ते युनियन कार्बाइडचे बिगर कार्यकारी अध्यक्ष होते. तर महिंद्रा 2004 ते 2010 या कालावधीत पंतप्रधानांच्या व्यापार आणि उद्योग परिषदेचादेखील एक भाग होते.