NCB (NO claim Bonus) : वाहन घेतल्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव आणि भविष्यातील संभाव्य आर्थिक धोके टाळण्यासाठी आपण विमा घेतो. मात्र, आपण काळजीपूर्वक वाहन चालवत असाल तर अपघाताचा धोकाही टळतो आणि वाहनही सुस्थितीत राहते. परिणामी बहुतांशवेळा आपल्या वाहनाचा विमा काढला असला तरी क्लेम करण्याची वेळ कधी आपल्यावर येत नाही. त्यामुळे काही जणाला असा प्रश्न पडतो मग आपणास याचा फायदा काय आहे. मात्र अशा विमाधारकास नो क्लेम बोनस (NCB) उपयुक्त ठरतो.एनसीबी म्हणजे नेमके काय आणि त्याचा आपल्याला कशा प्रकारे उपयोग होतो याची माहिती या लेखात आपणास मिळेल.
नो क्लेम बोनस म्हणजे काय?
NCB (NO claim Bonus) हे एक प्रकारचे विमा धारकास दिलेले प्रोत्साहन किंवा बोनस मानले जाते. जो वाहनधारक आपल्या वाहनाचा विमा उतरवल्यानंतर त्या विम्याच्या मुदतीमध्ये एकदाही क्लेम करत नाहीत. अशावेळी त्याला बोनस म्हणून विमा कंपनीकडून प्रीमियमच्या किंमतीमध्ये काही टक्क्यांची सवलत दिली जाते त्यालाच नो क्लेम बोनस म्हटले जाते. साधारणपणे, विमा कंपनी एक ते पाच वर्षांच्या कालावधीत 20% ते 50% च्या श्रेणीत NCB प्रदान करते. थोडक्यात मागील विमा पॉलिसी दरम्यान, जर तुम्ही कोणताही विमा दावा केला नसेल किंवा फक्त 1 वेळा दावा केला असेल, तर विमा कंपनी तुम्हाला पुढील पॉलिसीमध्ये सूट देते. जर तुम्ही तुमच्या विमा पॉलिसीसोबत नो क्लेम बोनस प्रोटेक्टर अॅड ऑन जोडला असेल तरच तुम्हाला हा लाभ मिळू शकेल.
कसा ठरवला जातो एनसीबी-?
जर एखाद्या ग्राहकाला नो क्लेम बोनस द्यायचा असेल तर त्यासाठी प्रमाण ठरवण्यात आले आहे. जर ग्राहकाने विमा घेतल्यानंतर 1 ते 2 वर्ष क्लेम नाही घेतला तर त्याला नवीन विमा घेताना 25% ची सूट दिली जाते. तसेच 3वर्ष नाही केल्यास 35%, 4 वर्षे 45% आणि 5 वर्षे किंवा त्याहून अधिक क्लेम नाही केल्यास त्यास प्रिमियममध्ये 50% पर्यंत सूट दिली जाते. एका उदाहरणाच्या माध्यामातून आपण हे समजून घेऊयात. या योजनेअंतर्गत ग्राहकाला 50 % पेक्षा जास्त सूट मिळत नाही.
नियम व अटी-
- एका वर्षात एकदाच मिळतो नो क्लेम बोनस
- विमा संपल्यानंतर 3 महिन्याच्यात नवीन विमा घेणे आवश्यक
- फक्त थर्ड पार्टी विमा काढला असेल तर मिळत नाही नो क्लेम बोनस
- संबंधित विमा धारकालाच मिळतो फायदा