Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Budget 2023 Expectations: इंडियन आर्मीसाठी यंदाचे बजेट असेल खास, New India ची दिसेल झलक

भारतीय संरक्षण उत्पादन उद्योगाला (Defence Products) 2023-24 च्या अर्थसंकल्पाकडून मोठ्या आशा आहेत. संरक्षण क्षेत्रातील संशोधन आणि विकासाला चालना देण्यासाठी सरकार पुढाकार घेईल, अशी आशा उद्योगाशी संबंधित लोकांना आहे.इंडियन आर्मीसाठी (Indian Army) यंदाचे बजेट खास असेल असे मानले जात आहे.

Read More

Budget 2023 Expectations: मनरेगावरचा खर्च निम्मा केल्यानंतर आता या रोजगार योजनेला मिळू शकते मोठे अर्थसहाय्य!

कोरोनानंतर मनरेगा (MNREGA) योजनेची परिस्थिती आणखीनच दयनीय झाली आहे. कोविडनंतर मनरेगाचे बजेट निम्मे करण्यात आले आहे. अहवालानुसार, गेल्या पाच वर्षांत सरकारने प्रत्येक कुटुंबाला 48 दिवस काम उपलब्ध करून दिले आहे. अशा स्थितीत या योजनेंतर्गत मिळालेल्या कामात वाढ करायची असेल, तर आधीच्या तुलनेत जवळपास दुप्पट आर्थिक तरतूद आवश्यक आहे.

Read More

Budget 2023 Expectations: गॅस सिलेंडरचे भाव कमी होणार! उज्वला योजनेसाठी सरकार विशेष पॅकेज देण्याच्या तयारीत

उज्वला योजनेअंतर्गत (Ujjwala Yojana) दारिद्र्यरेषेखालील (Below Poverty Level) लोकांना मोफत एलपीजी गॅस कनेक्शन (LPG Gas Connection) दिले जाते. यासाठी त्यांना 1,600 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. याशिवाय मोफत रिफिल आणि स्टोव्ह देण्याची तरतूद या योजनेत केली गेली आहे.येत्या अर्थसंकल्पात यावर अधिक अनुदान दिली जाण्याची शक्यता आहे.

Read More

Budget 2023- 8th Pay Commission: निर्मला सितारामन बजेटमध्ये करणार मोठी घोषणा, कर्मचाऱ्यांना आठव्या वेतन आयोगाचे गिफ्ट!

भारतीयांना आता अर्थसंकल्पाचे वेध लागले आहेत. येत्या 1 फेब्रुवारी 2023 रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन संसेदत बजेट सादर करतील. यावेळी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Read More

Budget 2023 Expectation: सरकार पशु विमा योजना आणण्याच्या तयारीत, पशुपालन उद्योगाला मिळेल संजीवनी!

2023-24 च्या अर्थसंकल्पात केंद्र सरकार शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा करू शकते. गेल्या वर्षी लाखो शेतकऱ्यांच्या पाळीव प्राण्यांचा लम्पी व्हायरसच्या (Lumpy Skin Disease) संसर्गाने मृत्यू झाला होता.या रोगाने पशुसंपत्तीचे मोठे नुकसान झाले होते. येत्या अर्थसंकल्पात सरकार पशु1 विमा आणण्याच्या तयारीत आहे.याद्वारे पाळीव पशूंचा मृत्यू झाल्यास शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळेल.

Read More

Union Budget 2023: मुलांच्या शिक्षणावरील खर्च वाढतोय? आयकरातून वजावट घ्या अन् असा वाचवा टॅक्स

दिवसेंदिवस शिक्षणावरील खर्च वाढत आहे. सर्वसामान्य कुटुंबाना मुलांच्या शिक्षणासाठी खर्च करणे अवघड होत चालले आहे. प्राथमिक शिक्षणासाठीही लाखो रुपये खर्च येत आहे. मात्र, हा खर्च कर वजावटीसाठी पात्र ठरु शकतो. यासाठी दीड लाख रुपयांची मर्यादा आहे. ट्युशन फी भरल्याच्या पावत्या जोडून तुम्ही करातून सूट मिळवू शकता.

Read More

Budget 2023 Expectations: बजेट 2023 मध्ये शेतकऱ्यांसाठी कोणत्या योजनेत बदल केला जाऊ शकतो? जाणून घ्या सविस्तर

Budget 2023 Expectations: केंद्रीय अर्थसंकल्प 2023 (Union Budget 2023) मध्ये लहान आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी प्रोत्साहनाची घोषणा केली जाऊ शकते. जाणून घ्या सविस्तर

Read More

Union Budget 2023 : दागिने, इलेक्ट्रॉनिक उपकरणे महाग होऊ शकतात; CAD मध्ये विक्रमी वाढ

भारताची चालू खात्यातील व्यापारी तूटही (current account deficit) विक्रमी प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे बजेटमध्ये दागिने, इलेक्ट्रिनिक उपकरणे आणि मशिनरी यांच्यावरील आयात शुल्क वाढण्याची शक्यता आहे. जर सरकारने आयात शुल्क वाढवले तर सर्वसामान्यांच्या खिशावर त्याचा बोजा पडण्याची शक्यता आहे. कारण इलेक्ट्रिक उपकरणे आणि दागिने महाग होण्याची शक्यता आहे.

Read More

Budget 2023 Expectation: मुद्रा योजनेतील कर्ज मर्यादा 10 लाखांहून अधिक करण्याची मागणी

येत्या अर्थसंकल्पात MSME सेक्टरमध्ये 10 लाख किंवा त्याहून अधिक कर्ज उपलब्ध करून दिले जाऊ शकते. सध्या मुद्रा (Micro Units Development And Refinance Agency) योजनेअंतर्गत कर्ज मर्यादा रु. 10 लाख इतकी आहे. कर्ज मर्यादा वाढवल्याने MSME क्षेत्राची कर्ज मागणी पूर्ण करण्यात मदत होईल आणि पर्यायाने नव्या उद्योगधंद्यांना चालना मिळेल.

Read More

Budget 2023 Expectation: भरडधान्यांना विशेष प्रोत्साहन दिले जाईल, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्याचे सरकारचे प्रयत्न

Union Budget 2023: मागील अर्थसंकल्पातच केंद्र सरकारने 2023 हे वर्ष ‘भरडधान्य वर्ष’ म्हणून साजरे करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर 2023 हे वर्ष संयुक्त राष्ट्राने जागतिक स्तरावर ‘भरडधान्य वर्ष’ (International Year Of Millets 2023) म्हणून घोषित केले आहे. या प्रस्तावाला 70 देशांचा पाठिंबाही मिळाला आहे.

Read More

Budget 2023 Expectation: गृहकर्जावरील व्याजदरात होऊ शकते घट, घेतले जाऊ शकतात महत्वाचे निर्णय

अर्थमंत्री निर्मला सीतारमन या 1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर करणार आहेत. अर्थसंकल्पापूर्वी सर्वसामान्यांना अनेक मुद्द्यांवर दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. विशेषत: ज्यांनी गृहकर्ज घेतले आहे त्यांना व्याजदर कमी केली जाईल अशी अपेक्षा आहे जेणेकरून त्यांचा ईएमआय (EMI) कमी होईल.

Read More

Budget 2023: रिअल इस्टेट क्षेत्रासाठी अर्थसंकल्पात कोणत्या महत्वाच्या सुधारणा होऊ शकतात?

Budget 2023: गेले वर्ष रिअल इस्टेट क्षेत्रासाठी (Real estate sectors) चांगले गेले. भारतातील रिअल इस्टेट गुंतवणुकीत (investment) 32 % वाढ झाली. त्याचबरोबर अर्थसंकल्पातील तीन महत्त्वाच्या सुधारणांमुळे रिअल इस्टेट क्षेत्राला चालना मिळण्याची शक्यता आहे, जाणून घेऊया सविस्तर.

Read More