Ujjwala Yojana: सध्या घरगुती गॅस सिलिंडरच्या (Domestic Gas Cylinder) किमती 1 हजार रुपयांपर्यंत पोहोचल्या आहेत. अशा परिस्थितीत येत्या अर्थसंकल्पात (Union Budget 2023) स्वयंपाकाच्या गॅसबद्दल काय घोषणा होतात याकडे सर्वसामान्य गृहिणींचे लक्ष लागून आहे. गॅसच्या किंमती कमी केल्यास स्वयंपाकाचा खर्च कमी होऊ शकतो अशी अपेक्षा सामान्यांना आहे. सरकार प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत लोकांना मोफत गॅस सिलिंडरचे वाटप करत आहे. चालू आर्थिक वर्षात सरकारने या योजनेसाठी सुमारे 5812 कोटींचे बजेट ठेवले होते. याशिवाय या योजनेंतर्गत वर्षातील 12 सिलिंडरवर 200 रुपये सबसिडीही दिली जाते. अशा परिस्थितीत सरकार हे अनुदान यापुढेही सुरू ठेवेल, अशी अपेक्षा आहे. सोबतच सबसिडी वाढविण्यासाठी देखील सरकार प्रयत्नशील असल्याचे समजते आहे.
गॅस सिलिंडरवर सबसिडी
केंद्र सरकार उज्ज्वला योजनेंतर्गत (Ujjwala Yojana) उपलब्ध असलेल्या वार्षिक 12 गॅस सिलिंडरवर सबसिडी देते. सबसिडी अंतर्गत लोकांना प्रत्येक एलपीजी सिलेंडरवर 200 रुपये अनुदान दिले जाते. हे अनुदान पुढील आर्थिक वर्षासाठी सरकार वाढवू शकते. ही योजना देशभरात घेऊन जाण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. देशातील 100% लोकांपर्यंत उज्ज्वला योजना पोहोचवण्यासाठी सरकार येत्या अर्थसंकल्पात आणखी महत्वाच्या आणि सामन्यांच्या हिताच्या घोषणा करू शकते.
9 कोटी लाभार्थ्यांना योजनेचा लाभ
गेल्या काही वर्षांत गॅस सिलिंडरच्या किमती प्रचंड वाढल्या आहेत. अशा परिस्थितीत गरिबांवर याचा बोजा पडू नये म्हणून अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मे 2021 मध्ये 200 रुपयांच्या सबसिडीची घोषणा केली होती. ही योजना एका आर्थिक वर्षात फक्त 12 सिलिंडरसाठी होती. सरकारी आकडेवारीनुसार या योजनेचा 9 कोटींहून अधिक लोकांना लाभ झाला आहे. चालू आर्थिक वर्षासाठी सरकारने 5812 कोटी रुपयांची तरतूद ठेवली होती.
Pradhan Mantri Ujjwala Yojana (PMUY) the benchmark scheme that has not only provided clean fuel to poor households, but also entailed an investment of over Rs 3,000 crore in North East.@News18India https://t.co/3deNKVeFxQ @sarbanandsonwal @PetroleumMin @dpradhanbjp @mygovindia pic.twitter.com/ussDeLOteI
— PM Ujjwala Yojana (@PMUjjwalaYojana) October 17, 2019
उज्ज्वला योजना काय आहे?
सदर योजनेअंतर्गत दारिद्र्यरेषेखालील (Below Poverty Level) लोकांना मोफत एलपीजी गॅस कनेक्शन (LPG Gas Connection) दिले जाते. यासाठी त्यांना 1,600 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. याशिवाय मोफत रिफिल आणि स्टोव्ह देण्याची तरतूद या योजनेत केली गेली आहे. सरकारने 2016 मध्ये प्रधानमंत्री उज्ज्वला योजना सुरू केली आणि 10 ऑगस्ट 2021 रोजी उज्ज्वला 2.0 आणली. या अंतर्गत वंचित कुटुंबांनाही गॅस सिलिंडर पोहोचवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. येत्या आर्थिक वर्षांत ही योजना सुरू ठेऊन त्यावरील अनुदान वाढविण्याचा सरकारचा विचार आहे. येत्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सितारमन अशी घोषणा करू शकतात.