Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

गुंतवणूक

'या' सुप्रसिध्द चित्रपट दिग्दर्शकाने घेतला 103 कोटींचा बंगला, 6.17 कोटींची स्टॅम्प ड्युटी भरली

Film Director Dinesh Vijan Apartment: महागडे आणि सुंदर असे घर त्या व्यक्तीचा आर्थिक दर्जा ठरवत असते, असेच काहीसे चित्र गेल्या अनेक वर्षांपासुन सुरु आहे. त्यात आता प्रसिध्द चित्रपट दिग्दर्शक दिनेश विजन यांची भर पडलेली आहे. दिनेशने मुंबईच्या पाली हिल्स परीसरात 103 कोटी रुपयांचा बंगला खरेदी केला आहे आणि 6.17 कोटी रुपये एवढी या बंगल्याची स्टॅम्प ड्यूटी भरली आहे.

Read More

Micron Technology भारतात उभारणार पहिला सेमीकंडक्टर प्लांट, 2.75 अब्ज डॉलर्सची करणार गुंतवणूक

Micron Semiconductor Plant: मायक्रोन टेक्नॉलॉजी (Micron Technology) गुजरातमध्ये 2.75 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करून देशातील पहिला सेमीकंडक्टर चिप उत्पादन कारखाना उभारणार आहे. या माध्यमातून येत्या काही वर्षात तब्बल 20,000 रोजगारांची निर्मिती होणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

Read More

MAHARERA: फ्लॅटच्या जाहिरातींवर बिल्डरांना द्यावा लागेल QR कोड, नाहीतर 50 हजारांचा दंड भरावा लागणार

MAHARERA: फ्लॅट स्किम विक्रीच्या जाहिरातींवर आणि सर्व माध्यमांवर प्रकाशित होणाऱ्या संबंधित जाहिरातींवर QR कोड देणे बंधनकारक आहे. 1 ऑगस्टपासून या आदेशाचे पालन न केल्यास डेव्हलपर्सला 10,000 ते 50,000 रुपये दरम्यान दंड आकारला जाईल, असा नियम महाराष्ट्र रिअल इस्टेट नियामकाने (महारेरा) बंधनकारक केला आहे.

Read More

Corporate Fixed Deposits: कार्पोरेट फिक्स्ड डिपॉझिट म्हणजे काय?

Corporate Fixed Deposits: आपल्या पैशांची योग्य प्रकारे गुंतवणूक व्हावी, ते सुरक्षित राहावेत यासाठी नागरिक बँकेमध्ये पैसे फिक्स्ड डिपॉझिट करतात. परंतु आता कार्पोरेट कंपन्यांमध्ये देखील फिक्स्ड डिपॉझिटची संकल्पना उदयास आलेली आहे. कार्पोरेट फिक्स्ड डिपॉझिट (Corporate FD) ही संकल्पना लोकप्रिय ठरत आहे. सोबतच बँकेतील एफडीवर मिळणाऱ्या व्याजापेक्षा कार्पोरेट फिक्स्ड डिपॉझिट वर मिळणारे व्याज हे जास्त असते

Read More

Tomato Price Hike: टोमॅटोचा भाव कमी होणार, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात आवक वाढली…

महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातून टोमॅटोच्या नवीन पिकाच्या अधिक पुरवठ्यामुळे किरकोळ किरकोळ किमतीत घसरण होण्याची अपेक्षा आहे. मान्सूनच्या पावसामुळे आणि इतर समस्यांमुळे पुरवठा साखळी विस्कळीत झाली होती. मागणी अधिक आणि पुरवठा कमी अशी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे देशातील अनेक भागांमध्ये टोमॅटोचे किरकोळ भाव वाढले होते असे स्पष्टीकरण सरकारने दिले आहे.

Read More

Investment in commodity market: कमोडिटी मार्केटमध्ये ट्रेड करणार आहात? 'या' 5 गोष्टी लक्षात ठेवा

Investment in commodity market: कमोडिटी मार्केटमध्ये ट्रे़ड करणाऱ्यांसाठी ही बातमी महत्त्वाची आहे. सध्याची परिस्थिती पाहता डॉलर निर्देशांकात पुन्हा एकदा मजबूती परतताना पाहायला मिळत आहे. सोनं 2 महिन्यांच्या उंचीवरून आता घसरलं आहे, कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ झाली आहे. पार्श्वभूमीवर काही बाबी लक्षात घेणं महत्त्वाचं आहे.

Read More

Shark Tank India: शार्क टँकमधून खरंच मिळतो का निधी? आश्वासन 40 कोटींचं पण प्रत्यक्षात किती?

Shark Tank India: स्टार्टअप्सना निधी मिळवण्याचं एक प्लॅटफॉर्म असलेलं शार्क टँक इंडिया हा एक प्रसिद्ध शो आहे. या माध्यमातून देशभरात काहीतरी नवं करू इच्छिणाऱ्यांसाठी निधीची व्यवस्था आहे. मात्र या स्टार्टअप्सना खरंच आश्वासन दिलेला निधी मिळतो का, यावर आता चर्चा होऊ लागल्या आहेत.

Read More

Maharera: बांधकाम नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 563 डेव्हलपर्सवर महारेराची कारवाई

MAHARERA Action Against Developers: गृहनिर्माण प्रकल्प बनवताना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 563 रिअल इस्टेट कंपन्यांवर कारवाईची टांगती तलवार आहे. महाराष्ट्र रिअल इस्टेट नियामक प्राधिकरणाने (Maharera) राज्यातील 563 हून अधिक गृहनिर्माण प्रकल्पांना त्यांच्या प्रकल्पांशी संबंधित माहिती अपडेट न केल्याबद्दल कारवाईच्या नोटिसा बजावल्या आहेत.

Read More

Gold-Silver Price Rise: सोने-चांदी महागले, जाणून घ्या आजचा दर

Gold-Silver Price Rise: इंडियन बुलियन्स अॅंड ज्वेलर्स असोसिएशननुसार आज बुधवारी मुंबईतील सराफा बाजारात सोन्याचा भाव 10 ग्रॅमसाठी 59756 रुपये इतका आहे. एक किलो चांदीचा भाव 75499 रुपये इतका आहे.

Read More

Fixed Deposit Interest Rate: काय म्हणता? मुदत ठेवीवर 9.5% व्याजदर देतायेत या बँका, चेक करा डीटेल्स

अनेक लोक गुंतवणुकीसाठी योग्य त्या पर्यायांचा शोध घेत असतात. त्यातल्या त्यात मुदत ठेव ही गुंतवणुकीसाठीचा एक लोकप्रिय पर्याय आहे. फिक्स्ड डिपॉजिट (Fixed Deposit) म्हणजे अशी गुंतवणूक, जिथे ठराविक कालावधीसाठी तुम्ही तुमचे पैसे गुंतवता आणि त्यांनतर ग्राहकांना निर्धारित व्याजदरानुसार परतावा दिला जातो. चांगला परतावा देणाऱ्या बँकांची माहिती घ्या या लेखात...

Read More

Tur Dal Price Hike: तूर डाळीचे भाव कडाडले, मागील वर्षाच्या तुलनेत यंदा 32% भाववाढ

गेल्या काही दिवसांपासून तूर डाळीच्या दरावर नियंत्रण ठेवण्याचा सरकारचे प्रयत्न सुरु आहेत. डाळीची साठेमारी करणाऱ्या व्यापाऱ्यांच्या विरोधात सरकारने कारवाईचा बडगा देखील उभारला होता. मात्र या कारवाईला म्हणावे तितके यश मिळताना दिसत नाहीये.

Read More

MahaRERA: 'या' डेव्हलपर्सने केला महारेराकडे अर्ज, 11 लक्झरी व्हिला प्रकल्पांची नोंदणी रद्द करण्याचा निर्णय

Mahindra Lifespaces: रिअल इस्टेट कंपनी महिंद्रा लाइफस्पेस डेव्हलपर्सने मुंबईतील 11 लक्झरी व्हिला प्रकल्पांची नोंदणी रद्द करण्यासाठी अर्ज केला आहे. कंपनीने हा अर्ज महाराष्ट्र रिअल इस्टेट रेग्युलेटरी अथॉरिटी (MahaRERA) कडे दिला आहे. महारेरा नुसार, गेल्या एका महिन्यात महाराष्ट्रातील एकूण 139 प्रकल्पांची नोंदणी रद्द करण्यासाठी अर्ज प्राप्त झाले आहेत.

Read More