जागतिक पातळीवरील अनिश्चितता आणि महागाईचा कहर यामुळे आज कमॉडिटी बाजारात सोने आणि चांदीमध्ये तेजी दिसून आली. आज सोन्याचा भाव 80 रुपयांनी वाढला. चांदीमध्ये 550 रुपयांची वाढ झाली.
एमसीएक्सवर सोन्याचा भाव 59720 रुपये इतका आहे. त्यात 43 रुपयांची घसरण झाली आहे. इंट्रा डेमध्ये सोन्याचा भाव 76625 रुपयांवर गेला होता. एक किलो चांदीचा भाव 76222 रुपये इतका असून त्यात 119 रुपयांची वाढ झाली.
एचडीएफसी सिक्युरिटीजच्या आकडेवारीनुसार बुधवारी दिल्लीतील सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या किंमतीत वाढ झाली. बुधवारी सोन्याचा भाव 650 रुपयांनी वधारला. 10 ग्रॅम सोन्याचा भाव 60700 रुपये इतका होता. आज चांदीच्या किंमतीत देखील 600 रुपयांची तेजी दिसून आली. 1 किलो चांदीचा भाव 77600 रुपये इतका होता.
स्थानिक सराफा बाजारात सोन्याचा भाव तेजीत आहे. जगभरातील प्रमुख देशांमध्ये महागाई वाढलेली आहे. महागाई रोखण्यासाठी सेंट्रल बँकांनी व्याजदर वाढ केली होती. त्यामुळे सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याची मागणी वाढल्याचे एचडीएफसी सिक्युरिटीजचे कमॉडिटी विश्लेषक सौमिल गांधी यांनी सांगितले.
इंडियन बुलियन्स अॅंड ज्वेलर्स असोसिएशननुसार आज बुधवारी मुंबईतील सराफा बाजारात सोन्याचा भाव 10 ग्रॅमसाठी 59756 रुपये इतका आहे. एक किलो चांदीचा भाव 75499 रुपये इतका आहे.