Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Corporate Fixed Deposits: कार्पोरेट फिक्स्ड डिपॉझिट म्हणजे काय?

Corporate Fixed Deposits

Image Source : www.indiatvnews.com

Corporate Fixed Deposits: आपल्या पैशांची योग्य प्रकारे गुंतवणूक व्हावी, ते सुरक्षित राहावेत यासाठी नागरिक बँकेमध्ये पैसे फिक्स्ड डिपॉझिट करतात. परंतु आता कार्पोरेट कंपन्यांमध्ये देखील फिक्स्ड डिपॉझिटची संकल्पना उदयास आलेली आहे. कार्पोरेट फिक्स्ड डिपॉझिट (Corporate FD) ही संकल्पना लोकप्रिय ठरत आहे. सोबतच बँकेतील एफडीवर मिळणाऱ्या व्याजापेक्षा कार्पोरेट फिक्स्ड डिपॉझिट वर मिळणारे व्याज हे जास्त असते

Corporate FD Advantages And Disadvantages: प्रत्येक नागरिक आपल्या सुरक्षित भविष्याची चिंता करीत असतो. आपले भविष्य सुरक्षित राहावे, यासाठी तो विविध ठिकाणी गुंतवणूक करीत असतो. विविध गुंतवणुकीपैकी प्रचलित आणि सोपा गुंतवणुकीचा प्रकार म्हणजे फिक्स्ड डिपॉझिट (मुदत ठेव) होय. बँक फिक्स्ड डिपॉझिट मधुनच कार्पोरेट फिक्स्ड डिपॉझिट (Corporate Fixed Deposits) ही संकल्पना उदयास आलेली आहे.

कार्पोरेट फिक्स्ड डिपॉझिट म्हणजे काय?

भविष्यात कार्पोरेट फिक्स्ड डिपॉझिट या संकल्पनेला भविष्यात प्रचंड वाव असणार आहे. मोठ-मोठ्या कार्पोरेट कंपन्यांना व्यवसाय चालविण्यासाठी प्रचंड पैशांची गरज असते. ही गरज पूर्ण करण्याकरीता कंपनी गुंतवणूकदारांकडून विशिष्ट ठराविक कालावधी करीता पैसे घेतात. हे पैसे कंपनी आपल्या व्यावसायिक विकासाकरीता वापरत असते. विशिष्ट ठराविक कालावधी पूर्ण झाला की कंपनी घेतलेले पैसे व्याजासह गुंतवणूकदाराला परत करतात. बँकेप्रमाणेच कंपन्यादेखील व्याजाची रक्कम गुंतवणुकदाराचे पैसे घेतानांच ठरवित असतात किंवा गुंतवणूकदाराला किती टक्के व्याज दिल्या जाणार हे आधीच सांगितले जात असते. गुंतवणूकदार आणि कंपनी यांच्यात होत असलेल्या या देवाण-घेवाण ला कार्पोरेट फिक्स्ड डिपॉझिट म्हटले जाते.

अशी घ्या काळजी

बँकेमध्ये केलेल्या एफडी पेक्षा कंपनीमध्ये केलेली एफडी ही तुलनेत तेवढीच जोखीमयुक्त असते. त्यामुळे कुठल्याही कार्पोरेट कंपनीमध्ये गुंवणूक करतांना आधी त्या कंपनीबाबतची संपूर्ण माहिती गोळा करा, कंपनीचे रेटींग तपासा. शक्यतोवर त्याच कंपनीत गुंतवणूक करा, जी कंपनी नफ्यात आहे. तसेच, कुठल्याही कंपनीत गुंतवणूक करण्याआधी त्या कंपनीचे नियम आणि अटी व्यवस्थित समजून घेणे आवश्यक आहे.

मिळतो उत्तम परतावा

कार्पोरेट फिक्स्ड डिपॉझिट केल्यास गुंतवणूकदारांना मिळणारा परतावा हा बँकेच्या एफडीपेक्षा अधिक असतो, म्हणजेच 10 ते 12 % असू शकतो. त्यामुळे गुंतवणुकदारांनी जर का दिर्घ कालावधीकरीता गुंतवणूक केली तर त्याचा त्यांना उत्तम नफा मिळू शकतो. बँकांप्रमाणे कंपनी देखील ज्येष्ठ नागरिकांना गुंतवणुकीवर अतिरिक्त व्याज देत असते. यातही तुम्ही 12 ते 60 महिन्यांकरीता एफडी करु शकता.