Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

MahaRERA: 'या' डेव्हलपर्सने केला महारेराकडे अर्ज, 11 लक्झरी व्हिला प्रकल्पांची नोंदणी रद्द करण्याचा निर्णय

MahaRERA

Mahindra Lifespaces: रिअल इस्टेट कंपनी महिंद्रा लाइफस्पेस डेव्हलपर्सने मुंबईतील 11 लक्झरी व्हिला प्रकल्पांची नोंदणी रद्द करण्यासाठी अर्ज केला आहे. कंपनीने हा अर्ज महाराष्ट्र रिअल इस्टेट रेग्युलेटरी अथॉरिटी (MahaRERA) कडे दिला आहे. महारेरा नुसार, गेल्या एका महिन्यात महाराष्ट्रातील एकूण 139 प्रकल्पांची नोंदणी रद्द करण्यासाठी अर्ज प्राप्त झाले आहेत.

MahaRERA Received Deregistration Applications: महिंद्रा लाइफस्पेस डेव्हलपर्सने महारेराकडे मुंबईतील 11 लक्झरी व्हिला प्रकल्पांची नोंदणी रद्द करण्यासाठी अर्ज केला आहे. महारेरानुसार, गेल्या एका महिन्यात महाराष्ट्रातील एकूण 139 प्रकल्पांची नोंदणी रद्द करण्यासाठी अर्ज प्राप्त झाले आहेत. 139 प्रकल्पांमध्ये महिंद्रा लाइफस्पेस डेव्हलपर्स सोबतच कल्पतरू आणि अरिहंत सुपरस्ट्रक्चर्स कंपनीचाही समावेश आहे. तसेच पुणे येथील मंत्रा प्रॉपर्टीजचे सुध्दा नाव आहे.

महिंद्रा लाइफस्पेससह इतरही प्रकल्पांचे अर्ज

2 जून रोजी, MahaRERA ने अशा 88 रिअल इस्टेट प्रकल्पांची यादी जारी केली, ज्यासाठी डेव्हलपर्सनी नोंदणी रद्द करण्यासाठी अर्ज केला होता. नोंदणी रद्द करण्याची विनंती करणाऱ्या कंपन्यांमध्ये कल्पतरू आणि अरिहंत सुपरस्ट्रक्चर्सचाही समावेश होता.

त्यानंतर 23 जून रोजी आणखी 19 प्रकल्पांची नोंदणी रद्द करण्यासाठी विनंती अर्ज MahaRERA कडे करण्यात आले. तर 12 जुलै रोजी प्राधिकरणाने, डेव्हलपर्सनी नोंदणी रद्द करण्याची विनंती केलेल्या आणखी 32 प्रकल्पांची यादी जाहीर केली. यामध्ये एकूण 32 प्रकल्पांपैकी महिंद्रा लाइफस्पेस डेव्हलपर्सचे 11 लक्झरी व्हिला प्रकल्प आहेत आणि पुणेस्थित मंत्रा प्रॉपर्टीजचे 5 प्रकल्प आहेत. महारेराने नोंदणी रद्द करण्यावर आक्षेप घेण्यासाठी एक महिन्याची मुदत या अर्जकर्त्यांना दिलेली आहे.

ही आहेत कारणे

महिंद्रा लाइफस्पेसेसला त्यांच्या 11 व्हिला प्रकल्पांची नोंदणी का रद्द करायची आहे? असे विचारले असता,'कंपनीच्या धोरणात काही बदल झाला आहे आणि व्हिला बांधण्याऐवजी ते भूखंड विकण्याची तयारी करत आहे', अशी माहिती एका रिअल इस्टेट ब्रोकरने दिली.

'आमचे सर्व प्रकल्प पूर्णपणे RERA नुसार आहेत कि नाही, याची खात्री करण्याचा आमचा सतत प्रयत्न असतो. यापूर्वी, आम्ही अशा पाच प्रकल्पांसाठी रेराकडे अर्ज केला होता, जे सुरू झाले नाहीत आणि एकही युनिट ग्राहकांना विकले गेले नाही', असे मंत्रा प्रॉपर्टीजचे सीईओ रोहित गुप्ता यांनी सांगितले.

कधी दिली जाते परवानगी?

महारेराने फेब्रुवारी २०२३ मध्ये अडचणीत असलेल्या किंवा व्यवहार्य नसलेल्या प्रकल्पांची नोंदणी रद्द करण्याची परवानगी दिली होती. केवळ अशाच प्रकल्पांची नोंदणी रद्द केली जाऊ शकते, ज्यामध्ये खरेदीदार किंवा इतर संबंधित पक्षांचे सेटलमेंट केले गेले आहे. महारेरा नुसार, निधीची कमतरता, खटला, कौटुंबिक वाद, सरकारी-अधिकारी अधिसूचनेतील बदल, इत्यादी कारणांमुळे नोंदणी रद्द करण्याची परवानगी दिली जाते.

काय आहेत अटी?

महारेराने रिअल इस्टेट प्रकल्पांची नोंदणी रद्द करण्यासाठी दोन अटी ठेवल्या आहेत, एक म्हणजे जेथे खरेदीदार नाहीत आणि दुसरे म्हणजे जेथे रिअल इस्टेट कंपनीने खरेदीदारांची देवाण घेवाण संपूर्णपणे क्लिअर केलेली आहे आणि त्याच्याशी संबंधित कागदपत्रे पडताळणीसाठी सादर केली आहेत.